घरातील बाथरूममधील शॉकने मिस्त्रीचा बळी साईमत/ पाचोरा / प्रतिनिधी शहरातील हनुमान नगर परिसरात बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. ४४ वर्षीय फर्निचर कारागिर धनराज सुखदेव मिस्तरी यांना घरातील बाथरूममध्ये वॉटर हिटरचा जोराचा विद्युत शॉक लागून जागीच बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ऐकून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार, धनराज मिस्तरी (रा. ए-वन काट्याजवळ, हनुमान नगर) सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले होते. बाथरूममध्ये लावलेल्या वॉटर हिटरला स्पर्श केल्यावर त्यांना जोराचा शॉक बसला. यावेळी ते ताबडतोब बेशुद्ध झाले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. अचानक झालेल्या या…
Author: saimat
प्रवाशांना जेवणाची सेवा सुरळीत राहण्यासाठी विद्युत पर्याय सुचवले साईमत/ मुंबई/ प्रतिनिधी मध्यपूर्वेतील तणावाचे परिणाम आता भारतातील सेवा क्षेत्रावरही जाणवत आहेत. इराण- अमेरिका आणि इस्रायल संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले असून, त्याचा थेट परिणाम एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवर झाला आहे. या परिस्थितीचा फटका आता भारतीय रेल्वेच्या खानपान सेवेला बसू लागला आहे. केंद्र सरकारने ५ मार्च रोजी व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅसवर काही निर्बंध लागू केले, ज्यामुळे अनेक भागांत गॅस सिलिंडर मिळण्यास विलंब होत आहे. गॅस वितरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर होत असून, स्टॉल चालकांना गॅस मिळण्यात अडचणी येत असल्याचे…
गावठी कट्ट्याने दोन राऊंड फायर केले कोणालाही इजा नाही, पण शहरात घाबरलेले वातावरण साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी शहरातील गुन्हेगारीचे स्वरूप पुन्हा एकदा उघड झाले असून, मंगळवारी दुपारी वाल्मिक नगरातील घरकुल चौकात संतप्त भावनेतून एकतरुणाने दोन राऊंड गोळ्या झाडल्या. सुदैवाने, या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक नगरातील श्रीराम चौकाजवळ राहणारे रसाल राठोड (वय ४८) हे नेरीनाका स्मशानभूमी परिसरातून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. हल्ल्यात त्यांचा हात गंभीरपणे जखमी झाला. राठोड यांनी लगेचच आपला मुलगा अनिल राठोड याला ही घटना सांगितली. वडिलांना मारहाणी झाल्याची माहिती मिळताच संतप्त अनिल राठोड संशयितांच्या…
शाळा व आरोग्य केंद्रांमधून राबवली जाणारी एचपीव्ही लसीकरण मोहिम साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात आज एचपीव्ही (Human Papillomavirus) लसीकरण मोहिमेला औपचारिक शुभारंभ मिळाला. छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा उगले यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या मोहिमेद्वारे १४ वर्षांखालील मुलींना गर्भाशयाच्या कॅन्सरपासून संरक्षण देणारी एचपीव्ही लस मोफत दिली जाणार आहे. महापौर काळे यांनी पालकांना आवाहन केले की, आपल्या मुलींना या आरोग्यदायी उपक्रमात सहभागी करून त्यांच्या…
स्व. मोतीभाऊ जैन यांच्या स्मरणार्थ पिंप्राळा स्मशानभूमीत वृक्षारोपणनागरिकांसाठी सिमेंट बेंचचे लोकार्पण साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जळगाव शहरातील पिंप्राळा स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. स्वर्गीय मोतीभाऊ जैन यांच्या स्मरणार्थ नगरसेवक अमर जैन यांच्या सौजन्याने तसेच भवरलाल आणि कांताई जैन फाउंडेशन व जळगाव शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी परिसरात वृक्षारोपणासह नागरिकांसाठी सिमेंट बेंचचेही लोकार्पण करण्यात आले. स्मशानभूमी परिसर हरित आणि स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने भवरलाल आणि कांताई जैन फाउंडेशनतर्फे सुमारे ५० झाडांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली होती. या रोपांचे मान्यवरांच्या हस्ते रोपण करण्यात आले. वृक्षारोपणामुळे परिसरात हरित वातावरण निर्माण होण्यास मदत होणार असून पर्यावरण…
