Author: Saimat

साईमत बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील चिखली बु।। येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक २०२३/२४वर्षे मराठा सेवा संघा तर्फे साजरा करण्यात येत असून या निमित्ताने चिखली बु येथे राज्यभिषेक पुस्तके वाटप करून वाचन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४९ वा राज्यभिषेक सोहळा ६ जुन रोजी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा केला, तसा मराठा सेवा संघाने विविध कार्यक्रमाचे आयोजन संपुर्ण भारतभर साजरा केला. ६ जुन २०२३ ते ६ जुन २०२४ हे संपुर्ण वर्ष मराठा सेवा संघ “शिवराज्यभिषेक त्रि शतकोत्तर सुवर्तमहोत्सवी वर्ष” म्हणुन विविध कार्यक्रम , संस्था, शाळा विद्यालय , स्थानिक स्वराज्य संस्था यांना सोबत घेऊन साजरे करणार आहेत, त्यातीलच एक भाग म्हणुन चिखली बु।। ता बोदवड…

Read More

साईमत भुसावळ प्रतिनिधी येथील आदिवासी ठाकूर समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भारत वर्षाच्या इतिहासातील संस्मरणीय प्रसंग नमूद असलेल्या शिवराज्याभिषेकाचा पराक्रम या ग्रंथाचे वाटप करण्यात आले. येथील आदिवासी ठाकूर समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून युवकांना देशाचे स्वातंत्र्य संस्कृती आणि संस्कार यांची जपणूक कशी व्हावी, कशी करावी, त्यांना तीमिरातून तेजाकडे जाण्याचा मार्ग मिळावा. खऱ्या अर्थाने भारत समृद्ध , संपन्न , आदर्श बलशाली सशक्त व्हावा व आजची युवा पिढी मार्फत उद्याच्या उज्वल भारताचे भविष्य घडविण्यात यांचा खारीचा वाटा असावा या उदात्त हेतूने आदिवासी ठाकूर समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भारत वर्षाच्या इतिहासातील संस्मरणीय…

Read More

साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे दिनांक 9 ऑगस्ट रोजी ‘माझी मातृभूमी माझा देश’ यावर आधारित ‘पंच-प्रण’ प्रतिज्ञा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने ‘माझी मातृभूमी माझा देश’ यावर आधारित ‘पंच-प्रणाची’ शपथ घेतली. या याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य महाजन यांनी कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडविण्यासाठी आपण सर्वांनी ‘पंच-प्रण’ आत्मसात करून भारत देशाला विकसित देश करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल पाटील, उपप्राचार्य राजेंद्र चौधरी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संजीव साळवे, ग्रंथालयाचे अधीक्षक प्रा.सरोदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. ताहिरा मीर,…

Read More

साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.ए.महाजन यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य व समाज या क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला व टिळकांनी राजकीय व समाज सुधारक म्हणून केलेल्या कार्याचा उपस्थितांना परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विजय डांगे यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. दीपक बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रंथालय अधीक्षक प्रा. एन.जी. सरोदे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. आर.टी. चौधरी,…

Read More

साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी बहिणाबाई चौधरी अशिक्षित असून सुद्धा मराठी साहित्याच्या जगतात साहित्यसम्राज्ञी बनल्या. त्यामुळे आजच्या युवा पिढीसाठी बहिणाबाई दीपस्तंभ आहेत, त्यामुळे आजच्या युवकांनी कवी, लेखक व वक्ता बनून बहिणाबाईंचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे यांनी केले. श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजेंद्र चौधरी होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…

Read More

साईमत भुसावळ प्रतिनिधी येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाने केंद्रिय मूल्यमापन प्रकल्प यशस्वीरित्या राबविल्या बद्दल प्राचार्य डॉ राजू फालक यांना विद्यापीठाचा परीक्षा मूल्यमापन प्राचार्य कार्य गौरव पुरस्कार तसेच प्रा दीपक जैस्वार यांना परीक्षा मूल्यमापन उत्कृष्ट प्रकल्प समन्वयक सेवा गौरव पुरस्कार 11 ऑगस्ट रोजी विद्यापीठात माजी कुलगुरू डॉ आर एस माळी, कुलगुरू डॉ व्ही एल माहेश्वरी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राजेंद्र नानंवरे उद्योगपती अशोक जैन, प्र – कुलगुरू डॉ एस टी इंगळे कुलसचिव विनोद पाटील उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Read More

साईमत यावल प्रतिनिधी शिवा संघटनेने दूरदृष्टी ठेऊन वीरशैव लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची सर्वप्रथम मागणी केली व अनेक वर्षांपासून प्रयत्न पाठपुरावा केला. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची शासनाकडून मंजुरीमुळे शिवा संघटनेच्या पाठपुराव्यास यश मिळाल्याचे संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांनी सांगितले. महामंडळासाठी सर्वप्रथम अनेक वर्षांपासून यशस्वी मागणी, प्रयत्न पाठपुरावा करणारे शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर पंडि यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महाराष्ट्र राज्य शासना यांनी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या महाराष्ट्र वीरशैव मोक्षधाम योजना, महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती, कपिलधार तिर्थक्षेत्र दर्जा, शासकीय महापूजा,…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात संगणक विज्ञान अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागाकडून अभियांत्रिकेतील “कम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. आयआयटी इंदूर येथील संगणक विभागातील प्राध्यापक डॉ.रणवीर सिंग हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्याच्याच हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ॲकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख सोनल पाटील तसेच आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स विभागप्रमुख प्रा. प्रमोद गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. सोनल पाटील यांनी संगणक विज्ञान अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागाची…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने जळगाव ग्रामीण मतदारसंघात भाविक भक्तांचे व पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या जळगाव तालुक्यातील रिधुर येथील प्राचीन अवचित हनुमान मंदिर , पळसोद येथिल पुरातन व प्राचीन महादेव मंदिर व धरणगाव तालुक्यातील वाघळू द येथिल श्री विठ्ठल मंदिर या तीर्थस्थळांच्या व पर्यटन स्थळांच्या पायाभूत विकासासाठी पर्यटन वृद्धी व्हावी, स्थानिकांना लहान मोठा रोजगार उपलब्ध व्हावा तसेच भावी भक्तांसाठी सुख सोयी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पर्यटन अंतर्गत ६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे भाविक भक्तांच्या आनंदात भर पडली असून येथील भावी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी धामणगाव व परिसरातील विकासासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करून ग्रामपंचतीनी समन्वयातून गावाचा विकास साधावा असे नम्र आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी धामणगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील हे होते. धामणगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना – ३६ लक्ष, मूलभूत सुविधा अंतर्गत (२५१५) सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे – २० लक्ष, गावअंतर्गत काँकटीकरण करणे – १० लक्ष, हायस्कूल परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे – ३ लक्ष तर मनरेगा अंतर्गत चौकात व रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसविणे – ३० लक्ष असे…

Read More