साईमत, जळगाव, प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी यशासाठी मेहनत घेण्याची नेहमी तयारी ठेवली पाहिजे. मेहनतीतूनच आपल्याला अपेक्षित यश मिळत असते. यशासाठी कुठलाच शॉर्टकट नाही. निरंतर अभ्यास आणि अपेक्षित यश असे हे समीकरण असून विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्यानंतर समाजाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार राजूमामा भोळे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हटकर समाज प्रगती मंडळ, धनगर समाज उन्नती मंडळ आणि सकल धनगर समाज मौर्य क्रांती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी, बारावी व इतर परीक्षांमध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी आ. राजूमामा भोळे उपस्थित होते. प्रसंगी मंचावर आ. लताताई सोनवणे, माजी आ. स्मिता वाघ, माजी…
Author: Saimat
साईमत भुसावळ प्रतिनिधी मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील अल्पवयीन तरुण – तरुणी रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने त्यांना ताब्यात घेत समतोल प्रकल्पाच्या स्वाधीन केले. मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील विजय राघवगढ (खलवारा) येथील १७ वर्षीय मुलगी व १६ वर्षांचा मुलगा शाळेतून कोणालाही काहिही न सांगता रेल्वेतून पसार होताना भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर आढळून आले, त्यांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी ताब्यात घेत विचारपूस करत ताब्यात घेतले होते. दरम्यान, शाळेच्या ड्रेसवरच हे विद्यार्थी बाहेर पडले होते. विद्यार्थिनी व विद्यार्थी या दोघांनी मित्र असल्याचे सांगत आम्ही शाळेत कोणालाही काही न सांगता तेथून निघून आल्याचे सांगत सुरतला जात…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी मानवी आरोग्याला आवश्यक असणारी खनिजे, महत्त्वाची अन्नद्रव्ये व अनेक औषधी गुणधर्म फक्त रानभाज्यांमध्ये आढळून येतात. आपल्या संस्कृती, परंपरेतून आलेल्या भाज्या म्हणून आपण रानभाज्यांना ओळखतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रविवारी मायादेवी नगरातील रोटरी हॉल व परिसरात आयोजित रानभाजी महोत्सवात केले. प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.संभाजी ठाकूर, आत्माचे प्रकल्प संचालक पांडुरंग साळवे, रोटरीच्या सरिता खाचणे, मुनीरा तरवारी,…
साईमत फैजपूर प्रतिनिधी शासनाच्या ‘झाडे लावा, झाडे जगवा…’ या अभियानाला अनुसरून येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज स्व-खर्चाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करीत असून परिसरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षारोपण करून ती जगवत आहे. वृक्षारोपण करून जबाबदारी न झटकता त्यांचे संगोपन होत आहे, की नाही हे ही ते पाहत असतात. यावर्षी त्यांनी रोपवाटीकेतून तब्बल चारशे कडुलिंबाची मोठी रोपे विकत आणली. आणि ती शेताच्या बांधावर लावण्याचा संकल्प केला. तो आज पूर्णत्वास येत आहे. विशेष म्हणजे खड्डे खोदण्यापासून ते रोपण करणे पर्यंत स्व-खर्चाने मजूर लावून वढोडा परिसरातील शेताच्या बांधावर या सर्व वृक्षांची लागवड करण्यात येते आहे. ज्या प्रमाणात वृक्षांची…
साईमत फैजपूर प्रतिनिधी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे गाळप सुमारे पाच वर्षापासून बंद आहे. नंतर ही कारखान्याची यंत्रे काही कारणास्तव कायम स्वरूपाची बंद झालीत. परिणामी कारखान्यात कामकरणारे कर्मचारी देशोधडीला लागले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. मुला – मुलींचे शिक्षण, कार्य ठप्प होण्याची मार्गावर आलीत. कोरोना सारख्या जगभर आलेल्या संकटामुळे आर्थिक चलनवलन बंद झाल्याने कर्मचाऱ्यांजवळील जमापुंजी संपुष्टात आली आहे. त्यासाठी कामावर जाण्याचे निवेदन मधुकर साखर कारखाना राष्ट्रीय कामगार युनियनचे सेक्रेटरी सुनील कोलते यांच्याकडे पटावरील कामगारांनी दिले आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये जिल्हा सहकारी बँकेने कर्ज वसुलीसाठी मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री केली. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू होईल, या आशेने सभासद, ऊस उत्पादक शेतकरी कामगार,…
