कृषी संजीवनी प्रकल्पात जळगावच्या 460 गावांचा समावेश

0
3
कृषी संजीवनी प्रकल्पात जळगावच्या 460 गावांचा समावेश

साईमत जळगाव प्रतिनिधी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करून, त्यामध्ये विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली.तसेच पहिल्या टप्प्यात जळगाव होईल. जिल्ह्यातील 460 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या टप्प्यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च येईल. यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गाव निवड समिती स्थापन करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 4 हजार 682 गावे, जळगाव जिल्ह्यातील 460 गावे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 142 अशा एकूण 5 हजार 220 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये व तंत्र निकेतनांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगधंद्यांशी समन्वय वाढून रोजगार निर्मितीस मदत पुण्यातील सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ, मुंबईचे व्हिजेटीआय, नागपूरचे शासकीय अभियांत्रिकी, छत्रपती संभाजीनगरचे शासकीय औषध निर्माण शास्त्र, कऱ्हाडचे शासकीय औषधनिर्माणशास्त्र, छत्रपती संभाजीनगरचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती आणि यवतमाळचे शासकीय अभियांत्रिकी, पुणे जिल्ह्यातील अवसरी येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय आणि कोल्हापूरचे शासकीय तंत्रनिकेतन याठिकाणी उत्कृष्टता केंद्र उभारण्यात येतील.

बुलढाणा येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला याअंतर्गत 60 विद्यार्थी क्षमतेचे हे महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येईल. या महाविद्यालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शेतीविषयक तज्ज्ञ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात प्रशिक्षक म्हणून काम करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here