बाजार समितीचे संचालक गोपाल माळी यांचा ‘बीआरएस’मध्ये प्रवेश

0
2

बोदवड : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचे तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोपाल माळी, महाकाल फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल गंगतिरे यांनी सहकार्ऱ्यांसह हैदराबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या हस्ते भारत राष्ट्र समिती पक्षात नुकताच प्रवेश केला आहे.

बोदवड तालुक्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर. यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पँनलमधुन निवडून आलेले हमाल मापाडी मतदारसंघातून निवडून आलेले संचालक गोपाळ माळी यांनी महाकाल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अनिल गंगतिरे यांच्या सोबत हैदराबाद येथे मुख्यमंत्री के.सी.आर. यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती पक्षाच्या विस्तारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ठिकठिकाणच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांना पक्षात ऐकण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. बोदवड तालुक्यातील महाकाल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणारे तसेच बोदवड परिसर जलसिंचन योजनेस लवकर निधी मिळावा, म्हणून बोदवड ते मुंबई कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढल्याने चर्चेत असलेले अनिल गंगतिरे यांच्याशी भारत राष्ट्र समितीच्या पक्षाकडून संपर्क साधण्यात आला होता.

सर्वांनी पक्षात प्रवेश करण्याचा घेतला निर्णय

तेलंगणा मॉडेल कसे राबविले जाते हे पाहण्यासाठी हैदराबाद येथे आमंत्रित केले होते. त्यानुसार अनिल गंगतिरे यांच्या सोबत फाउंडेशनमध्ये सक्रिय असलेल बाजार समितीचे संचालक गोपाळ माळी, मराठा सेवा संघ प्रणित विरोध भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष तुषार उगले, जगदीश हजारी, कपिल मराठे यांच्यासह १३ ऑगस्ट रोजी तेलंगणा राजधानी हैदराबाद येथे आमंत्रित केल्यानुसार भेट देण्यासाठी गेले. त्यावेळी दोन दिवस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून तेलंगणा मॉडेलसंबंधी माहिती देत काही उपक्रम दाखविले. पक्षाचे शेती उद्योग शिक्षण आरोग्य यासंबंधी कामाची माहिती व ध्येय धोरणे यांचा परिचय करून दिला. पक्षात काम करण्यासाठी इच्छूक असल्यास तुमचे स्वागत आहे, असे म्हणत आमंत्रित केले. पक्ष कामांबदल माहिती घेतल्यानंतर पक्षाच्या सहाय्याने तालुक्यात काम करण्याची संधी लक्षात घेत सर्वांनी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

गुलाबी रंगाचा रूमाल देऊन पक्षात स्वागत

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या पक्षाची ओळख असलेल्या गुलाबी रंगाचा रूमाल देऊन सर्वांचे पक्षात स्वागत केले. पक्ष विस्तारासाठी पुढील सूचना दिल्या. त्यानुसार तालुक्यात पक्ष वाढीचे नियोजन करण्यात येईल, असे गोपाल माळी आणि अनिल गंगतिरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here