Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी भारतात योजण्यात आलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने येत्या 22 जुलै 2023 रोजी जी-20 युवा संवाद @2047 या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने देशातील प्रमुख शहरांमध्ये शिक्षण, पर्यटन, महिला विकास, आर्थिक विकास अशा विविध विषयांवर परिसरात, चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून कार्यगटही गठीत करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे सर्व विद्यापीठांमध्ये 2023 या वर्षात जी-20 युवा संवाद @2047 या संमेलनाचे आयोजन करण्याचे भारत सरकारच्या क्रीडा विभागाने ठरविले आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या युवा कल्याण आणि क्रीडा विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही (Lokshahi) दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जुलै महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 3 जुलै, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाहीदिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाहीदिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील वावडदे येथील एल.एच.पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये( L H patil English mediun school ) आज दि.28 जून 2023 रोजी आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालक श्री जितेंद्र पाटील सर श्री वीरेंद्र पाटील सर सौ वैशाली पाटील मॅडम, मुख्याध्यापिका सौ जयश्री पाटील मॅडम, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ सुजिता सोळंखे मॅडम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई यांच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर शिक्षिका सौ अश्विनी पाटील मॅडम यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व विषद केले. संगीत शिक्षक श्री कुशराजे पवार सर आणि ग्रुप यांनी विठ्ठठलं विठ्ठल हे गीत सदर केले. यानंतर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी ‘शासन आपल्या दारी‌’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मंगळवारी जळगाव येथे आले. य़ावेळी महापौर जयश्री महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाववासीयांच्या समस्यांच्या तक्रारींचे दहा कलमी पत्र दिले. मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आलेल्या पत्रात त्या म्हणाल्या की, काम करीत असताना, अनेक योजना शासन दरबारी प्रस्तावित आहेत. त्या प्रलंबित असल्यामुळे कामकाजात अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे या समस्यांच्या तक्रारी सोडवाव्यात. शहरात महापालिकेच्या 28व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे गाळेधारकांना सुविधा देण्यास अडचणी येत आहेत. त्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा. हुडको संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे सेंटलमेंट करून महापालिकेला कर्जमुक्त केले आहे. मात्र, घेतलेल्या…

Read More

साईमत कोळगाव ता.भडगाव प्रतिनिधी – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,कोळगाव ता.भडगाव येथे आषाढी एकादशीच्या निमित्तानं कोळगाव नगरीत पायी दिंडी काढत शोभायात्रा काढण्यात आली.   विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विठ्ठल-रुख्मिणी तसेच वारकऱ्यांचा वेशात मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदवला,यावेळी पालखी सुध्दा सजविण्यात येऊन संपूर्ण गावात पायी दिंडी काढत,विठ्ठल-रुख्मिणीचा जयघोष करीत,मस्तकावर तुळसी घेत,संत तुकारामांचे अभंग,संत एकनाथांचे भारुड,संत ज्ञानदेवांचे अभंग इ.गायन करीत टाळ मृदंगाच्या निनादात शोभायात्रा काढण्यात आली.   यावेळी प्राचार्य पुजा पाटील,दिपिका पाटील,पुनम महाजन,निकीता पाटील,तेजस्विनी पाटील,मयुरी पाटील,पुनम देसले,जनाबाई महाजन आदि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

Read More

मेष –  चंद्राचा सातवा गोचर व्यावसायात भरभराटी आणू शकतो. विद्यार्थ्यांना यश मिळेल. श्री सूक्ताचा पाठ करावा. तीळ दान करावी. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. शुभ रंग : पिवळा. वृषभ  –  आजचा दिवस संघर्षमय राहिल. व्यवसायात नवा बदल करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. नोकरीत अडचणी निर्माण होऊ शकतात. बुध आणि चंद्राची युती नोकरीत बदल करण्याचे संकेत देतो. प्रेम यशस्वी होईल. शुभ रंग : आकाशी. मिथुन –  बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी शुभ संकेत आहेत. सूर्य- बुधाची युती नोकरी विशेष लाभ मिळवून देईल. नवा बिझनेस सुरू करू शकतात. तीळ दान करावी. शुभ रंग : हिरवा. कर्क –  राशीचा स्वामी चंद्र आर्थिक भरभराटीसाठी पाठबळ…

