साईमत मलकापुर प्रतिनिधी
तालुक्यातील अनुराबाद येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने १३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास नारखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
श्रीनिवास नारखेडे सरांनी कित्येक वर्षापासून अनुराबाद गावातील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या आदर्श शिक्षक सेवेच्या माध्यमातून उत्तम उत्कृष्ट ज्ञान शिक्षण दिले आहे. तसेच नारखेडे सर हे ३१ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या ॠणामधुन उतराई होण्यासाठी सरपंच ज्ञानदेव ढगे यांनी यावेळी झेंडावंदन करण्याचा मान मुख्याध्यापक नारखेडे यांना दिला. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक वृंद, ग्रा. पं. कर्मचारी वृंद विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.