Author: Saimat

साईमत, जळगाव, प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकिय आरोग्य संस्थामधून देण्यात येणा-या आरोग्य सेवा, तपासणी व त्याबाबतच्या रुग्णशुल्क निःशुल्क करण्याबाबत आरोग्य विभागाने शनिवारी 12 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढले आहे. हा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या सरकारी रुग्णालयांना लागू राहणार नाही. त्यामुळे आरोग्य विभागातील भ्रष्टाचार काहीसा थांबणार असल्याच्या जनतेतून प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोग्य विभागातील सर्व रुग्णालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून रुग्णांना मोफत उपचार मिळतील. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये व जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील स्त्री रुग्णालय येथे रुग्णांना आता मोफत उपचार मिळणार आहेत. मुख्यमंत्री यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून सर्व शासकिय आरोग्य संस्थामधून देण्यात येणा-या सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा निःशुल्क करण्याबाबत विधानसभेमध्ये…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‌‘मेरी मिट्टी मेरा देश‌’ या अभियानांतर्गत महानगरपालिकेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने शनिवारी मनपा संचलित बालवाडीतील मुले तसेच मनपा शाळेतील इयत्ता 9 वी व 10 वीच्या विद्यार्थिनींना सकाळी 9.30 वाजता शालेय गणेश व स्कूलबॅग वाटप प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात करण्यात आले. यावेळी महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थी, विद्यार्थिनींना शालेय गणवेश व बॅग वाटप करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्रीताई सुनील महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मनपा शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवणे व गुणवत्ता वाढवणे आवश्यक असल्याचे सांगून विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. या…

Read More

साईमत भुसावळ प्रतिनिधी भुसावळ दीपनगर वसाहती मधील तरुण शुभम मोहन सरदार याने संघ लोकसेवा आयोगाच्या केंद्रिय सुरक्षा सेवेच्या २०२२ च्या परिक्षेत दैदिप्यमान यश मिळवत साडेतीन लाख विद्यार्थ्यांमधून देशात १०७ वा तर अनुसूचित जाती मधून देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला. यशाचा मानकरी ठरलेल्या शुभमवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दीपनगर वसाहती मधील भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रामध्ये सुरक्षितता अधिकारी म्हणून कार्यरत मोहन सरदार तथा आई सुनिता सरदार यांचे सुपुत्र शुभम मोहन सरदार याने लोकसेवा आयोगाच्या केंद्रिय सुरक्षा सेवेच्या २०२२ च्या परिक्षेत दैदिप्यमान यश मिळवत देशभरातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांमधून देशात १०७ वा तर अनुसूचित जाती मधून देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला. त्याच्या…

Read More

साईमत यावल प्रतिनिधी यावल येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरावर शनिवार दि.12 ऑगस्ट रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यात लहान गटात प्रथम क्रमांक हर्षल बुरुजवाले तर मोठ्या गटातून प्रथम क्रमांक विवेक पाटील यांनी पटकावला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक तथा अध्यक्ष मुख्याध्यापक जी. डी. कुलकर्णी हे होते. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षक पी. एस. सोनवणे, प्रा. एस. एम. जोशी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनामध्ये 42 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला स्पर्धेसाठी मुख्य विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान व उपविषय आरोग्य , पर्यावरणासाठी जीवनशैली, शेती, दळणवळण आणि वाहतूक, संगणकीय विचार असे होते. कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक ए. डी. चव्हाण, ए. एस. सूर्यवंशी,…

