Author: saimat

साईमत पाचोरा  प्रतिनिधी सद्यस्थितीत राज्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार आहे. आता पळवाट न काढता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा युवक महासंघाचे तालुकाध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष गणेश जनार्दन शिंदे हे गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजेपासून पाचोरा तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास बसले होते. अखेर सायंकाळी ४:४५ वाजता तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी उपोषणस्थळी येवून आपली मागणी शासनापर्यंत तात्काळ पोहचवू, असे आश्वासन दिल्यानंतर गणेश शिंदे यांनी उपोषण सोडले. उपोषणाला येथील सकल मराठा प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, पाचोरा तालुका पत्रकार संघ,…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील गोदावरी नगरात अधिकमास समाप्तीनिमित्त कावड यात्रेचे आयोजन केले होते. यासाठी महिलांसह मुलांची सकाळपासूनच धावपळ सुरू होती. संपूर्ण गोदावरी नगरचा रस्ता रांगोळ्यांनी सजविला होता. परिसरातील सर्व मंडळींचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कावड यात्रा फुलांनी सजवून गोसावी वकील यांच्या घरासमोरील महादेव मंदिरापासून तर सार्वजनिक उड्डाणजवळील दत्तात्रय महादेव मंदिरापर्यंत ‘हर हर महादेव जय भोले’ बाबाच्या जल्लोषात मिरवणूक निघाली. यावेळी तरुण, वृद्ध मंडळी सोबतच बालगोपालांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. महादेव मंदिरात पूजा जलाभिषेक करण्यात आला. आरती झाल्यानंतर सर्व उपस्थित भाविकांना प्रसाद व केळी देण्यात आली. यशस्वीतेसाठी गोदावरी कॉलनीतील श्रीमती कासार, श्रीमती बळवीर यांनी परिश्रम घेतले.

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूल येथे ७७ वा स्वातंत्र्य दिवस चिमुकल्यांनी अत्यंत उत्साहाने साजरा केला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार शेखर पाटील, तुषार वाघुळदे, शरद भालेराव, शाळेचे संस्थापक अध्यक्ष मासुळे, मुख्याध्यापिका जयश्री मासुळे, पंकज कपले यांच्यासह सर्व पालक, शिक्षिका उपस्थित होते. यावेळी शेखर पाटील, तुषार वाघुळदे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रतीक्षा काटे यांनी केले.

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी परदेशातील शिक्षणाकरीता ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्याकडून मुक्ताईनगर येथील रहिवासी सनी निलेश बढे यांना एक लाखाचा धनादेश नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. सध्या बढे हा विद्यार्थी बारामतीतील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी महाविद्यालय येथे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट येथे शिक्षण घेत आहे. जे नेदरलँड्समधील व्हॅन हॉल लॅरेन्स्टाईन विद्यापीठाशी संलग्नित आहे. पुढील दोन वर्षाच्या शिक्षणाकरीता तो रविवारी, २० ऑगस्ट रोजी नेदरलँडला रवाना होत आहे. सनीचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असून त्याच्या कुटुंबीयांना शेतीची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. सनीचे आजोबा नेहमी शेती कामात व्यस्त असायचे. त्याला शेतात घेऊन जायचे. त्यामुळे त्याला कृषी शिक्षणाची आवड निर्माण…

Read More

सोयगाव : प्रतिनिधी गावातून येणारी आणि सोयगाववरून वरसाडा तांड्याकडे जाणाऱ्या दोन्ही मोटारसायकलची धडक होवून झालेल्या अपघातात निंबायती येथील चाळीस वर्षीय युवक गंभीर जखमी झाल्याची घटना सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गाला लागून असलेल्या निंबायती फाट्यावर गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. अपघाताची माहिती मिळताच सोयगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हुसेन शेख यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. सविस्तर असे की, सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गावर लगतच निंबायती फाटा आहे. या फाट्यावरून गावातून निंबायती तांडा येथील प्रकाश उखा चव्हाण (वय ४०) हा मोटारसायकलने (क्र.एमएच-१५ सीपी-३९३२) सोयगावच्या दिशेने येत होता. सोयगावकडून येणाऱ्या मोटारसायकलवरील (क्र.एमएच-१९, डीजी-४२५४) लकी संतोष बडगुजर (वय २२) या दोघांची धडक होवून त्यात प्रकाश चव्हाण हा…

