Author: saimat

नागरिकांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ चिखलात अडकली कार आणि उघड झाला दरोड्याचा कट साईमत /रावेर /प्रतिनिधी  रावेर शहरातून गुरुवारी सायंकाळी भरधाव वेगाने धावणाऱ्या संशयित कारमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाचा अखेर उलगडा झाला आहे. दरोडा किंवा लुटमारीच्या तयारीत असलेल्या तिघांना रावेर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून तलवार, लोखंडी टॉमी, स्क्रू ड्रायव्हर, पिंचीस, दोरी, बनावट नोटांचे बंडल तसेच कार असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संभाव्य मोठा गुन्हा टळल्याचे मानले जात आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पाल येथून आभोडा मार्गे एक मारुती सुझुकी कार क्रमांक एमएच-१९-२४०३ ही रावेर शहरातून अत्यंत वेगाने जात होती. कारचा वेग इतका होता…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – राम मंदिरातील कथित निधी गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात नवे धागेदोरे समोर आले आहेत. दानपेटीतील कथित अपहाराची रक्कम लपवण्याबरोबरच ती शेअर बाजारासह विविध आर्थिक गुंतवणुकीत वापरण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांची तब्बल ३० बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तपासादरम्यान आरोपी अनुकल्प मिश्रा याची त्याच्या घरी नेऊन चौकशी करण्यात आली. तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीत त्याने सहआरोपी अविनाश शुक्लासोबत कथित अपहाराची रक्कम शेअर बाजारात गुंतवल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. याशिवाय, काही रक्कम व्याजाने देण्यात आली, तर काही निधी नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये जमा करून नंतर पुन्हा स्वतःच्या खात्यांमध्ये…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – देशात कोविड-१९च्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून चिंताजनक घटना समोर आली आहे. मासापेटा परिसरातील ४६ वर्षीय कोविडबाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले, मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक वेगाने राबवण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवी बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीला दारूचे व्यसन होते. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच सतत खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने चार दिवसांपूर्वी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपासण्यांमध्ये दोन्ही फुफ्फुसांमध्ये गंभीर संसर्ग झाल्याचे एक्स-रेमध्ये आढळून…

Read More

 एम.जे. मार्केटमध्ये कचऱ्याचे ढीग; स्वच्छतेच्या दाव्यांवर नागरिकांचा सवाल साईमत /रावेर /प्रतिनिधी  शहर स्वच्छतेसाठी विविध अभियान राबविण्याचा दावा नगरपालिका प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळेच चित्र दर्शवत आहे. रावेर शहरातील बसस्थानकासमोरील महत्त्वाच्या एम.जे. मार्केट परिसरात स्वच्छतेअभावी घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांसह व्यापारी व प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, याच एम.जे. मार्केटच्या वरच्या मजल्यावर नगरपालिका कार्यालय कार्यरत आहे. मात्र, कार्यालयाच्या पायथ्याशीच कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छतेचे चित्र दिसून येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दररोज हजारो नागरिकांची वर्दळ, तरीही स्वच्छतेकडे दुर्लक्ष एम.जे. मार्केट हा रावेर शहरातील प्रमुख व्यावसायिक आणि वर्दळीचा परिसर आहे.…

Read More

‘एक लाख द्या, दहा लाख घ्या’चा डाव फसला; मलकापुरात दोघांविरुद्ध गुन्हा साईमत /मलकापूर /प्रतिनिधी अल्पावधीत मोठी रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा आणखी एक प्रकार मलकापूर शहरात उघडकीस आला आहे. एक लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल दहा लाख रुपये देण्याचे सांगून एका व्यक्तीची ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना शहरातील चाळीसबिगा परिसरात ९ जुलै रोजी घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला मोठ्या रकमेचे आमिष दाखवत आरोपींनी विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्याच्याकडून पैसे उकळून बनावट नोटा देत फसवणूक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