Read More

साईमत सोयगाव प्रतिनिधी सोयगाव पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी नवीन टाईप 1,3,4 व टाईप 2 या निवासस्थान बांधकामाच्या 20 कोटी 68 लाख रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवार दि ११रोजी अल्पसंख्याक विकास,औकाफ व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, सोयगाव शहरातील पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी नवीन निवासस्थान व्हावे कारण जुने निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली आहे अशी मागणी अधिकारी-कर्मचारी यांनी केली होती. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना नवीन निवासस्थान व्हावे यासाठी राज्य शासनाने टाईप 1,3,4 निवासस्थान बांधकामासाठी 9 कोटी 85 लाख,तर टाईप 2 निवासस्थान बांधकामासाठी 10 कोटी 83 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.सदरील निवासस्थानचे काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे जळगाव खुर्द येथे गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी गोदावरी फार्म फ्रेशचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. शेतातील ताजा व स्वच्छ माल तसेच कृषी महाविद्यालयात निर्मित अन्य उत्पादनेही येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा येथे गोदावरी फार्म फ्रेशचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी आजी, सचिव डॉ.वर्षा पाटील, परिसर संचालक डॉ. एस. एम. पाटील, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च डॉ.अशोक चौधरी, ॲग्री कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ.शैलेश तायडे, डॉ.पी.आर.सपकाळे, डायरेक्टर ऑफ हॉर्टीकल्चर प्रा.सतीश सावके,…

Read More

साईमत मलकापूर प्रतिनिधी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन व ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे स्पोर्ट्स क्लब ठाणे येथे दिनांक १५ ते १९ ऑगस्टला ज्युनिअर राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाची घोषणा बुलढाणा जिल्हा बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विजय पळसकर यांनी नुकतीच केली. या वर्षी झालेल्या दोन जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेतून प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा जिल्हा संघ तयार करण्यात आला असून हा संघ ठाणे मुंबई येथील राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी शेगाव येथील रुद्र कचरे व मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी जळगाव जामोद येथील रेवा पाचपोर यांची…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव  गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे शनिवार दि. 12 ऑगस्टपासून सुरु झालेल्या रॅगिंग प्रतिबंधक सप्ताहानिमित्त नशिराबाद पोलिस स्थानकातर्फे विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालय स्तरावर रॅगिंग होऊ नये, अपराध होऊ नये, याकरिता हा उपक्रम घेण्यात आला असून येत्या 18 ऑगस्टपर्यंत असणाऱ्या या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार रॅगिंग करणे हा दंडनीय अपराध आहे. यानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या निर्देशानुसार, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2023 या कालावधीत अँटी-रॅगिंग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातर्फे 12 ऑगस्ट हा दिवस रॅगिंग प्रतिबंध दिवस म्हणून पाळण्यात आला. तसेच रॅगिंग प्रतिबंधक…

Read More

साईमत फैजपूर ता. यावल प्रतिनिधी ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाम विस्तार सोहळ्याच्या वर्धापनदिनानिमित्त धनाजी नाना महाविद्यालयातील ग्रंथालय विभागात कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल भंगाळे यांच्या शुभहस्ते डॉ. रंगनाथन व बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी ग्रंथपाल आय. जी. गायकवाड यांनी डॉ. रंगनाथन व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या विषयी माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉ. भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथांचे महत्व व त्यांचे वाचन आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे समजवून सांगितले. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शन विद्यार्थी व प्राध्यापकाकरिता आयोजित करण्यात आले होते.…

Read More

साईमत वरणगाव ता. भुसावळ प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ” मेरी मिट्टी मेरा देश ” हे अभियान देशात राबवण्यात येणार असून वरणगाव नगर परिषदेत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानातंर्गत माजी मंत्री आ. संजय सावकारे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत देशासाठी बलीदान देणाऱ्या शुरविरांसाठी समर्पित अभियान देशभरात राबवले जात आहे . यामध्ये ‘ मेरी मिट्टी , मेरा देश ‘ या अभियानातंर्गत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी तसेच मातृभुमी झटणारे व प्राणाची आहुती देणाऱ्या शुरविरांचा सन्मान असा कार्यक्रम वरणगाव नगर परिषदेच्या माध्यमातून राबवला जाणार आहे . १४ ऑगस्ट रोजी सकाळी…

Read More