Author: Saimat

साईमत मलकापुर प्रतिनिधी खामगांवकडून मलकापुरकडे घेवुन जाणार ६९ किलो ५०० ग्रॅम गांजा मलकापुर पोलिसांनी सापळा रचून पकडला आहे. सदर कारवाईत ८ लाख २६ हजार ८०० रुपये किंमतीच्या गांजासह एक सुझुकी कंपनीची कार अंदाजे किंमत ५ लाख रुपये असा एकूण १३ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. खामगांवकडून मलकापुर शहरात विक्रीसाठी गांजा आणला जाणार असल्याची गुप्त माहिती मलकापुरचे पोनि अशोक रत्नपारखी यांना मिळाली होती. त्यानुसार सपोनी पंजाबराव शेळके, डिबी पथकाचे के.पी तायडे, आसिफ शेख, प्रमोद राठोड, ईश्वर वाघ,गोपाल तारुळकर, प्रविण गवई,आनंद माने, गोपाल इंगळे, मंगेश चरखे आदी गस्तीवर असतांना सदर बातमीची पडताळणी करून कारवाई करण्याचे…

Read More

साईमत, जळगाव, प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद येथील के. एस. टी. हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकाचा पदभार घेण्यावरुन उपशिक्षकाला अडवून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अक्सानगर भागात उपशिक्षक शेख साबीर अहमद खलिलोद्दीने (वय 48) हे राहतात. ते नशिराबाद येथील के.एस. टी. उर्दू हायस्कूलात कार्यरत आहेत. शेख साबीर हे शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता त्याच्या के. एस. टी. उर्दू शाळेत मुख्याध्यापक पदाचा पदभार घेणार होते. यासाठी ते शाळेत आले असता त्यांना वसीम अक्रम शेख मुसा. रा. नशिराबाद याने शिवीगाळ करत बेदम मारहाण केली, तू उद्या शाळेत कसा येतो, तुला बघतो,…

Read More

साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहरातील शाहूनगरातील रिक्षाचालकाची 1 लाख 20 हजारांत फसवणूक केल्याप्रकरणी चार जणाांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शाहूनगरात काशीनाथ तुकाराम चौधरी (वय63) हे रिक्षाचालक वास्तव्यास आहेत. त्यांची बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील देवकाबाई सचिन इंगळे व पूजा सचिन इंगळे तसेच कुसुंबा (ता.जळगाव) येथील रेखा पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याशी ओळखी आहे. या ओळखीचा फायदा घेत चार जणांनी काशीनाथ चौधरी यांचा मुलगा याचा विवाह पूजा इंगळे हिच्यासोबत करवून देण्याचे ठरविले. त्यानंतर देवकाबाई सचिन इंगळे या महिलेने तिच्या घरावरील कर्ज फेडण्याकरिता 1 लाख 20 हजार रुपये घेतले. यादरम्यान संबंधितांनी ज्या पूजा सोबत काशिनाथ यांच्या मुलाचे लग्न ठरविले होते. तर…

Read More

साईमत मलकापुर प्रतिनिधी तालुक्यातील अनुराबाद येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने १३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास नारखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्रीनिवास नारखेडे सरांनी कित्येक वर्षापासून अनुराबाद गावातील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या आदर्श शिक्षक सेवेच्या माध्यमातून उत्तम उत्कृष्ट ज्ञान शिक्षण दिले आहे. तसेच नारखेडे सर हे ३१ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या ॠणामधुन उतराई होण्यासाठी सरपंच ज्ञानदेव ढगे यांनी यावेळी झेंडावंदन करण्याचा मान मुख्याध्यापक नारखेडे यांना दिला. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक वृंद, ग्रा. पं. कर्मचारी वृंद विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

साईमत मलकापुर प्रतिनिधी तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायत मध्ये शासन निर्देशा नुसार ग्रामपंचायत ने ठरवल्याप्रमाणे दि.12 ऑगस्ट शनिवार रोजी”मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान वाकोडी येथे संपन्न झाले. कार्यक्रमात सुरुवातीला शिला फलकाचे सरपंच व माजी सैनिकांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ माजी सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली. त्यानंतर आमंत्रित माजी सैनिक हृदयाथ गावंडे, श्रीराम शिंगोटे, विश्वनाथ गाडेकर, निळकंठ बढे, पुरुषोत्तम मुऱ्हेकर, रघुनाथ खर्चे, कमलाकर वराडे,निनु चोपडे,गजानन खाडे, कैलास वाकोडे, मुरलीधर झनके, अनिल तेलंग,ए.आर. राजपूत सह १५ माजी सैनिकांचा सरपंच शुभम काजळे यांच्या हस्ते शाल टोपी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन माजी सैनिकांना गौरविण्यात आले. गटविकास अधिकारी…

