Author: Saimat

साईमत रावेर प्रतिनिधी प्रतिनिधी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून सुटच्या नावाखाली अनेक वर्षांपासून घेत असलेली तीन टक्के सुट शनिवारी, 1 जुलैपासून बंद करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय कृषी दिनाच्या पूर्वसंध्येला रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीने घेऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांना कृषी दिनाची भेट दिली आहे. रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन कार्यकारिणीची शुक्रवारी,  30 जून रोजी दुसरी बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती सचिन पाटील होते. सोबत उपसभापती योगेश पाटील, संचालक गणेश महाजन, जयेश कियुटे यांच्यासह अधिकारी, संचालक मंडळ उपस्थित होते. बैठकीत पूर्वापार व्यापारी केळीच्या घडाच्या वेस्टेज दांड्याच्या पोटी तीन टक्के सूट घेत होते. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने केळी उत्पादक शेतकरी आपली केळी…

Read More

साईमत मलकापूर प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मुक्ताईनगर मार्गावर जग्गुमामा धाब्यानजीक रस्त्याच्या कडेला थांबलेल्या  लक्झरी बसला भरधाव आयशर ने जबर धडक दिल्याने झालेल्या  भीषण अपघातात एका  गर्भवती महिलेसह चार ठार झाल्याची घटना दि ३० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सकाळी ७ वाजेच्या  सुमारास नागपूरकडे जात असलेली लक्झरी बसचे टायर पंचर झाल्याने पंचर दुरुस्तीसाठी रस्त्याच्याकडेला थांबलेल्या लक्झरी (क्रमांक एम पी १८ बीजी ८३५१) ला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली या अपघातात लक्झरी समोर उभे असलेले राजू भाई उर्फ हरी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर भरधाव आयशर  रोडाच्या विरुद्ध दिशेला…

Read More

साईमत जामनेर प्रतिनिधी  जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील शेतकरी कैलास वडाळे याच्या खून प्रकरणी खूनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी रमेश मोरे रा.वडाळी यास न्यायालयाने दि.३० पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी ची मुदत संपल्याने आरोपी रमेश मोरे यास आज दि.३० रोजी जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.न्यायालयीन कोठडी मिळाल्याने संशयित आरोपी रमेश मोरे याची रवानगी जळगाव जिल्हा कारागृहात करण्यात आली. दरम्यान पोलिस कोठडीत असतांना संशयिताने वाकोद बसस्थानक परिसरात असलेल्या खुशबू कापड दुकानातून पांढरा कापड खरेदी केला होता. तसेच नरेंद्र मेडिकल वरुन नारळी दोरीचे दोन बंडल खरेदी केले होते. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वडाळी येथील भावड्या नामक…

Read More

साईमत पुणे प्रतिनिधी खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी १ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये ई- पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी दिली. ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरुन सातबाऱ्यावर विविध पिकांची नोंदणी करत येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई- पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या अॅपमध्ये आतापर्यंत १.८८ कोटीपेक्षा अधिक…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन १ वर्ष होत पूर्ण होत आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरूवारी पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन दिल्लीला रवाना झाले. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीला रवाना झाले. विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दुपारी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बेस यांची भेट घेतली. या भेटीत मंत्र्यांच्या शपथविधीविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार ? शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जलेच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीसह एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना दणका देत दोघांना स्थानबध्द केले आहे. गेल्या नोव्हेंबरपासून ते आजतागायतत जिल्ह्यातील २१ विविध गुन्हेगारांना स्थानबध्द केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यातील प्रकाश चंद्रकांत कंजर (वय ३४, रा. खंडेराव नगर, जळगाव) हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत आहे. त्याच्यावर आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला एक वर्षासाठी ठाणे येथील कारागृहात स्थानबध्द केले आहे. यासोबत सोनू रामेश्वर पांडे (वय २४, रा. मामाजी…

Read More

साईमत यावल प्रतिनिधी यावल नगरपरिषद (Yawal Nagarparishad) हद्दीत प्रभाग क्र. 3 मधील काही भागात रस्ते गटारी नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गेल्या 2/ 3 वर्षात वारंवार लेखी तक्रारी केल्यावर सुद्धा नगरपालिकेने दखल न घेतल्याने कार्यकर्त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे आज दि. 30 जून 2023 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणपती नगर,आयेशानगर,तिरुपती नगर,वासुदेवनगर,गंगानगर या भागात रस्ते गटारी नसल्यामुळे तसेच नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष यांच्यासह यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत नसल्याने ऐन पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच विविध…

Read More

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बंद पडलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित व्हावी म्हणून मराठा महासंघाच्या वतीने दिनांक 30 जून 2023 रोजी चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मराठा महासंघाच्या मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज या चौकात यापूर्वी सिग्नल यंत्रणा सुरू होती ती अचानक बंद करण्यात आलेली आहे. यापूर्वी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता मात्र आता महाराजांचा पुतळा झाल्याने ते एक आकर्षण स्थळ झाले आहे. वाहन चालक यांचे लक्ष पुतळ्याकडे जाते आणि आजूबाजूला मोठमोठे डिजिटल बॅनर लावले जात असल्याने एकाच वेळी सर्व वाहन जात येत असल्याने डिजिटल बॅनर कडे वाहन…

Read More

साईमत ओझर प्रतिनिधी वारकऱ्यांच्य वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठ्ठल नामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात चांदोरी (ता.निफाड) येथील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा रंगला. दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी या पालखी सोहळ्याचे आकर्षण ठरले.एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान विद्यार्थी व विद्यार्थिनी मात्र पांढरा झब्बा हातात भगव्या पताका,डोक्यावर टोपी, कपाळी केशरी गंध,गळ्यात टाळ घेऊन आलेली मुले आणि नऊवारीत नटून थटुन,केसात गजरा,डोक्यावर तुळस आणि पाण्याचे हंडे घेऊन आलेल्या मुला आणि “शाळा शिकताना तहान भूक हरली,विठ्ठल नामाची शाळा भरली” या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत तल्लीन झालेले बाल वारकरी अवतरले. हा नयनरम्य…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी  एरंडोल-कासोदाकडे जात असताना एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर अंजनी धरणाजवळ रस्त्यावर गुरुवारी रात्री पावणे ९ वाजेच्या सुमारास झाड कोसळल्याची घटना घडली. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात गाडीमधील इतर तीन कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक…

Read More