आरोपीने धमकी दिली, “तू मला नाही म्हटली, तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन.” साईमत/जळगाव / प्रतिनिधी– शहरात एका १८ वर्षीय तरुणीवरील असह्य आणि धक्कादायक गुन्ह्याची माहिती समोर आली आहे. पीडितेचे खासगी अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात राहणारी पीडित तरुणी आणि १९ वर्षीय हुजेफा युनुस पिंजारी (रा. चाळीसगाव रोड, धुळे) यांची ओळख होती. १९ नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपीने पीडितेचे काही खासगी व्हिडिओ मोबाईलमध्ये मिळवले. नंतर त्याने ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेवर दबाव टाकला. तक्रारीत म्हटले…
Author: saimat
अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईने अन्य दुकानांचे रक्षण साईमत/सावदा/ प्रतिनिधी – सावदा शहरातील बसस्थानक परिसरात शुक्रवार (दि. १३ मार्च २०२६) दुपारी ‘भारत गादी भंडार’ या गाद्यांच्या दुकानाला अचानक आग लागून मोठा आर्थिक फटका बसला. या भीषण आगीत दुकानातील गाद्या आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानकाजवळील एस. के. रेडियम दुकानाच्या शेजारी असलेल्या भारत गादी भंडारातून धूर आणि ज्वाळा बाहेर येताना दिसल्याने नागरिकांत खळबळ उडाली. घटना दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान घडली. काही नागरिकांनी तत्काळ सावदा नगरपालिकेच्या…
मोहाडी रस्त्यावर पेट्रोल भरताना चक्कर येऊन ज्येष्ठ व्यापारी ठार साईमत/जळगाव / प्रतिनिधी– जळगाव शहरात बुधवारी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मोहाडी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर दुचाकीवर इंधन भरवत असताना ६४ वर्षीय ज्येष्ठ व्यापारी विरेंद्र रुढाभाई जैठवा (रा. रायसोनी नगर) यांना अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरभर हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र जैठवा हे शहरातील परिचित किराणा व्यापारी होते. बुधवारी दुपारी त्यांनी व्यवसायाच्या कामासाठी घराबाहेर पडलं आणि मोहाडी रस्त्यावरून जात असताना पेट्रोल पंपावर थांबले. पेट्रोल भरत असताना त्यांना अचानक अस्वस्थता जाणवली आणि ते चक्कर येऊन खाली पडले. घटनेचा सूर पाहताच पेट्रोल पंपावरील…
धावत्या ट्रकला भीषण आग मालसामान जळून खाक साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी जामनेर–भुसावळ महामार्गावर शुक्रवारी (दि. १३) दुपारी धावत्या आयशर ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. कुऱ्हे पानाचे गावाजवळील देवेंद्र हॉटेलसमोर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ट्रकमध्ये ऑक्सिजन सिलेंडर, केमिकलचे ड्रम, सल्फ्युरिक ॲसिडसारखा ज्वालाग्राही साठा तसेच विद्युत पंप असल्याने मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त होत होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकसह त्यातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेरकडून भुसावळच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेला आयशर ट्रक दुपारी सुमारे साडेबारा वाजता कुऱ्हे पानाचे गावाजवळील देवेंद्र हॉटेलसमोर पोहोचला असता ट्रकच्या केबिनच्या खालच्या…
रावेर तालुक्यातील गारखेडा उपकेंद्रात दुर्दैवी प्रसूती; प्रशासनाची कठोर कारवाई साईमत/रावेर/ प्रतिनिधी रावेर तालुक्यातील गारखेडा उपकेंद्र परिसरात १० मार्च रोजी घडलेल्या नवजात बाळाच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी तात्काळ कारवाई केली आहे. या प्रकरणात गारखेडा आरोग्य उपकेंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका नंदा कडू पाटील यांना त्यांच्या सेवेतून कमी करण्यात आले आहे. घटना १० मार्च रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास घडली. तिसऱ्या खेपेची गरोदर रुकसाना अजित तडवी या महिलेने प्रसूती वेदना सुरू झाल्यावर संबंधित आशा सेविकेने तिला तत्काळ उपकेंद्रात दाखल केले. परंतु, उपकेंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका नंदा कडू पाटील त्या वेळेस मुख्यालयी असल्यामुळे उपस्थित राहू शकल्या…
