साईमत जळगाव प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानाने सारा देश देशभक्तीने जागा झाला असून या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या १५ ऑगस्ट २०२३ रोजी होत आहे. याचे औचित्य साधून यावर्षी “मेरी माटी मेरा देश” अर्थात ‘माझी माती माझा देश’ या संकल्पनेला जनमाणसापर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यानुसार महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तसेच शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगावचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका युवासेनेतर्फे जळगाव ग्रामीणमध्ये ‘माझी माती माझा देश’ हे अभियान उत्साहात राबविण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या ‘माझी माती माझा देश’ या अभियानांतर्गत सोमवारी तरुणाईतर्फे…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील जुन्या औद्योगिक वसाहत मधील सिद्धिविनायक प्राथमिक माध्यमिक व इंग्रजी माध्यम विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा 77वा स्वतंत्रता दिवस समारोह उत्साहात साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंतनु भारद्वाज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या पदाधिकारी डॉक्टर अमृता सोनवणे , नगरसेविका सौ रंजनाताई वानखेडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक उत्तम दादा सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय वानखेडे श्री.जनार्धन खडके उपस्थित होते . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष व ट्री गार्ड वाटप करण्यात आलेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनकडून 77 जागी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवडीसाठी लिग्रांड प्रायव्हेट लिमिटेड कडून झाडांची रोपे व ट्री गार्ड उपलब्ध करून देण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर अशी देशभक्तीपर…
साईमत सोयगाव प्रतिनिधी सोयगाव येथे संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात 76 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी माजी जि.प.अध्यक्ष, औरंगाबाद हरिश्चंद्र लघाने यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.यावेळी अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ बाबुरावजी काळे, व संस्थेचे सचिव प्रकाश बाबुरावजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल च्या विद्यार्थिनींनी देशभक्ती गीत .विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. व इ.10वी उतीर्ण व निबंध स्पर्धेत सहभाग असलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक वितरण करण्यात आले. या ध्वजारोहणासाठी सोयगाव नगरपंचायत चे नगराध्यक्षा श्रीमती आशा तडवी,संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे ,ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य…
साईमत यावल प्रतिनिधी जळगाव (Jalgaon) जिल्हा बँकेच्या यावल तालुक्यातील ज्येष्ठ महिला सभासद श्रीमती पुष्पाताई लीलाधर चौधरी यांच्या शुभहस्ते जळगाव जिल्हा बँकेचे झेंडावंदन करण्यात आले.जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे रावेर लोकसभा व विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून कौतुक आणि स्वागत केले जात आहे. एकेकाळी आशिया खंडात नावारूपाला असणारी दगडी बँक म्हणजेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Jalgaon District Central Cooperative Bank) या बँकेमध्ये चेअरमन म्हणून जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील राजकीय ज्येष्ठ नेत्यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळलेली आहे परंतु विद्यमान चेअरमन भाऊसाहेब संजय मुरलीधर पवार यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन झाल्यानंतर प्रथम झेंडावंदन त्यांच्या…
साईमत सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील रामपूर वाडी आदिवासी पाड्यावर जरंडी प्राथमिक केंद्रअंतर्गत येणाऱ्या जिल्हापरिषदेच्या शाळेवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “The Grace mission” छत्रपती संभाजीनगर यांच्या उपक्रमातून इयत्ता पहिली ली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, नोटबुक पेन या शालेय साहित्याची वाटप करण्यात आली यावेळी आकाश उजगरे ,योगेश साबळे,प्रतिक गायकवाड ,पावन रोकडे वसीम शेख सर ,मिलिंद कोल्हे सर , संतोष मोरे राजेंद्र मोरे दशरथ चौधरी दीपक भोटकर यांची उपस्थिती होती रामपूर वाडी आदिवासी पाड्यावर या उपक्रमामुळे आदीवासी विद्यार्थ्यांचा चेहरा खुळून आला होता.
साईमत चोपडा प्रतिनिधी भगिनी मंडळ संचलित, ललित कला केंद्र, चोपडा (Chopda) येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान “मेरी माटी मेरा देश” हा पंचप्रण शपथ ग्रहण सोहळा घेण्यात आला. या प्रसंगी ललित कला केंद्रातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राचार्य, संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीसह उपस्थित प्रत्येकाने आपल्या उजव्या हाताच्या मुठीत भारत भूमीची पवित्र माती घेवून पंचप्रण शपथ ग्रहण करण्यात आले. यावेळी पंचप्रणाचे वाचन प्रा. संजय नेवे यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्राचार्य बारी यांनी केले. याप्रसंगी भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, ललित कला केंद्राचे प्राचार्य प्रा.सुनिल बारी, बालक…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये सोमवारी देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. गीतगायन स्पर्धेची सुरूवात सरस्वती व भारतमाता प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली. कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य प्रविण सोनवणे व समन्वयिका स्वाती अहिरराव उपस्थित होत्या. ही स्पर्धा इयत्ता पहिली ते दुसरी लहान गट व इयत्ता तिसरी ते पाचवी मोठ्या गटासाठी ठेवण्यात आली होती. स्पर्धा हाऊसनुसार विभागण्यात आली होती. नेताजी हाऊस, राणी लक्ष्मीबाई, आझाद आणि टिळक हाऊस असे गट करण्यात आले होते. कार्यक्रम प्रमुख गणेश देसले आणि ज्ञानेश्वर पवार होते. परीक्षक म्हणून रंजना बाभुळके आणि स्वाती देशमुख होत्या. विद्यार्थ्यांनी हावभाव सहित देशभक्तीपर समूह गीत सादर केले. शेवटी…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा’ अंतर्गत सोमवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय ध्वजाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ.विनोद पाटील व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे महत्त्व, मागील 76 वर्षातील राष्ट्राची झालेली यशस्वी वाटचाल आणि प्रगती तसेच येणाऱ्या काळात देशाच्या सर्वांगीण विकासात विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली. डॉ. तुषार रायसिंग यांनी प्रस्ताविक केले. त्याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करण्यात आले. ‘हर घर तिरंगा ’ हे अभियान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेली राष्ट्रव्यापी…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे…क्षणात येतेे सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे…अशा सुंदर शब्दात श्रावणमासाचे वर्णन करणारे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची जयंती समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे साजरी करण्यात आली. याप्रसंगी साहित्यिकांनी त्यांच्या जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्या कविताही सादर केल्या. कवींनी यांना वाहिली आदरांजली कार्यक्रमाच्या सुरुवातीला रानकवी ना.धों. महानोर, ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके, सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बालकवींच्या पणती विशाखा कुलकर्णी, प्रा.प्रकाश महाजन, निवृत्तीनाथ कोळी, पुष्पलता कोळी, युवराज सोनवणे, अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, गोविंद पाटील, किशोर पाटील, भीमराव सोनवणे, किशोर नेवे, प्रज्ञा…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील डान्स क्लब व म्युझिक क्लबच्या माध्यमातून भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्त ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयात देशभक्तीपर गीतगायन आणि देशभक्तीपर नृत्य आदी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध जोशपूर्ण देशभक्तीपर गीते तसेच नृत्याचे विलोभनीय व बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेली तिरंगी वेशभूषा स्पर्धेचे आकर्षण ठरले. सदर उपक्रमावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ॲकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच भावनगर येथील स्वामी शहानंद कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या…