स्वातंत्र्यदिनापासून सर्व शासकीय रुग्णालयांत मिळणार मोफत उपचार

0
2

साईमत, जळगाव, प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकिय आरोग्य संस्थामधून देण्यात येणा-या आरोग्य सेवा, तपासणी व त्याबाबतच्या रुग्णशुल्क निःशुल्क करण्याबाबत आरोग्य विभागाने शनिवारी 12 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढले आहे. हा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या सरकारी रुग्णालयांना लागू राहणार नाही. त्यामुळे आरोग्य विभागातील भ्रष्टाचार काहीसा थांबणार असल्याच्या जनतेतून प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोग्य विभागातील सर्व रुग्णालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून रुग्णांना मोफत उपचार मिळतील. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये व जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील स्त्री रुग्णालय येथे रुग्णांना आता मोफत उपचार मिळणार आहेत.

मुख्यमंत्री यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून सर्व शासकिय आरोग्य संस्थामधून देण्यात येणा-या सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा निःशुल्क करण्याबाबत विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे. तसेच दि. 03 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकिय रुग्णालयामधून करण्यात येणा-या तपासण्या व उपचार तसेच सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावरील वैद्यकिय सेवा (राष्ट्रीय रक्त धोरणानुसार व रक्त घटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे शुल्क वगळून) निःशुल्क करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here