रेल्वे विभागात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) काम करण्याची इच्छा असणाऱ्यसाठी एक खुश खबर आहे . ते म्हणजे रेल्वे अंतर्गत ग्रुप सी लेवल – २ आणि भूतपूर्व ग्रुप “डी” लेवल – १ या पदांसाठी भरती केली जाणार असून भरतीअंतर्गत ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु कार्यांत आली आहे. या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाण्याकरिता संपूर्ण माहिती वाचा. पदाचे नाव -ग्रुप “सी” लेवल-२ आणि भूतपूर्व ग्रुप “डी” लेवल-१ पदांसाठी एकूण पदसंख्या – ८…
Author: Saimat
साईमत धुळे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिंदखेडा तहसील कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांतर्फे आज शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांनी राज्य सरकारचा विरोध, प्रशासनाच्या मनमानी कारभार विरोधात घोषणाबाजी करीत आपला निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांना अखंडित १८ तास वीजपुरवठा वीज वितरण विभागातर्फे देण्यात यावा. त्याचबरोबर शेतीसाठी असलेल्या नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची तात्काळ प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो हमीभाव मिळावा; या मागण्यांसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिंदखेडा तहसील कार्यालयावर शिवसैनिकांतर्फे शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसैनेचे कार्यकर्ते सहभागी झाले. राज्य सरकार, प्रशासनाच्या मनमानी कारभार विरोधामध्ये घोषणाबाजी…
साईमत कजगाव प्रतिनिधी कजगाव तालुका भडगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली, यावेळी कजगावचे लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन व ग्रामपंचायत सदस्य व आरोग्य अधिकारी, यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच रघुनाथ महाजन व ग्रामपंचायत सदस्य यांच्या तर्फे कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना लागणाऱ्या गोळ्या औषधीचे किट ग्रामपंचायतच्या मार्फत देण्यात आले. यावेळी सरपंच रघुनाथ महाजन ,उपसरपंच हाजी शफी मण्यार , मा, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ महाजन , सरपंच पुत्र अनिल महाजन , राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अशोक राजपूत , मनोज धाडीवाल, मांगीलाल मोरे, संभाजी पवार , अनिल…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी सायंकाळी आपल्या काका सोबत शेतात जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव इटियॉस (Etios) या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला असून तर एकजण गंभीर जखमी झाल्याची ,घटना २३ रोजी सायंकाळी खडकी रस्त्यावर घडली. धडक देणारा वाहन चालक कार सोडून पळून गेलाअसून ते वाहन साई चंद्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीचे आहे. या प्रकरणी चाळीसगाव(Chalisgaon) शहर पोलिस स्टेशनला वाहन चालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव (Chalisgaon) शहरात शास्त्रीनगर येथील गोपाल पुंडलिक कुंभार यांचे खडकी बुक शिवारात शेत आहे. दररोज प्रमाणेते दि. २३ रोजी सुद्धा सायंकाळी चार वाजता गोपाल कुंभार हे आपल्या पुतण्या राहुल राजू…
साईमत नंदूरबार प्रतिनिधी नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील टाटा मोटर्स कंपनीच्या शोरूम मध्ये २१ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ग्राहकाला टाटा कंपनीचे चारचाकी वाहत दाखवत असताना अनावधानाने सेल्स एक्झिक्युटिव्ह च्या माध्यमातून एक अपघात झाला या अपघातात शोरूम मधीलच कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून २०२३ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास टाटा शोरूम मध्ये सेल्स एक्झिक्यूटिव्ह दीपक इंद्रसिंग राजपूत हे आलेल्या ग्राहकांना टाटा कंपनीची कारची माहिती देत असताना अनावधानाने कार सुरू झाली व एक्सीलेटर जोरात दिल्या गेल्याने दुसऱ्या कार वर…
साईमत जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद येथे महामार्गावर आयशरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास एमएच 19 एए 2095 क्रमांकाच्या दुचाकीला भरधाव आयशरने उडविले. नशिराबादजवळ असलेल्या महाजन हॉटेलच्या जवळ हा अपघात घडला. या भीषण अपघातात शेनफडू बाबूराव कोळी ( रा. सामरोद, ता. जामनेर ) आणि भारती शेनफडू कोळी ( रा. सामरोद, ता. जामनेर ) या दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर सुदैवाने त्यांचा रूद्र हा तीन वर्षाचा मुलगा बचावला आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत शेनफडू कोळी हे नशिराबादमार्गे जामनेर आणि सामरोद येथे…
साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी या उद्दिष्टाने शालेय सुशोभीकरणाची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली असून सदर कार्यशाळेमध्ये सुशोभीकरण म्हणजे काय ? सुशोभीकरण कशा प्रकारे करावे व त्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा वापर करावा याविषयी मुख्या .धनश्री फालक यांनी मार्गदर्शन केले तर या सुशोधनासाठी वेळोवेळी लागणारे विविध साहित्य प्रत्यक्ष कसे तयार करावे याविषयी प्रात्यक्षिकातून उपशिक्षक योगेश भालेराव सर यांनी मार्गदर्शन केले. शालेय वर्ग स्वच्छता करणे , पताका तयार करणे , फुलांचे हार तयार करणे , वॉलपीस तयार करणे तसेच चार्ट व शैक्षणिक साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षणही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी…
साईमत धुळे प्रतिनिधी वेगवेगळ्या प्रकारणांमुळे संवेदनशील झालेल्या धुळे शहरात गावठी बंदूक आणि दोन जिवंत काडतूसे घेऊन फिरणाऱ्या युवकाच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्याकडून सुमारे २७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून तो जप्त केला आहे. मुजाहिद अहमद (३३, रा. देविका मल्ला, आदम नगर, मालेगाव) असे या युवकाचे नाव आहे. हा युवक गावठी बंदूक विक्रीच्या उद्देशाने धुळे तालुक्यातील आर्वी येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी गावालगत असलेल्या लकी स्टार हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचून मुजाहिदला ताब्यात घेतले. अंगझडतीत सुमारे २५ हजार रुपयांची गावठी बंदूक तर दोन हजार रुपयांचे दोन जिवंत काडतूस असा २७…
साईमत चोपडा प्रतिनिधी शहरातील मास्टर कॉलनी भागात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाढदिवसाचा तलवारीने केक कापल्याप्रकरणी आठ तरुणांवर चोपडा शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांपैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 22 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास शहरातील मास्टर कॉलनी परिसरात विना परवाना धारदार लोखंडी तलवार तसेच चाकु जवळ बाळगून सार्वजनिक ठिकाणी रोडवर वाढदिवसाचा केक कापण्याकरीता वापर करतांना आढळून आल्याने तसेच जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १) सैय्यद फैजलअली मझहरअली व २) रिजवानअली अयाजअली दोघेही रा. शेतपुरा; ३)शाकीर सैय्यद साबीरअली, ४) दानिश सय्यद साबीरअली, व ५)दानिश शेख हमीद शेख तिघेही रा. मास्टर कॉलनी;…
साध्य राज्यात बहुप्रतिक्षित तलाठी भरती प्रक्रियेला चांगलाच वेग आला असून, त्या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार राज्यात ४ हजार ६६४ जागांवर पदभरती होणार असून , यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. या बातमीमुळे अनेक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील तलाठी गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या भरतीसाठी सरकारने शिथिलता आणल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील पुण्यासह नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती…