दीपनगरच्या शुभम सरदार युपीएससी भरारी केंद्रिय सुरक्षा सेवेच्या परिक्षेत अनुसूचित जाती मधून देशातून अव्वल

0
3

साईमत भुसावळ प्रतिनिधी

भुसावळ दीपनगर वसाहती मधील तरुण शुभम मोहन सरदार याने संघ लोकसेवा आयोगाच्या केंद्रिय सुरक्षा सेवेच्या २०२२ च्या परिक्षेत दैदिप्यमान यश मिळवत साडेतीन लाख विद्यार्थ्यांमधून देशात १०७ वा तर अनुसूचित जाती मधून देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला. यशाचा मानकरी ठरलेल्या शुभमवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

दीपनगर वसाहती मधील भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रामध्ये सुरक्षितता अधिकारी म्हणून कार्यरत मोहन सरदार तथा आई सुनिता सरदार यांचे सुपुत्र शुभम मोहन सरदार याने लोकसेवा आयोगाच्या केंद्रिय सुरक्षा सेवेच्या २०२२ च्या परिक्षेत दैदिप्यमान यश मिळवत देशभरातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांमधून देशात १०७ वा तर अनुसूचित जाती मधून देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला. त्याच्या या भरीव यशाने परिसरातून त्याच्यावर विविध संघटना व नागरिकांनी कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

शुभम ने विद्युत अभियांत्रिकीमध्ये औरंगाबाद शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१६ मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर दोन वर्षे अनुभवासाठी घरच्या कंपनीत नोकरी केली. २०१९ मध्ये संघ लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी सुरू केली तर २०२० मध्ये कोविड महामारीमुळे दिल्लीतील अभ्यासक्रम अर्धवट सोडून घरी यावे लागले त्यामुळे २०२० वर्ष वाया गेले. २०२१ मध्ये लेखी परीक्षा पास पण फिजिकल टेस्ट पार करता आली नाही.
दरम्यान, २०२२ मध्ये लेखी परीक्षा देऊन संपूर्ण लक्ष्य फिजिकलवर केंद्रित केले. दीपनगर येथील मैदानावर दोन महिने अथक परिश्रम घेत सराव केल्यावर २०२२ ची फिजीकल टेस्ट शुभम ने सहज पार केली. त्यानंतर मुख्य प्रश्न यूपीएससी मुलाखतीचा होता. त्यासाठी शुभम कधी आरशा समोर बसून धडे गिरवत होता तर कधी ऑनलाईनवर, त्याचे वडील मोहन सरदारही त्याच्याकडून मुलाखतीचा सराव करून घ्यायचे,त्याला त्याच्या बहीणीची या सरावासाठी मोलाची मदत लाभली. मुलाखत झाली आणि निवड होईल असा विश्वास बळावला, निकाल घोषित होऊन निवड झाली. खडतर परिश्रमाला आई, वडील, काका, आत्या, मामा यांचे प्रोत्साहन, खंबीर साथ यामुळेच हे यश संपादित झाले.

शुभम चे वडील सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. तर त्याचे काका वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी तथा भारतीय पत्रकार महासंघाचे सल्लागार प्रकाश सरदार व अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त तथा जिजाऊ महिला बचत गटाच्या अध्यक्षा वैशाली सरदार यांचा पुतण्या आहे.
शुभम आता मसूरी (डेहराडून) येथे साधारणपणे ५२ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ६ महिने परिविक्षाधीन अधिकारी म्हणून सेवा बजावेल, त्यानंतर त्याची देशभारत केंद्रिय सुरक्षा सेवेच्या ठिकाणी पदस्थापना होईल. सध्या शुभम भुसावळ प्रकल्प६६० येथे मे. सरदार इंजिनियर्स अँड असोसिएट या कंपनीत साईट इंचार्ज म्हणून कार्यरत आहे. वडीलांच्या मानव सेवा ईश्वर सेवा मार्फत सुरु असलेल्या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात तो आनंदाने सहभागी होऊन सामाजिक जबाबदारी पार पाडीत आहे.
धैय प्राप्ती साठी, आपण आपल्या धेयाच्याप्रती प्रामाणिक राहून, समाज काय म्हणेल याची पर्वा न करता चिकाटीने अभ्यासात सातत्य ठेवावे. आपल्या मेहनतीचे फळ मिळतेच मिळते. मला हे यश तीन वेळाचे अपयश पचवून मिळाले आहे. विद्यार्थी यांनी कोणत्याही कारणाने खचून न जाता आपले धैयाकडे मार्गक्रमण सुरु ठेवावे असे आवाहनही शुभम सरदार यांनी तरुण मित्रांना केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here