तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर लाक्षणिक उपोषण सोडले

0
2

साईमत पाचोरा  प्रतिनिधी

सद्यस्थितीत राज्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार आहे. आता पळवाट न काढता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा युवक महासंघाचे तालुकाध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष गणेश जनार्दन शिंदे हे गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजेपासून पाचोरा तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास बसले होते.

अखेर सायंकाळी ४:४५ वाजता तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी उपोषणस्थळी येवून आपली मागणी शासनापर्यंत तात्काळ पोहचवू, असे आश्वासन दिल्यानंतर गणेश शिंदे यांनी उपोषण सोडले.

उपोषणाला येथील सकल मराठा प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, पाचोरा तालुका पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, संभाजी ब्रिगेड, मनसे शेतकरी संघटना, अखिल भारतीय कुणबी परिषद, बल्लाळेश्वर युवा फाउंडेशन, भाजपा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महिला मानवाधिकार संघटना, ग्राहक सेवा संघ, क्षत्रिय गृप, श्रीमंत उदयनराजे भोसले समर्थक गु्रप, विविध सामाजिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, पंचायत समितीचे मा. सभापती अनिल पाटील, बन्सीलाल पाटील, पंढरीनाथ पाटील, सुभाष पाटील, ॲड. अविनाश भालेराव, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल बागुल, महासचिव दीपक परदेशी, एम. एस. पी. बिल्डकॉनचे संचालक मनोज पाटील, भरत खंडेलवाल, मा. नगरसेवक विकास पाटील, पद्‌‍मसिंग पाटील, अशोक मोरे, हरिभाऊ पाटील, किशोर बारावकर, ॲड. अण्णा भोईटे, क्षत्रिय गु्रपचे धनराज पाटील, एकलव्य संघटनेचे सुधाकर वाघ, शाहीर शिवाजीराव पाटील, प्रवीण पाटील, रणजित पाटील, राहुल बोरसे, खंडु सोनवणे, रेखा पाटील, ललिता पाटील, प्रा. सुनिता मांडोळे, विशाल हटकर, रुग्णवाहिका चालक बबलु मराठे, बाबाजी ठाकरे, पत्रकार संदीप महाजन, प्रा. सी. एन. चौधरी, प्रवीण ब्राम्हणे, मिलिंद सोनवणे, किशोर रायसाखडा, प्रमोद सोनवणे, अनिल येवले, प्रमोद पाटील, शामकांत सराफ, राहुल महाजन, प्रविण बोरसे, नंदकुमार शेलकर, प्रशांत येवले, साहेबराव पाटील यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here