भुयारी गटारीच्या कामाचा फटका चिखलात बोलेरो फसली पारोळ्यात संतापाची लाट साईमत /पारोळा /प्रतिनिधी सतत सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहरातील महामार्गालगत कजगाव चौफुली परिसरात रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने एका बोलेरो वाहनाचा चिखलात अडकण्याचा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि वाहन सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. महामार्गालगत सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या कामामुळे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, या खड्ड्यांमध्ये योग्य पद्धतीने भराव न केल्याने आणि त्यावर पुरेशी दुरुस्ती न झाल्याने पावसाच्या पाण्यामुळे माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेली. परिणामी ठिकठिकाणी खोल आणि धोकादायक खड्डे निर्माण झाले असून रस्त्याचा संपूर्ण भागच धोकादायक…
Author: saimat
बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्यावर छापा ७.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांची मोठी कारवाई साईमत /अमळनेर/प्रतिनिधी | जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अमळनेर पोलिसांनी संयुक्तरित्या राबविलेल्या धडक कारवाईत अमळनेर शहरातील बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्याचा पर्दाफाश केला. गुप्त माहितीच्या आधारे एकाचवेळी दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल ७ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी १८ जणांविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेदरम्यान विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि अमळनेर पोलीस…
जळगावात यलो अलर्ट कायम अधूनमधून रिमझिम पावसाची हजेरी साईमत /जळगाव /प्रतिनिधी राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने जोरदार मुसंडी मारली असून पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांत अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पुढील ७२ तास पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अवघ्या २४ तासांत सुमारे २०० मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सखल…
सीलबंद घराची झडती अन् कोट्यवधींचा खुलासा रोख, सोने, मालमत्तेची कागदपत्रे… एसीबीच्या धाडीत कोट्यवधींचा खजिना उघड साईमत /जळगाव /प्रतिनिधी अकोल्यातील लाचखोरीच्या कारवाईनंतर सुरू झालेल्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक झालेल्या सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या जळगावातील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या झडतीत तब्बल २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घरातील कपाटे, लॉकर आणि इतर ठिकाणांची तपासणी करताना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मालमत्तेची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू आढळल्याने तपास यंत्रणाही अवाक् झाली. २६ जून रोजी अकोला येथे एका प्रकरणात १० हजार…
मेहरूण क्रीडा संकुलासाठी रस्ता उपलब्ध करण्याचे आयुक्तांचे तातडीचे आदेश साईमत /जळगाव /प्रतिनिधी शहराच्या क्रीडा विकासाला नवी दिशा देणाऱ्या सुमारे २५० कोटी रुपयांच्या विभागीय क्रीडा संकुल प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या प्रवेशमार्गाचा प्रश्न आता निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. मेहरूण परिसरातील सर्व्हे क्रमांक ३४३ येथे उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी करत रस्ता उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले. जळगावमध्ये उभारण्यात येत असलेले अत्याधुनिक विभागीय क्रीडा संकुल हे उत्तर महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्याचे मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या पुढाकारातून साकार होत असलेल्या या प्रकल्पामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन…
साईमत विशेष प्रतिनिधी । छगनसिंग पाटील जळगाव जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभाग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलडे यांच्या कार्यालयातून ‘पंटर’मार्फत खुलेआम वसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चौकशीच्या तक्रारी दाबून ठेवणे, तक्रारदाराला गोड बोलून परत पाठवणे आणि खालच्या स्तरावरील गटविकास अधिकाऱ्यांना ,“तुम्हीही पैसे कमवा, बाकी मी बघतो” असा संकेत देणारा अजब फंडा राबवला जात असल्याने जिल्हा परिषदेची प्रतिमा बदनामीच्या खाईत लोटली जात आहे. तक्रार दाबण्याचा ‘आकलडे पॅटर्न’ विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या ग्रामपंचायतींचे आर्थिक गैरव्यवहार, बोगस कामे, निधी अपहारासंबंधीच्या तक्रारी भाऊसाहेब आकलडे यांच्याकडे येतात. मात्र, या तक्रारींवर कारवाई करण्याऐवजी…
दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार अटकेत गावठी पिस्तूल जप्त ५८ गंभीर गुन्ह्यांचा सराईत गुन्हेगार अखेर जाळ्यात साईमत /जळगाव /प्रतिनिधी | शहरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या निर्णायक कारवाईत विजय वसंत अहिरे उर्फ ‘भोमपाली’ (वय ३२) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा अवैध शस्त्र व गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुद्दा चर्चेत आला आहे. गेंदालाल मिल परिसरात आरोपी हा गावठी पिस्तूल बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे २ जुलै…
साईमत न्यूज नेटवर्क – कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये गुरुवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. बंगळुरू दक्षिण तालुक्यातील मदापटना परिसरातील एका दगड खाणीत अचानक मोठी दरड कोसळल्याने नऊ मजुरांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मृत्यू झालेले सर्व मजूर बिहारमधील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाणीत दगड फोडण्याचे आणि उत्खननाचे काम सुरू असताना पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका कामगाराने सांगितले की, सुमारे १८ मजूर काम करत असताना जवळपास ४० फूट उंचीवरून मोठी दरड त्यांच्या अंगावर…
नागरिक-प्रशासन थेट संवादासाठी लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन साईमत/जळगाव /प्रतिनिधी : जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित व वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा लोकशाही दिन सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात पार पडणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या निर्देशांनुसार दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. नागरिकांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडून त्यावर तातडीने सुनावणी घेणे व निराकरण करणे, तसेच प्रशासन व नागरिक यांच्यात थेट संवाद प्रस्थापित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू…
साईमत न्यूज नेटवर्क – राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ संदर्भात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. जुलै महिन्याची सुरुवात होऊनही अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे मिळून ३,००० रुपये एकाच वेळी खात्यात जमा होतील का, याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यभरातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, जून महिन्याचा हप्ता काही लाभार्थींना न मिळाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून रखडलेले हप्ते लवकरच वितरित करण्याची…