सोयगाव : प्रतिनिधी
शहरापासून काही अंतरावरील गलवाडा येथील गरीब घरातील युवकाची भारतीय सैन्यात निवड झाली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून गलवाडा येथील एका गरीब कुटूंबातील धर्मदास आनंदा गायकवाड यांची भारतीय सैन्यात निवड झाली. ट्रेनिंग पूर्ण करून गावात आल्यानंतर गलवाडा गावच्या माजी सरपंच सुरेखा भारत तायडे यांनी व इतर महिलांनी जवानाचा सत्कार केला.
यावेळी सुरेखा तायडे यांच्यासह सीआरपी सोनाली मोरे, अंगणवाडी सेविका करुणा सोनवणे, सुनीता साळवे, सुनीता मोरे, सविता सोनवणे, सुपरवायझर सोनवणेबाई, शोभाबाई मंडवे, पवार बाई यांच्यासह बचत गटाच्या इतर महिला, सुरेश घन, विशाल घन, राहुल भिवसणे, जयदीप बिरारे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.