Read More

साईमत सोयगाव प्रतिनिधी सोयगाव शहरात झालेल्या रिमझिम पावसात पहिल्याच पावसात सोयगावच्या आठवडे बाजारात चिखलच चिखल झाला होता त्यामुळे गृहिणींना आठवडे बाजारात खरेदीसाठी मोठी तारांबळ उडाली होती बाजारात चिखलात पायी फिरणे अवघड झाले होते त्यामुळे मोठी गैरसोय झाली. सोयगाव आठवडे बाजार शहरातील पंचायत समितीच्या मैदानात भरतो नगर पंचायतीकडे आठवडे बाहेरची देखभाल आहे परंतु नगर पंचायतीने या आठवडे बाजारच्या मैदानाची मॉन्सून पूर्व तयारीच केलेली नाही त्यामुळे पहिल्याच पावसात चिखलाचे साम्राज्य बाजारात पसरले होते त्यामुळे महिलांची चांगलीच कोंडी झाली होती. दरम्यान सोयगाव च्या आठवडे बाजाराचा कर वसुलीची जबाबदारी नगर पंचायतीकडे आहे मात्र दुकानदारांना आठवडा बाजारात कोणतीही सुविधा मिळत नसुन पावसाळ्यात या आठवडे बाजारात…

Read More

साईमत जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील सामरोद येथील कांग नदीपात्रात वाळू माफियांचा थैमान दिवसाढवळा सुरू आहे, मात्र याकडे महसूल विभागातर्फे  दुर्लक्ष होत असून, या वाळूमाफियांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थानकडून होत आहे. तालुक्यातून वाहनाऱ्या सामरोदच्या कांगनदी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा बेसुमार उपसा करून टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट ओहरलोड वाहतूक सामरोद मध्ये केली जात आहे. प्रशासनातील महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ही मोठी जबाबदारी आहे प्रतिबंध जबाबदाऱ्या असून यंत्रणा कामात असल्याचे पाहून तालुक्यातील वाळू चोरटे मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास सामरोद येथील नदीपात्रातून व कागनदी नदीपात्रातून रात्रभर व पहाटे वाळू चोरी करून सामरोद ,तळेगाव शकरपुरा या गावात हैदोस घालत आहेत, महसूल विभाग काहीही कारवाही करत…

Read More

आयसीसी (ICC) वन डे विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली आज सकाळीच बीसीसीआयने (BCCI) घेतलेल्या पत्रकार परिषेदत वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले. तेही टूर्नामेंट सूर होण्याच्याअवघ्या १०० दिवसा आधी जाहीर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या निमंत्रणानुसार हा कार्यक्रम मुंबईतील (Mumbai) एस्टर बॉलरूम, सेंट रेजिस, लोअर परेल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. भारत-पाकिस्तान हा अधिक चर्चेत असणारा महामुकाबला अहमदाबादमध्येच खेळलाजणार आहे. अहवालात असे सांगण्यात आले आहे कि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेसाठी प्रस्तावित सामने आणि स्थळांची आखणी केली असून त्याचे वेळापत्रक जुनमध्येच देशांना पाठवला होता. मात्र या मुद्यावर पाकिस्तानने अडथळा आणलाच होता. वेळेपत्रका नुसार सलामीचा सामना ५ ऑक्टोबर रोजी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी आज शहरात होणाऱ्या शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत पोलीस कवायत मैदानावर कार्यक्रम होणार असून सर्वसामान्यांनसाठी दुपारी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत आकशवाणी चौक ते गोविंदा रिक्षा स्टॉप हा रास्ता बंद राहील. त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे अशी माहित पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची गैरसोय न होण्याकरीत प्रशासनाने अनेक ठिकाणी वाहनस्थळची व्यवस्था करून दिली आहे. प्रशासनाने उपलब्ध केलेले वाहनस्थळ एकलव्य संकुल येथे : एरंडोल , पारोळा , अमळनेर , धरणगाव या तालुक्यातील येणाऱ्या वाहनासाठी जागा उपलब्ध केली आहे. जीएस मैदान येथे : यावल व चोपडा तालुक्यातील वाहने ते ममुराबाद मार्गे…

Read More