मलकापूर : प्रतिनिधी
येथील भीमनगर येथे त्रिरत्न महिला बचत गटातर्फे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्यात आले. अभियानाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून नगरसेवक तथा ‘समतेच निळ वादळ’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अशांत वानखेडे, नगरपरिषदेचे प्रकल्प अधिकारी दीपक खोडे आदी उपस्थित होते. यावेळी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानाला काशाच्या कलशाचे पूजन अशांत वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी मीना चोपडे, संतोष पाटील, अंगणवाडी सेविका राजकन्या वानखेडे, नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीसाठी त्रिरत्न महिला मंडळाचे अध्यक्ष रेखा सरदार, सचिव कविता अंजने, उपाध्यक्ष ज्योती दांडगे, शोभा पानपाटील, लक्ष्मी सरदार, निर्मला इंगळे, सुनिता शेगोकार यांच्यासह महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या.