केवायसी बहाण्यावर शंभर ते तीनशे रुपये मागणी; महिलांचा संताप साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी शासनाच्या वतीने बांधकाम कामगार महिलांना गृह उपयोगी वस्तूंचा भांडी संच वाटप करण्यासाठी सुरू असलेल्या केंद्रावर आज संभ्रम आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या मागील गोडाऊनवर सुरू असलेल्या या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी ‘केवायसी अपडेट’ करण्याच्या बहाण्याखाली लाभार्थी महिलांकडून १०० ते ३०० रुपयांची बेकायदेशीर मागणी केल्याचे गंभीर आरोप महिलांनी केले आहेत. सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी झाली होती. शहरासह परिसरातील शेकडो महिलांनी पहाटे ६ वाजेपासूनच आपला नंबर येण्याची प्रतीक्षा सुरू ठेवली होती. या गर्दीत वयोवृद्ध महिलांचा तसेच अंगावर लहान बाळे असलेल्या मातांचा समावेश होता. रणरणत्या उन्हात तासनतास उभ्या राहून वाट…
दोन दिवसांत जळगाव हॉटेल्सची सेवा ठप्प होण्याची शक्यता साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी जळगावमधील हॉटेल उद्योग आता गॅस तुटवड्यामुळे कठीण परिस्थितीशी सामना करीत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अमेरिका-इराण संघर्षामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम झाला असून, शहरात सध्या गॅसचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील प्रमुख वितरकांकडे सध्या मर्यादित साठा उपलब्ध असून, परिस्थिती अशीच राहिली तर येत्या दोन दिवसांत अनेक हॉटेल्सची शेगडी विझण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २५०० हून अधिक हॉटेल्स पूर्णपणे व्यावसायिक गॅसवर अवलंबून आहेत. पुरवठा खंडित झाल्यामुळे हॉटेल मालकांना तातडीने उपाययोजना करावी लागत आहेत. काही हॉटेल्समध्ये जास्त गॅस लागणारे पदार्थ बनवणे तात्पुरते थांबवले गेले असून, मेनूमध्ये कपात करावी लागली…
गॅस वितरणातील अनियमिततेवर नागरिकांनी तक्रार करा – प्रशासनाचे आवाहन साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा अवैध वापर, साठेबाजी आणि संभाव्य काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात विशेष भरारी पथक स्थापन करण्यात आले असून हे पथक गॅस वितरण व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर गॅस टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही उपाययोजना केली आहे. पश्चिम आशिया प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा पुरवठा नागरिकांपर्यंत सुरळीत राहावा, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. काही…
दोन नंबर प्लेटची कार ठरली जीवघेणी पाच जण जखमी साईमत/मुक्ताईनगर / प्रतिनिधी नागपूर–मुंबई महामार्गावर मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाटा परिसरात बुधवारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने राँग साइडने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच मजुरांना जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जळगावकडून मुक्ताईनगरच्या दिशेने येणारी कार अचानक राँग साइडने आली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजुरांवर धडकली. या भीषण अपघातात प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख, काशीनाथ साळुंखे, मुरली कोळी आणि ज्ञानेश्वर कोळी हे पाच जण जखमी झाले. अपघाताचा मोठा आवाज ऐकून…
दोन पंप बंद, एकावर गर्दी; जळगावातील रिक्षाचालक त्रस्त साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी शहरात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाचालकांचे अक्षरशः हाल होत आहेत. शहरातील दोन महत्त्वाचे गॅस पंप बंद असल्यामुळे उरलेल्या एकमेव पंपावर रिक्षांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्याचे धक्कादायक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गॅस भरण्यासाठी चालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून या परिस्थितीमुळे रिक्षाचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या रोजीरोटीवरही संकट ओढवले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील दोन प्रमुख गॅस पंप बंद असल्यामुळे रिक्षाचालकांना उपलब्ध असलेल्या एकमेव पंपावरच अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी पंप परिसरात प्रचंड गर्दी होत…