मुक्ताईनगर : प्रतिनिधी
येथील गोदावरी नगरात अधिकमास समाप्तीनिमित्त कावड यात्रेचे आयोजन केले होते. यासाठी महिलांसह मुलांची सकाळपासूनच धावपळ सुरू होती. संपूर्ण गोदावरी नगरचा रस्ता रांगोळ्यांनी सजविला होता. परिसरातील सर्व मंडळींचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कावड यात्रा फुलांनी सजवून गोसावी वकील यांच्या घरासमोरील महादेव मंदिरापासून तर सार्वजनिक उड्डाणजवळील दत्तात्रय महादेव मंदिरापर्यंत ‘हर हर महादेव जय भोले’ बाबाच्या जल्लोषात मिरवणूक निघाली. यावेळी तरुण, वृद्ध मंडळी सोबतच बालगोपालांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. महादेव मंदिरात पूजा जलाभिषेक करण्यात आला. आरती झाल्यानंतर सर्व उपस्थित भाविकांना प्रसाद व केळी देण्यात आली. यशस्वीतेसाठी गोदावरी कॉलनीतील श्रीमती कासार, श्रीमती बळवीर यांनी परिश्रम घेतले.