साईमत जळगाव प्रतिनिधी
मुख्यामंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या शाशन आपल्या दारी या कार्यक्रमात दिलेल्या जवाबदारीमध्ये हलगर्जी झाल्या प्रकरणी एसटी महामंडळाच्या खुशाल मोरे अश्या वरिष्ठ लिपिकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भगवान जगनोर विभाग नियंत्रक यांनी या कारवाईची संपूर्ण माहिती दिली . या कारवाईची चर्चा महामंडळात कालपासून सुरु आहे. एकनाथ शिंदे हे राज्यचे मुख्यामंत्री व परिवहन विभागाचे मंत्री असून ते मंगळवारी शाशन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त जळगाव शहरात आले होते.
या कार्यक्रमात मोरे यांच्या नियोजनाची जवाबदारी देण्यात आली होती. मात्र मोरे हे कामावर त हजर झाले पण आपल्याला सोपवलेली कामे न करता तेथून निघून गेले . नियोजनाचा आढावा घेत असताना त्यात मोरे हे जागेवर नव्हते तर दिलेल्या जबाबदारी त्यांनी पूर्ण पारपडलेली नव्हती , या आढाव्यात निर्दर्शनच आले. या कारणाने कार्यक्रमाच्या नियोजनावर परिणाम झाल्याने संबंधित लिपिकावर निलंबनाची कारवाई ही करण्यात आली आहे. या कारवाई नंतर एसटी महामंडळात चांगलीच चर्चा आहे.