रस्ता रोको आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष मागण्यांकडे वेधले साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी आदिवासी ढोर टोकरे मल्हार महादेव कोळी समाजाने त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १० मार्च रोजी जळगावात ‘रस्ता रोको’ आंदोलन आयोजित केले. आकाशवाणी चौक, नॅशनल हायवे येथे सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत सुमारे ५० समाज बांधवांनी सहभाग नोंदवला. आंदोलनासाठी सौ. मंगलाताई महेश सोनवणे यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनकडे अधिकृत परवानगी अर्जाद्वारे मागितली होती. ‘क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी ढोर टोकरे मल्हार महादेव कोळी संघर्ष समिती’च्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाने अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने हा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आयोजकांनी सांगितले.…
उद्याच्या मेळाव्यात माजी सैनिकांना थेट रोजगार व मार्गदर्शन साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी रोजगाराच्या नवे क्षितिज उघडण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव आणि जिल्हा सैनिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष रोजगार व समुपदेशन मेळावा आयोजित केला जात आहे. हा मेळावा बुधवार, दि. ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत माजी सैनिक मायादेवी बहुउद्देशीय सभागृह, महाबळ, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात स्टार फॅबरीक्स आणि छबी इलेक्ट्रिकल यांसारख्या उद्योगसंस्थांच्या प्रतिनिधींकडून इच्छुक उमेदवारांची जागेवरच मुलाखत घेऊन थेट निवड प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी मिळवण्याची सोपी आणि…
घर फोडून ५६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उजेडात साईमत /चाळीसगाव / प्रतिनिधी शहरात चोरीचे प्रकार सातत्याने वाढत असून, रेल्वे स्टेशन परिसरात पुन्हा एका आरपीएफ जवानाच्या घरावर चोरांचा धाडसी हल्ला झाला आहे. ९ मार्च रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:४५ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घर फोडून तब्बल ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे समोर आली. सागर संजय पाटील (वय ३३), हे चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर आरपीएफमध्ये कार्यरत आहेत. ते ग.स. सोसायटीजवळ, ब्रिज कॉर्नर हॉटेलच्या पाठीमागील भाड्याच्या घरात राहतात. सकाळी आपल्या कर्तव्यावर गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप फोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील…
महापौर दीपमाला काळे यांचे कडक आदेश जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चार दिवसांत बुलडोझर साईमत/ जळगाव /प्रतिनिधी शहरातील शिरसोली रोड परिसरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या सुमारे १३ एकर शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने घेतला असून येत्या चार दिवसांत मोठी कारवाई होणार आहे. महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला पोलीस बंदोबस्तात ही मोहीम तातडीने पूर्ण करण्याचे कडक आदेश दिल्याने स्लॉटर हाऊस परिसरातील अनधिकृत झोपड्यांवर मनपाचा बुलडोझर चालण्याची तयारी सुरू झाली आहे. मोहाडी रस्त्यालगत गट क्रमांक ६० मधील सुमारे ५ हेक्टर ४ आर म्हणजेच जवळपास १३ एकर क्षेत्रफळाची ही जागा महानगरपालिकेच्या मालकीची आहे. ‘स्लॉटर हाऊस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी…
सिलेंडर न मिळाल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि गोंधळ साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन आणि गॅस पुरवठ्यात निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही स्पष्टपणे जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने गोडाऊनसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विविध भागांत गेल्या तीन ते चार दिवसांपासून सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी सतत येत आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच नागरिकांनी गॅस गोडाऊनसमोर रांगा लावल्या असून, काही ठिकाणी गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले आहे. गोडाऊन कर्मचारी नागरिकांना “पावती घेऊन या, त्यानंतरच सिलेंडर मिळेल,” असे सांगत आहेत. अनेक नागरिकांनी आधीच बुकिंग केले असल्याचा दावा केला, तरीही त्वरित सिलेंडर…