साईमत मुंबई प्रतिनिधी
आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. राज्यात 9 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. त्यासाठी 4 हजार 365 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांना संलग्न 430 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) होते. पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल. अमरावती आणि वर्धा येथील महाविद्यालयासाठी जागा कालातंराने निश्चित करण्यात येईल.