साईमत मलकापुर प्रतिनिधी
तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायत मध्ये शासन निर्देशा नुसार ग्रामपंचायत ने ठरवल्याप्रमाणे दि.12 ऑगस्ट शनिवार रोजी”मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान वाकोडी येथे संपन्न झाले. कार्यक्रमात सुरुवातीला शिला फलकाचे सरपंच व माजी सैनिकांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ माजी सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
यावेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली. त्यानंतर आमंत्रित माजी सैनिक हृदयाथ गावंडे, श्रीराम शिंगोटे, विश्वनाथ गाडेकर, निळकंठ बढे, पुरुषोत्तम मुऱ्हेकर, रघुनाथ खर्चे, कमलाकर वराडे,निनु चोपडे,गजानन खाडे, कैलास वाकोडे, मुरलीधर झनके, अनिल तेलंग,ए.आर. राजपूत सह १५ माजी सैनिकांचा सरपंच शुभम काजळे यांच्या हस्ते शाल टोपी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन माजी सैनिकांना गौरविण्यात आले.
गटविकास अधिकारी उद्धव होळकर, सहाय्यक गटविकास अधिकारी संदिप नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमास पर्यवेक्षिका मनिषा डोंगरे मॅडम, ग्रामपंचायतचे सरपंच शुभम काजळे, सचिव कैलास चौधरी, तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, कर्मचारी वृंद ग्रा.प. उपस्थित होते.त्यानंतर पूर्वा नगर येथील अमृत वाटीकेत ७५ देशी वृक्षांचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.