मुसळधार पावसाने शेतीच्या कामांना ब्रेक शेतीची कामे ठप्प, शेतांमध्ये पाण्याचा साठा साईमत /जळगाव /प्रतिनिधी जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत संततधार सुरू आहे. जळगाव शहरासह ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. अमळनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आणि धरणगाव परिसरातही पावसाने चांगलाच जोर धरल्याचे चित्र आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामातील पेरणीनंतरची कामे, आंतरमशागत तसेच इतर शेतीची कामे पावसामुळे खोळंबली आहेत. सततच्या पावसामुळे शेतकरी शेतात जाणे टाळत असून शेतीची कामे काही काळासाठी ठप्प झाली आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहारांवरही पावसाचा परिणाम जाणवत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर…
Author: saimat
जळगाव-भुसावळसह विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाकडे जाणाऱ्या प्रवाशांची होणार मोठी सोय साईमत /जळगाव /प्रतिनिधी खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उधना–ब्रह्मपुरी–उधना अमृत भारत एक्स्प्रेसची सेवा आता आठवड्यातील काही दिवसांऐवजी दररोज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जळगाव, भुसावळ परिसरातील प्रवाशांना नियमित प्रवासासाठी अधिक सोयीचा पर्याय मिळणार असून, गुजरातपासून विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशापर्यंतची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होणार आहे. यापूर्वी त्रि-साप्ताहिक स्वरूपात धावणारी ही रेल्वे आता ९ जुलै २०२६ पासून दररोज धावणार आहे. प्रवाशांची वाढती मागणी आणि दळणवळणाची गरज लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विशेषतः जळगाव व भुसावळ स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.…
मुसळधार पावसात दुर्घटना; वीज खांबातील प्रवाहाने बैल दगावला साईमत /जळगाव /प्रतिनिधी शेतीचा हंगाम सुरू असतानाच जुने जळगाव परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे. मुसळधार पावसाच्या दरम्यान विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने एका शेतकऱ्याचा बैल जागीच मृत्युमुखी पडला. शेतीच्या कामासाठी असलेला महत्त्वाचा आधार अचानक हिरावल्याने संबंधित शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. जुने जळगाव येथील शेतकरी पद्माकर गणपत खडके हे बुधवारी नेहमीप्रमाणे बैलगाडी घेऊन शेताकडे गेले होते. पावसामुळे शेत परिसरात ओलावा वाढला होता. याचवेळी वीज खांब किंवा विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे जमिनीत अथवा परिसरात विद्युत प्रवाह उतरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेतीचे काम सुरू असताना बैलाचा…
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम ५५० स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग साईमत /जळगाव /प्रतिनिधी पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जळगाव पोलीस मुख्यालय परिसरात बुधवारी भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात प्रतिष्ठानच्या सुमारे ५५० स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेत २,३२० विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली. या मोहिमेमुळे पोलीस मुख्यालय परिसर हिरवाईने बहरणार असून पर्यावरण संरक्षणासाठी समाजात सकारात्मक जनजागृती होणार आहे. या वृक्षारोपण मोहिमेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. वृक्षारोपण कार्यक्रम नियोजनबद्ध…
पाच वाहनांना धडक देत नागरिकांना चिरडले; चालक कार सोडून फरार, पोलिसांकडून शोध सुरू साईमत न्यूज नेटवर्क – नवी मुंबई : तळोजा सेक्टर १० परिसरात मंगळवारी सकाळी भरधाव वेगातील एका इलेक्ट्रिक कारने भीषण अपघात घडवून आणला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्यावरील नागरिकांसह पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालक कार घटनास्थळी सोडून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास तळोजा सेक्टर १० परिसरातून भरधाव वेगाने जाणाऱ्या इलेक्ट्रिक कारचे नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर कारने रस्त्यावरील वाहनांना आणि नागरिकांना जोरदार धडक दिली. धडकेची…
शिक्षक कॉलनीतील थरारक घटना; गंभीर जखमी पत्नीवर नांदेडमध्ये उपचार, आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना साईमत न्यूज नेटवर्क – नांदेड : जिल्ह्यातील लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात कौटुंबिक वादातून एका पतीने पत्नीवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल जाधव आणि त्यांची पत्नी अर्चना जाधव यांच्यात मध्यरात्रीच्या सुमारास कौटुंबिक कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर तीव्र भांडणात झाल्यानंतर विशालने घरातील गावठी कट्टा काढून अर्चना यांच्यावर सलग तीन गोळ्या झाडल्या. या…
पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसामुळे तलावांमध्ये पाणी वाढले; मुंबईला ३५ ते ३६ दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध साईमत न्यूज नेटवर्क – मुंबई : पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. अवघ्या सहा दिवसांत तलावांमध्ये सुमारे दीड लाख दशलक्ष लिटर पाण्याची भर पडल्याने मुंबईसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठा शहराची सुमारे ३५ ते ३६ दिवसांची गरज भागविण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने तलावांतील पाण्याची पातळी चिंताजनकरीत्या घसरली होती. विशेषतः अप्पर वैतरणा आणि तानसा या तलावांतील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर पोहोचला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून पाणलोट…
वाहतूक कोंडीला लगाम,विद्यार्थी, पादचाऱ्यांना मिळणार सुरक्षित वाट रावेरचे रस्ते अतिक्रमणमुक्त साईमत /रावेर /प्रतिनिधी : शहरातील अरुंद रस्ते, वाढती वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने अखेर अतिक्रमणाविरोधात निर्णायक पाऊल उचलले आहे. नगर परिषद, पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने राबविलेल्या धडक मोहिमेत शहरातील प्रमुख मार्गांवरील अडथळे हटविण्यात आले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामे, फूटपाथवरील कब्जे आणि रस्त्यावरील अतिक्रमणांना मोठा धक्का बसला असून शहरातील रस्ते पुन्हा मोकळे झाले आहेत. शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले शेड, दुकानांचे वाढीव भाग आणि फूटपाथवरील अडथळ्यांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. विशेषतः शाळकरी…
गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडिओ स्टंटबाजीच्या रील्स आणि आक्षेपार्ह रील्सवर करणाऱ्यांवर सायबर पथकाची कारवाई साईमत /जळगाव /प्रतिनिधी सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी तयार करण्यात येणाऱ्या समाजविघातक रील्सवर आता जळगाव पोलिसांची करडी नजर आहे. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत केलेली स्टंटबाजी तसेच महिलांचा अवमान करणारा आक्षेपार्ह आशय प्रसारित करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सायबर पॅट्रोलिंगच्या माध्यमातून अशा रील्सची तपासणी करून संबंधित तरुणांची ओळख पटविण्यात आली असून त्यांना पोलिस मुख्यालयात बोलावून समज देण्यात आली आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात अशा रील्सचा प्रसार होत आहे. केवळ अधिकाधिक व्ह्यूज आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने काही तरुणांकडून कायद्याचा धाक नसल्याचे दाखवणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन…
‘स्माईल’ शिष्यवृत्ती योजनेतून दरवर्षी १३,५०० रुपयांची मदत साईमत /जळगाव /प्रतिनिधी तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने मार्फत ‘स्माईल (SMILE)’ योजनेअंतर्गत विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष १३,५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार असून अर्ज प्रक्रिया राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती योजना तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणातील अडथळे दूर करून त्यांना शैक्षणिक प्रवाहात स्थिरता मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. प्री-मॅट्रिक (इयत्ता ९ वी व १० वी), पोस्ट-मॅट्रिक (इयत्ता ११ वी व १२ वी), तसेच महाविद्यालयीन आणि पदव्युत्तर शिक्षण…