साईमत, प्रतिनिधी, जळगाव भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानाने सारा देश देशभक्तीने जागा झाला असून या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट रोजी होत आहे. त्याचे औचित्य साधून यावर्षी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या संकल्पनेला जनमाणसापर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यानुसार महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तसेच शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगावचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका युवासेनेतर्फे जळगाव ग्रामीणमध्ये ‘माझी माती माझा देश’ हे अभियान उत्साहात राबविण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या ‘माझी माती माझा देश’ या अभियानांतर्गत सोमवारी तरुणाईतर्फे निसर्गाच्या साक्षीने…
Author: Saimat
साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहर महानगरपालिका माजी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत हँड्स ऑफ होप ग्रुपच्या वतीने भव्य मोफत वृक्ष वाटप उपक्रम रविवारी राबवण्यात आला. सदर कार्यक्रमात महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महापौरांच्या हस्ते नागरिकांना रोपे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. एक नागरिक या नात्याने आपण समाजाला काही दिले पाहिजे यासाठी या कार्यक्रमात वेगवेगळ्या महाविद्यालयीन 15 ते 20 विद्यार्थ्यांंनी एक ग्रुप तयार करून स्वखर्चातून एक मदतीचा हात म्हणून गरजू व्यक्तींना कांबळी वाटप, जीवनावश्यक वस्तू वाटप, अन्न वाटप , भटक्या पाळीव कुत्र्यांना वाचवण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह बेल्स घातले, गाईचे रक्षण, भटक्या पाळीव प्राण्यांना जखमी झाल्यावर औषधोपचार करणे, उन्हाळ्यात चौकाचौकात पाणपोई उभारणे , पक्षांसाठी…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 15 वर्षीय अल्पवयीन घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले. मुलगी सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत आली नाही अथवा इतरत्र दुसरीकडे कुठे मिळूनही आली नाही. अखेर अल्पवयीन मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याबाबत एमआयडीसी पोलिसांना तक्रार दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहेत.
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील नागरिकांच्या रस्त्यांच्या समस्या लक्षात घेता आमदारांसह मंत्री महोदयांनी शेकडो कोटी रुपयांची निधी शहराच्या विकासासाठी मंजूर केला होता. कामाची गुणवत्ता उत्तम दर्जाची असावी, यासाठी मनपा हद्दीतील रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले. शेकडो कोटी रुपयांची कामे झाली. प्रत्यक्षात मात्र झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून खड्डेमय जळगाव असे चित्र सर्वदूर पहावयास मिळत आहे. उपविभागीय अभियंता गिरीश सूर्यवंशी यांची गुणवत्तेची कामे करून घेण्याची जबाबदारी असतानाही फक्त आपल्या आर्थिक हव्यासापोटी कोट्यवधी रुपयांचा निधी खड्ड्यात टाकण्याचे काम यांनी केले आहे. असे असतानाही कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्या जवळचे असल्याने फक्त आर्थिक मलिदा लाटण्यात ते मग्न असल्याचे…
साईमत यावल प्रतिनिधी यावल तालुक्यातील मोहराळा येथील ३३ वर्षीय तरूणाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलीसस्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उत्तम भोजु उर्फ छोटु पाटील (वय-३३) रा. मोहराळा ता.यावल असे मृत तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील मोहराळा येथे उत्तम भोजु उर्फ छोटु पाटील हा आपल्या आई व भावासह वास्तव्याला होता. तो एका दुर्धर आजाराने ग्रस्त होता. रविवारी १३ ऑगस्ट रोजी त्याची आई शेतात कामाला गेली होती. त्यावेळी तो घरी एकटाच होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवन…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहरातील ख्वॉजामिया दर्गाजवळील मोकळ्या जागेत गांजाचा नशा करणाऱ्या एका तरूणावर जिल्हापेठ पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गणेश कॉलनी भागातील ख्वॉजामिया दर्गा परिसरात असलेल्या भिंतीच्या आडोश्ाात रहिम निसार बिस्ती (वय-37) रा. शाहूनगर, जळगाव हा तरूण अवैधरित्या गांजाचे सेवन करत असताना शनिवारी रात्री आढळून आला. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत नशाचे साहित्य त्याच्याकडून हस्तगत केले. त्यानंतर पोकॉ कैलास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रहिम बिस्ती याच्याविरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य प्रतिबंधात्मक कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहे.