साईमत मलकापुर प्रतिनिधी खामगांवकडून मलकापुरकडे घेवुन जाणार ६९ किलो ५०० ग्रॅम गांजा मलकापुर पोलिसांनी सापळा रचून पकडला आहे. सदर कारवाईत ८ लाख २६ हजार ८०० रुपये किंमतीच्या गांजासह एक सुझुकी कंपनीची कार अंदाजे किंमत ५ लाख रुपये असा एकूण १३ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. खामगांवकडून मलकापुर शहरात विक्रीसाठी गांजा आणला जाणार असल्याची गुप्त माहिती मलकापुरचे पोनि अशोक रत्नपारखी यांना मिळाली होती. त्यानुसार सपोनी पंजाबराव शेळके, डिबी पथकाचे के.पी तायडे, आसिफ शेख, प्रमोद राठोड, ईश्वर वाघ,गोपाल तारुळकर, प्रविण गवई,आनंद माने, गोपाल इंगळे, मंगेश चरखे आदी गस्तीवर असतांना सदर बातमीची पडताळणी करून कारवाई करण्याचे…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद येथील के. एस. टी. हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकाचा पदभार घेण्यावरुन उपशिक्षकाला अडवून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अक्सानगर भागात उपशिक्षक शेख साबीर अहमद खलिलोद्दीने (वय 48) हे राहतात. ते नशिराबाद येथील के.एस. टी. उर्दू हायस्कूलात कार्यरत आहेत. शेख साबीर हे शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता त्याच्या के. एस. टी. उर्दू शाळेत मुख्याध्यापक पदाचा पदभार घेणार होते. यासाठी ते शाळेत आले असता त्यांना वसीम अक्रम शेख मुसा. रा. नशिराबाद याने शिवीगाळ करत बेदम मारहाण केली, तू उद्या शाळेत कसा येतो, तुला बघतो,…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहरातील शाहूनगरातील रिक्षाचालकाची 1 लाख 20 हजारांत फसवणूक केल्याप्रकरणी चार जणाांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शाहूनगरात काशीनाथ तुकाराम चौधरी (वय63) हे रिक्षाचालक वास्तव्यास आहेत. त्यांची बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील देवकाबाई सचिन इंगळे व पूजा सचिन इंगळे तसेच कुसुंबा (ता.जळगाव) येथील रेखा पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याशी ओळखी आहे. या ओळखीचा फायदा घेत चार जणांनी काशीनाथ चौधरी यांचा मुलगा याचा विवाह पूजा इंगळे हिच्यासोबत करवून देण्याचे ठरविले. त्यानंतर देवकाबाई सचिन इंगळे या महिलेने तिच्या घरावरील कर्ज फेडण्याकरिता 1 लाख 20 हजार रुपये घेतले. यादरम्यान संबंधितांनी ज्या पूजा सोबत काशिनाथ यांच्या मुलाचे लग्न ठरविले होते. तर…
साईमत मलकापुर प्रतिनिधी तालुक्यातील अनुराबाद येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने १३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास नारखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्रीनिवास नारखेडे सरांनी कित्येक वर्षापासून अनुराबाद गावातील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या आदर्श शिक्षक सेवेच्या माध्यमातून उत्तम उत्कृष्ट ज्ञान शिक्षण दिले आहे. तसेच नारखेडे सर हे ३१ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या ॠणामधुन उतराई होण्यासाठी सरपंच ज्ञानदेव ढगे यांनी यावेळी झेंडावंदन करण्याचा मान मुख्याध्यापक नारखेडे यांना दिला. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक वृंद, ग्रा. पं. कर्मचारी वृंद विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
साईमत मलकापुर प्रतिनिधी तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायत मध्ये शासन निर्देशा नुसार ग्रामपंचायत ने ठरवल्याप्रमाणे दि.12 ऑगस्ट शनिवार रोजी”मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान वाकोडी येथे संपन्न झाले. कार्यक्रमात सुरुवातीला शिला फलकाचे सरपंच व माजी सैनिकांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ माजी सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली. त्यानंतर आमंत्रित माजी सैनिक हृदयाथ गावंडे, श्रीराम शिंगोटे, विश्वनाथ गाडेकर, निळकंठ बढे, पुरुषोत्तम मुऱ्हेकर, रघुनाथ खर्चे, कमलाकर वराडे,निनु चोपडे,गजानन खाडे, कैलास वाकोडे, मुरलीधर झनके, अनिल तेलंग,ए.आर. राजपूत सह १५ माजी सैनिकांचा सरपंच शुभम काजळे यांच्या हस्ते शाल टोपी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन माजी सैनिकांना गौरविण्यात आले. गटविकास अधिकारी…