Author: saimat

शेतमजुरीसाठी निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला आयशर उलटून २५ जण जखमी साईमत/यावल /प्रतिनिधी  यावल–फैजपूर महामार्गावरील सांगवी–हिंगोणा दरम्यान सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. शेतमजुरीसाठी निघालेल्या आदिवासी मजुरांनी भरलेल्या आयशर वाहनाचा अचानक पुढील टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाले. या दुर्घटनेत एकूण २५ मजूर जखमी झाले असून त्यापैकी १५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातपुडा परिसरातील कुंड्यापाणी येथील आदिवासी मजूर सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजता न्हावी परिसरातील शेतात कामासाठी आयशर (क्रमांक MH 43 BB 1264) मधून प्रवास करत होते. सांगवी व हिंगोणा गावांदरम्यान वाहनाचा पुढील टायर अचानक फुटला. यामुळे चालकाचा…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – आखाती देशांमध्ये झालेल्या युद्धाचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर झाला. युद्धामुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला आणि भारतालाही त्याचा मोठा फटका बसला. या संकटातून धडा घेत भारत आता ऊर्जा सुरक्षेला अधिक बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलत आहे. ताज्या अहवालानुसार, भारतातील सरकारी तेल कंपन्या अमेरिकेतून होणारी द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) आयात दुप्पट करण्याच्या तयारीत आहेत. सध्या भारत अमेरिकेतून दरवर्षी सुमारे २.२ दशलक्ष टन एलपीजी आयात करतो. हा आकडा लवकरच दुप्पट होण्याची शक्यता आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, एलपीजीसाठी आखाती देशांवरील अवलंबित्व कमी करणे आणि भविष्यातील संभाव्य संकटांना सामोरे जाण्यासाठी पर्यायी पुरवठा व्यवस्था निर्माण करणे हा या निर्णयामागील प्रमुख…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. तर नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. मुंबईत दुपारी ३ वाजल्यापासून मोठी भरती (हायटाईड) येण्याची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचण्याचा धोका वाढला आहे. तसेच इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली जात असल्याने वारकऱ्यांनी थेट पुण्यात पोहोचावे,…

Read More

मध्य रेल्वेचा निर्णय; विशेष मेमू सेवा सप्टेंबरअखेरपर्यंत वाढली साईमत /जळगाव /प्रतिनिधी जळगाव, भुसावळसह उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत मध्य रेल्वेने बडनेरा–नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष मेमू रेल्वेचा परिचालन कालावधी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविला आहे. यापूर्वी ही विशेष रेल्वे १५ जुलैपर्यंत धावणार होती. मात्र, प्रवाशांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ही सेवा आणखी अडीच महिने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा–नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष आणि गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक रोड–बडनेरा अनारक्षित दैनिक विशेष या दोन्ही गाड्यांच्या परिचालनास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या…

Read More

ट्रकच्या मागील चाकाने घेतला बळी वृद्ध महिला ठार साईमत /जळगाव /प्रतिनिधी रावेर— बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंप परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक (क्रमांक HP19G0655) पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी प्रवेश करत होता. त्याच वेळी चहा पिऊन परत येत असलेल्या पितांबरबाई शहा बाबुसा शहा (वय ७५) या ट्रकच्या मागील बाजूला आल्या. ट्रक सुरू असल्याचा अंदाज त्यांना न आल्याने त्या अचानक मागील चाकाखाली सापडल्या आणि काही क्षणातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत पितांबरबाई शहा या मूळच्या…

Read More

३१८ वर्षांच्या परंपरेला नवा ऐतिहासिक टप्पा भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम जालन्यात मुक्ताई पालखीचा ऐतिहासिक सोहळा साईमत /मुक्ताईनगर /प्रतिनिधी तब्बल ३१८ वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्याचा ऐतिहासिक रिंगण सोहळा यंदा प्रथमच जालना शहरात उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. रविवार, ५ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिनामाच्या गजराने, टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि अभंगांच्या सुरांनी परिसरात अद्वितीय भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. संत मुक्ताई पालखीचे शनिवारी जालन्यात आगमन झाल्यानंतरच शहरात वारकरी परंपरेचा उत्साह शिगेला पोहोचला होता. रिंगण सोहळा सुरू…