Read More

साईमत, जळगाव, प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकिय आरोग्य संस्थामधून देण्यात येणा-या आरोग्य सेवा, तपासणी व त्याबाबतच्या रुग्णशुल्क निःशुल्क करण्याबाबत आरोग्य विभागाने शनिवारी 12 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढले आहे. हा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या सरकारी रुग्णालयांना लागू राहणार नाही. त्यामुळे आरोग्य विभागातील भ्रष्टाचार काहीसा थांबणार असल्याच्या जनतेतून प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोग्य विभागातील सर्व रुग्णालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून रुग्णांना मोफत उपचार मिळतील. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये व जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील स्त्री रुग्णालय येथे रुग्णांना आता मोफत उपचार मिळणार आहेत. मुख्यमंत्री यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून सर्व शासकिय आरोग्य संस्थामधून देण्यात येणा-या सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा निःशुल्क करण्याबाबत विधानसभेमध्ये…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‌‘मेरी मिट्टी मेरा देश‌’ या अभियानांतर्गत महानगरपालिकेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने शनिवारी मनपा संचलित बालवाडीतील मुले तसेच मनपा शाळेतील इयत्ता 9 वी व 10 वीच्या विद्यार्थिनींना सकाळी 9.30 वाजता शालेय गणेश व स्कूलबॅग वाटप प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात करण्यात आले. यावेळी महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थी, विद्यार्थिनींना शालेय गणवेश व बॅग वाटप करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्रीताई सुनील महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मनपा शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवणे व गुणवत्ता वाढवणे आवश्यक असल्याचे सांगून विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. या…

Read More

साईमत भुसावळ प्रतिनिधी भुसावळ दीपनगर वसाहती मधील तरुण शुभम मोहन सरदार याने संघ लोकसेवा आयोगाच्या केंद्रिय सुरक्षा सेवेच्या २०२२ च्या परिक्षेत दैदिप्यमान यश मिळवत साडेतीन लाख विद्यार्थ्यांमधून देशात १०७ वा तर अनुसूचित जाती मधून देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला. यशाचा मानकरी ठरलेल्या शुभमवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दीपनगर वसाहती मधील भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रामध्ये सुरक्षितता अधिकारी म्हणून कार्यरत मोहन सरदार तथा आई सुनिता सरदार यांचे सुपुत्र शुभम मोहन सरदार याने लोकसेवा आयोगाच्या केंद्रिय सुरक्षा सेवेच्या २०२२ च्या परिक्षेत दैदिप्यमान यश मिळवत देशभरातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांमधून देशात १०७ वा तर अनुसूचित जाती मधून देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला. त्याच्या…

Read More

साईमत यावल प्रतिनिधी यावल येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरावर शनिवार दि.12 ऑगस्ट रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यात लहान गटात प्रथम क्रमांक हर्षल बुरुजवाले तर मोठ्या गटातून प्रथम क्रमांक विवेक पाटील यांनी पटकावला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक तथा अध्यक्ष मुख्याध्यापक जी. डी. कुलकर्णी हे होते. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षक पी. एस. सोनवणे, प्रा. एस. एम. जोशी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनामध्ये 42 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला स्पर्धेसाठी मुख्य विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान व उपविषय आरोग्य , पर्यावरणासाठी जीवनशैली, शेती, दळणवळण आणि वाहतूक, संगणकीय विचार असे होते. कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक ए. डी. चव्हाण, ए. एस. सूर्यवंशी,…

Read More

साईमत सोयगाव प्रतिनिधी सोयगाव पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी नवीन टाईप 1,3,4 व टाईप 2 या निवासस्थान बांधकामाच्या 20 कोटी 68 लाख रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवार दि ११रोजी अल्पसंख्याक विकास,औकाफ व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, सोयगाव शहरातील पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी नवीन निवासस्थान व्हावे कारण जुने निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली आहे अशी मागणी अधिकारी-कर्मचारी यांनी केली होती. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना नवीन निवासस्थान व्हावे यासाठी राज्य शासनाने टाईप 1,3,4 निवासस्थान बांधकामासाठी 9 कोटी 85 लाख,तर टाईप 2 निवासस्थान बांधकामासाठी 10 कोटी 83 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.सदरील निवासस्थानचे काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व…

Read More