ग्राइंडर मशीनचा भीषण अपघात ज्येष्ठ कारागिराचा जागीच मृत्यू साईमत -अमळनेर -प्रतिनिधी टाकरखेडा येथे लाकडाचे काम करत असताना घडलेल्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ आणि अनुभवी कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ग्राइंडर मशीनवरील नियंत्रण सुटल्याने धारदार भाग थेट गळ्याला लागून गंभीर दुखापत झाल्याने देविदास लटकन सुतार (वय ७४) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, २ जुलै रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, देविदास लटकन सुतार हे आपल्या नेहमीच्या कामकाजाप्रमाणे लाकडावर प्रक्रिया करत होते. काम सुरू असताना अचानक त्यांच्या हातातील ग्राइंडर मशीनवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच मशीनचा धारदार भाग त्यांच्या गळ्याला लागला आणि…
Author: saimat
शिवाजीनगर हादरले ३७ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली घरातील मागील खोलीत घडली दुर्दैवी घटना साईमत /जळगाव / प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर परिसरात मंगळवारी (दि. ३० जून) दुपारच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत एका ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.मृत तरुणाचे नाव मयूर अरुण चंदनकर (वय ३७, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी मयूर यांची आई आणि भावजयी घराच्या समोरील खोलीत बसल्या होत्या. याचदरम्यान मयूर हे मागील खोलीत गेले आणि त्यांनी तेथे गळफास घेऊन आपले जीवन संपवले. काही वेळानंतर आईने त्यांना आवाज दिला असता प्रतिसाद…
रोटरी क्लबचा प्रेरणादायी उपक्रम साईमत /फैजपूर / प्रतिनिधी दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने फैजपूर येथे रोटरी क्लब ऑफ सातपुडा व्हॅलीतर्फे शालेय साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला. तिळ्या व अंधारमढी या अतिदुर्गम आदिवासी व गरजू भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी साहित्य देण्यात आले. ‘स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ’ या ब्रीदवाक्यानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ सातपुडा व्हॅलीतर्फे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला क्लबचे अध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ, सचिव श्रीकांत भुयार, खजिनदार निलेश चौधरी यांच्यासह प्राचार्या भारती महाजन, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, असलम तडवी, राजा चौधरी तसेच मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या…
हजारो वारकऱ्यांचा सुरक्षित परतीचा प्रवास पंढरीची वारी पूर्ण करून वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत साईमत /पाळधी (ता. धरणगाव), / प्रतिनिधी पंढरपूरच्या पावन वारीत सहभागी होऊन विठुरायाच्या चरणी सेवा अर्पण करून सुखरूप परतलेल्या वारकऱ्यांचे पाळधी रेल्वे स्थानक परिसरात भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वारीच्या प्रवासाची सांगता आनंदमय वातावरणात झाली. ग्रा.प. सदस्य तथा उद्योजक अनिल कासट यांनी रेल्वे स्थानक परिसरात वारी परतल्यानंतर स्वागताचे सूक्ष्म व शिस्तबद्ध नियोजन केले. या संपूर्ण आयोजनात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. वारीच्या यशस्वी नियोजनामुळे हजारो वारकरी रेल्वे व एस.टी.च्या माध्यमातून सुरक्षितपणे पंढरपूरला जाऊन परतू शकले.…
रस्ते मोकळे करा, अन्यथा कारवाई व्यापारी व ट्रान्सपोर्ट धारकांना कायदेशीर नोटीस साईमत /जळगाव / प्रतिनिधी जळगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या दाणाबाजार परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीला आणि सार्वजनिक रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेने कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरातील व्यापारी, दुकानदार आणि ट्रान्सपोर्ट धारकांना सार्वजनिक रस्त्यांवर अवजड वाहने विनाकारण उभी न करण्याबाबत अधिकृत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी ही नोटीस जारी केली असून, मोटार वाहन कायदा १९८८ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार कठोर कारवाईचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. दाणाबाजार हा जळगाव शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र असून येथे दररोज मोठ्या…
२ जुलैपासून नवे वेळापत्रक लागू साईमत /भुसावळ/ प्रतिनिधी प्रवाशांच्या सोयीसुविधा आणि रेल्वे वाहतुकीचे नियोजन अधिक सुसंगत करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, कालका–साईनगर शिर्डी एक्सप्रेस आणि हावडा–साईनगर शिर्डी एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांच्या साईनगर शिर्डी स्थानकावरील आगमन वेळेत बदल करण्यात आला आहे. हे नवे वेळापत्रक २ जुलैपासून लागू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. नवीन वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक २२४५६ कालका–साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी आता २ जुलैपासून दररोज सायंकाळी ७ वाजता साईनगर शिर्डी स्थानकावर पोहोचणार आहे. तर गाडी क्रमांक २२८९४ हावडा–साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी देखील त्याच तारखेपासून सायंकाळी ७.३० वाजता साईनगर शिर्डी स्थानकावर दाखल होईल. या…
शेतकऱ्यांना व नागरिकांना वेळेत लाभ मिळावा; प्रशासनाला ठोस सूचना साईमत /जळगाव / प्रतिनिधी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांची अंमलबजावणी वेगाने करून त्यांचा प्रत्यक्ष लाभ सामान्य नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवावा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)च्या अध्यक्षा रक्षा खडसे यांनी दिले. जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित समन्वयाने काम करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे वस्त्रोद्योग मंत्री संजय…
साईमत न्यूज नेटवर्क – छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेतून दाखला (टीसी) घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने वर्गशिक्षकावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे शाळा परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्याचा काही दिवसांपूर्वी शाळेत वर्गशिक्षकाशी वाद झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी तो शाळेत टीसी (दाखला) घेण्यासाठी आला असता, पुन्हा त्याचा आणि संबंधित शिक्षकाचा वाद झाला. वादाचे रूपांतर काही क्षणांतच हिंसाचारात झाले. विद्यार्थ्याने जवळ बाळगलेला चाकू काढून शिक्षकांवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी…
गोठ्यात काम करताना घडली घटना, कुटुंबावर शोककळा साईमत /पारोळा / प्रतिनिधी तालुक्यातील देवगाव येथे रविवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत सर्पदंशामुळे एका ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भास्कर नारायण पाटील (वय ७५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भास्कर पाटील हे नेहमीप्रमाणे सकाळी घरामागील शेतातील गोठ्यात जनावरांचे दूध काढण्यासाठी तसेच चारापाणी करण्यासाठी गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली. त्या वेळी ते गोठ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या उजव्या पायाच्या टाचेवर विषारी सापाने दंश केल्याच्या स्पष्ट खुणा दिसून…
साईमत न्यूज नेटवर्क – मुंबई चेंबूर परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात शाळेच्या बसवर महाकाय झाड कोसळल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर १० विद्यार्थी जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जखमी विद्यार्थ्यांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पिवळ्या रंगाची शाळेची बस चेंबूरमधील एका रस्त्यावर विद्यार्थ्यांना घेऊन उभी होती. बसमध्ये एकूण १३ विद्यार्थी होते. त्याचवेळी मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यालगत असलेले एक जुने आणि मोठे झाड अचानक उन्मळून थेट बसवर कोसळले. अचानक घडलेल्या या अपघातामुळे बसचे मोठे नुकसान झाले आणि विद्यार्थी बसमध्येच अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस आणि…