Read More

मलकापूर : प्रतिनिधी येथील भीमनगर येथे त्रिरत्न महिला बचत गटातर्फे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्यात आले. अभियानाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून नगरसेवक तथा ‘समतेच निळ वादळ’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अशांत वानखेडे, नगरपरिषदेचे प्रकल्प अधिकारी दीपक खोडे आदी उपस्थित होते. यावेळी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानाला काशाच्या कलशाचे पूजन अशांत वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी मीना चोपडे, संतोष पाटील, अंगणवाडी सेविका राजकन्या वानखेडे, नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीसाठी त्रिरत्न महिला मंडळाचे अध्यक्ष रेखा सरदार, सचिव कविता अंजने, उपाध्यक्ष ज्योती दांडगे, शोभा पानपाटील, लक्ष्मी सरदार, निर्मला इंगळे, सुनिता शेगोकार यांच्यासह महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या.

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. १८ जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार पीक विम्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम कमी व जास्त तापमानाची हेक्टरी ६० ते ७० हजार रुपये ३ आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. जानेवारी महिन्यात तापमान सलग पाच दिवस ८ डिग्री सेल्सिअसच्या कमी राहिल्याने जिल्ह्यातील ४७ महसूल मंडळातील शेतकरी पात्र झाले आहे. त्यांना हेक्टरी २६५०० रक्कम…

Read More

सोयगाव : प्रतिनिधी शहरापासून काही अंतरावरील गलवाडा येथील गरीब घरातील युवकाची भारतीय सैन्यात निवड झाली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून गलवाडा येथील एका गरीब कुटूंबातील धर्मदास आनंदा गायकवाड यांची भारतीय सैन्यात निवड झाली. ट्रेनिंग पूर्ण करून गावात आल्यानंतर गलवाडा गावच्या माजी सरपंच सुरेखा भारत तायडे यांनी व इतर महिलांनी जवानाचा सत्कार केला. यावेळी सुरेखा तायडे यांच्यासह सीआरपी सोनाली मोरे, अंगणवाडी सेविका करुणा सोनवणे, सुनीता साळवे, सुनीता मोरे, सविता सोनवणे, सुपरवायझर सोनवणेबाई, शोभाबाई मंडवे, पवार बाई यांच्यासह बचत गटाच्या इतर महिला, सुरेश घन, विशाल घन, राहुल भिवसणे, जयदीप बिरारे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

बोदवड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचे तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोपाल माळी, महाकाल फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल गंगतिरे यांनी सहकार्ऱ्यांसह हैदराबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या हस्ते भारत राष्ट्र समिती पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. बोदवड तालुक्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर. यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पँनलमधुन निवडून आलेले हमाल मापाडी मतदारसंघातून निवडून आलेले संचालक गोपाळ माळी यांनी महाकाल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अनिल गंगतिरे यांच्या सोबत हैदराबाद येथे मुख्यमंत्री के.सी.आर. यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती पक्षाच्या विस्तारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ठिकठिकाणच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांना पक्षात ऐकण्यासाठी आमंत्रित केले…

Read More

बोदवड : प्रतिनिधी शहरातील गांधी चौक येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सुरुवातीला आ.चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अग्निशामक बंब, ट्रॅक्टर व दोन घंटागाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर माजी सैनिक, सफाई कर्मचारी २३ पुरुष, १६ महिला व घनकचरा कंत्राटदार यांच्या ३५ सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करत त्यांना गौरविण्यात आले. अग्निशामकची आवश्यकता पडावी अशी वेळ येऊ नये. परंतु, दुर्दैवाने अशी वेळ आलीच तर खेड्यापाड्यापर्यंत गाडी पोहोचून उपाययोजनेसाठी सुविधा उपलब्ध असायला पाहिजे. त्यामुळे हानी टाळता येणार असल्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विकास कामे करत असताना समोरचा वेगळेच भारुड गातो. परंतु, आम्हीही ग्रामीण भागातील असल्याने बोलू शकतो. परंतु, आमच्यावर तसे संस्कार नाही, असा टोला माजी मंत्री…

Read More