Read More

“भाजप कार्यकर्ता ३६५ दिवस कार्यरत राहावा “352 बूथवर जयंती साजरी करण्याचे भाजपचे निर्देश” साईमत/जळगाव/प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने आज दापोरेकर मंगल कार्यालय येथे शक्ती केंद्र व बूथ प्रमुखांचे एक दिवसीय संमेलन उत्साहात पार पडले. हे संमेलन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणाने करण्यात आली. या प्रसंगी आमदार सुरेश भोळे, प्रमुख वक्ते राजेंद्र नन्नवरे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दिपमाला काळे, स्थायी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, मनपा गटनेते प्रकाश बालाणी तसेच माजी जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे उपस्थित होते. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते राजेंद्र नन्नवरे…

Read More

डोक्यात लोखंडी रॉडचा घाव; रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू साईमत /भुसावळ /प्रतिनिधी : शहरातील कवाडे नगर परिसरातील रेल्वे फिल्टर हाऊसमध्ये शनिवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण भुसावळ हादरून गेले आहे. ऑन-ड्युटी असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचा अज्ञात हल्लेखोराने निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर रेल्वे कर्मचारी व नागरिकांमध्ये तीव्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कर्मचाऱ्याचे नाव प्रसाद कुळकर्णी असून ते भारंबे नगर परिसरातील रहिवासी होते. ते भुसावळ रेल्वे विभागातील फिल्टर हाऊसमध्ये नियमित ड्युटीवर कार्यरत होते. शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार वार करून त्यांचा जागीच मृत्यू घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला.…

Read More

केमिकल टँकरच्या आगीने महामार्गावर खळबळ दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू साईमत /पारोळा /प्रतिनिधी धुळे-पारोळा महामार्गावरील सबगव्हाण टोलनाका परिसर रविवारी पहाटे भीषण अपघाताने हादरला. रासायनिक पदार्थाची वाहतूक करणारा टँकर समोरील कंटेनरवर भरधाव वेगात आदळल्यानंतर त्याला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने टँकरला विळखा घातल्याने त्यातील दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली असून, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, जीजे-१८ बीव्ही-८३१५ क्रमांकाचा टँकर धुळेहून पारोळ्याकडे निघाला होता. सबगव्हाण टोलनाका परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकरने पुढे उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. धडकेनंतर टँकरच्या टायरमधून आग भडकली आणि काही क्षणांतच संपूर्ण वाहन ज्वालांच्या भक्ष्यस्थानी पडले.…

Read More

लिथियम-आयन बॅटरी चार्जिंगदरम्यान आग फोमच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण २० मिनिटांत आटोक्यात साईमत /जळगाव /प्रतिनिधी   शहरातील शिव कॉलनी परिसरात शुक्रवारी दुपारी सुमारे २.५९ वाजता मोठी आग लागल्याची घटना घडली. गुरुकृपा क्लासेसजवळ असलेल्या गुंजन अपार्टमेंटच्या तळमजल्यावर कार्यरत असलेल्या ‘परिवर्तन इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटर’ या दुकानाला अचानक आग लागली. इलेक्ट्रिक स्कूटरच्या लिथियम-आयन बॅटरीचे चार्जिंग सुरू असतानाच ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अवघ्या २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होऊ शकणारी हानी टळली. या आगीत दुकानातील इलेक्ट्रिक बाईकच्या लिथियम-आयन बॅटऱ्या तसेच सर्व्हिसिंगसाठी वापरले जाणारे साहित्य पूर्णपणे…

Read More