घरावर डल्ला, देवघरही फोडले चांदीच्या देवमूर्ती, सोन्याची चैन अन् रोकड लंपास साईमत /धरणगाव/प्रतिनिधी  शहरातील डॉ. हेडगेवार ग्रामपंचायत परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका बंद घरावर डल्ला मारत मौल्यवान दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, शहरात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. डॉ. हेडगेवार ग्रामपंचायत परिसरातील रहिवासी नाना महादू वारुळे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी संधी साधून प्रवेश केला. घरातील साहित्याची उलथापालथ करत चोरट्यांनी चांदीच्या देवमूर्ती, सोन्याची चैन तसेच अंदाजे दहा ते बारा हजार रुपयांची रोकड हातोहात लंपास केली. चोरी झाल्याचे लक्षात येताच वारुळे कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. या…

Read More

धरणगाव तालुक्यातील नांदेड परिसरातील घटना; नागरिकांच्या सतर्कतेमुळे वन्यजीवाचे प्राण वाचले साईमत /धरणगाव /प्रतिनिधी  : वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नागरिकांची जागरूकता आणि प्रशासनाची तत्परता किती महत्त्वाची असते, याचा प्रत्यय धरणगाव तालुक्यातील नांदेड गावाजवळ आला. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हरिणाला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे जीवदान मिळाले. नांदेड गावाच्या शिवारातील एका शेत परिसरात हरिण जखमी अवस्थेत आढळून आले. भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे हरिणाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या घटनेची माहिती स्थानिक नागरिक चांगो गोमा भील यांनी तत्काळ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सरोज डी. पाटील यांना दिली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वनपाल सतीश जी. ठेलार…

Read More

शेड, टपऱ्या, हातगाड्या व अनधिकृत बांधकामे हटविली वर्षानुवर्षांच्या अडथळ्यांवर नगरपरिषदेची कारवाई मुख्य रस्ता झाला रुंद साईमत / फैजपूर /प्रतिनिधीफैजपूर शहरातील फैजपूर–बऱ्हाणपूर–अंकलेश्वर या प्रमुख मार्गावरील वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची विशेष मोहीम राबविली. या कारवाईमुळे शहरातील प्रमुख रस्ता मोकळा झाला असून वाहनधारक, पादचारी तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील मुख्य मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत शेड, दुकानांचे फलक, हातगाड्या, टपऱ्या तसेच रस्त्याच्या हद्दीत आलेले विविध अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही अवघड झाले होते. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली. नगरपरिषद प्रशासनाने…

Read More

मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्याने घेतला शिरसोलीच्या भावेशचा बळी  साईमत /जळगाव /प्रतिनिधी  पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या भीषण कचरा डेपो दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोशी परिसरातील कचऱ्याचा प्रचंड ढिगारा अचानक कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत भावेश मोहन वाणी (वय ३३) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिरसोली गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील मोशी येथे कचरा डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेला कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने दुर्घटना घडली. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून काहींचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये जळगाव जिल्ह्यातील भावेश वाणी यांचा समावेश असल्याचे समोर आल्यानंतर…

Read More

विठ्ठलनामाच्या गजरात १८ सायकलपटूंची पंढरपूर वारी सुरू साईमत /भुसावळ /प्रतिनिधी  : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विठ्ठलभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचवितानाच पर्यावरण संरक्षण आणि निरोगी जीवनशैलीचा प्रचार करण्यासाठी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकलवारीला गुरुवारी पहाटे उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. विठ्ठलाच्या नामस्मरणात आणि भक्तिमय वातावरणात १८ सायकलपटूंनी पंढरपूरच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली. शहरातील श्री विठ्ठल मंदिर परिसरातून सकाळी सहा वाजता सायकलवारीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. प्रस्थानावेळी असोसिएशनचे पदाधिकारी, धावपटू, महिला सदस्य, सायकलप्रेमी आणि विठ्ठलभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड गजराने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ही सायकलवारी केवळ पंढरपूरच्या दर्शनापुरती मर्यादित नसून समाजात पर्यावरणपूरक वाहतुकीचा स्वीकार,…

Read More