साईमत सावदा तालुका रावेर प्रतिनिधी येत्या २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या सी.टी.इ.टी.परीक्षेच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेत बसणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे. ही परीक्षा त्यांना अवघड जाऊ नये, यासाठी येथील सोहेल खान फाउंडेशनच्या वतीने एक दिवशी सी.टी.इ.टी.मार्गदर्शन शिबीर शहरातील ख्वाजा नगर हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. सोहेल खान फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल खान सैईदुल्ला खान,अय्यूब सर, पत्रकार फरीद शे, युसूफ शाह आदींनी सदर शिबीराचे आयोजण केले होते. शिबिरास जिल्ह्याभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक अली अंजूम रिज़वी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कॅम्पचे अध्यक्षस्थानी सावदा येथील डॉ.अन्सार खान गुलाम गौस खान होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा राष्ट्रवादीची मझहर खान, जळगाव उदगटृष्टीचे अनीस शाह, शिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष…
साईमत भुसावळ प्रतिनिधी शहरातील तापी नदीकाठावरील महादेव मंदिराजवळ तीन दिवसीय पुरूष जातीचे मृत अर्भक आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. मृत अर्भक तापीच्या पाण्यात वाहून आले असावे किंवा अज्ञात मातेने आणून टाकले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. तापी नदीकाठावरील महादेव मंदिराजवळील मोकळ्या जागेत पुरूष जातीचे तीन दिवसीय बालकाचे मृत व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन याप्रकरणी सोनी सपकाळे (२९, भिलवाडी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार फिरोज रज्जाक तडवी करत आहे.
साईमत सोयगाव प्रतिनिधी तालुक्यातील फर्दापूर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांची 3 कोटी 75 लाख अडकले असून याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना ठेवीदारांनी लेखी निवेदन देऊन पत संस्थेत अडकलेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी करून रक्कम परत न मिळाल्यास आमच्या कडे आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नसल्याची खंत व्यक्त केली आहे. दोनशे दोन कोटींचा घोटाळा उघड झालेल्या व सध्या अटकेत असलेल्या अंबादास मानकापे यांच्या आदर्श नागरी पतसंस्थेची फर्दापूर येथे एकमेव शाखा आहे या शाखेत फर्दापूर परिसरातील छोटे व्यापारी, शेतकरी मजूर कष्टकरी सेवानिवृत्त कर्मचारी व्यावसायिक असे साडे तीनशे पेक्षा जास्त सभासदांनी आपली फिक्स डिपॉजिट सेविंग व पिग्मी अशी वेगवेगळी खाते उघडून आपली…
साईमत सावदा प्रतिनिधी सावदा येथील नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर, श्री.आ. गं. हायस्कूल व ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात स्व.नानासाहेब विष्णू हरी पाटील यांच्या जयंतीनिमित्त गरीब व होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी दादासाहेब वसंतराव विष्णू पाटील औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मनोज पाटील, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सी.सी. सपकाळे, मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे , उपनगराध्यक्क्षा नंदाबाई लोखंडे, शिक्षक पालक संघाचे सदस्य शामकांत पाटील, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष कल्पना ठोसरे , श्रीकांत वाणी, बी.जी. भालेराव, जे.व्ही. तायडे आदिंची उपस्थिती होती. श्री.आ. गं. हायस्कूलच्या इयत्ता सहावी तुषार कोळी, योगेश चौधरी, तन्मय अजहर शहा फकीर, इयत्ता सातवी कार्तिक साळी, आदित्य सरोदे, फाल्गुन…