कोयता थेट डोक्यात अडकला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद; रुग्णालयात गंभीर जखमी साईमत / स्नेहल निमगिरे, पुणे / प्रतिनिधी पुण्यातील वाघोली परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या एका भयानक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चहा पिण्यासाठी थांबलेल्या नागेश जगताप या तरुणावर अचानक कोयत्याने हल्ला झाला. हल्ला इतका भीषण होता की कोयता थेट त्याच्या डोक्यात अडकला. माहितीनुसार, नागेश आपल्या मित्रासोबत रायसोनी कॉलेजसमोर हॉटेलसमोर चहा पित होता. या वेळी जुन्या वादातून संतप्त आरोपी मंगेश सांगळे आपल्या दोन मित्रांसह तेथे आला. सुरुवातीला वादविवाद झाला, त्यानंतर आरोपीने नागेशवर कोयत्याने सपासप वार केले. हल्ल्यात नागेशच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर गंभीर इजा झाली. आरोपीने मारलेला कोयता डोक्यात अडकल्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेत…
Author: saimat
बसस्थानकातील दुचाकी चोरी; आरोपींना तीन दिवसांची कोठडी साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी : नविन बसस्टँड परिसरात मोटार सायकल चोरीच्या घटनांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्याने धडक कारवाई केली असून, तीन आरोपींना ताब्यात घेऊन दोन मोटार सायकल जप्त केल्या आहेत. जिल्हापेठ पोलीस ठाण्याला (CCTNS क्र. ४३/२०२६) अंतर्गत दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून प्रभारी अधिकारी यांनी तत्काळ पथक तयार केले आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध सुरू केला. गोपनीय तपासानंतर आरोपी मलीक अल्ताफ अहमद अन्सारी, मोहम्मद मुज्जमील अब्दुल खालक आणि अबुबकर नईम कौसर (रा. मालेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्यांनी जळगाव…
साईमत / नवी दिल्ली / मुंबई / प्रतिनिधी नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2026 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. आठव्या केंद्रीय वेतन आयोगाचा अहवाल या वर्षी लागू होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 20 ते 35 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. पगारवाढीची पार्श्वभूमी सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी किमान मूळ वेतन 18,000 रुपये आणि कमाल मूळ वेतन 2.5 लाख रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आले होते. आठव्या वेतन आयोगांतर्गत पगारवाढीचा अंदाज मागील आयोगांचा अनुभव, फिटमेंट फॅक्टर आणि महागाई दर यावरून लावला जात आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की फिटमेंट फॅक्टर 2.4…
१० ग्रॅम सोन्यासाठी भाव १,६१,१९५ रुपये साईमत/वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे देशातील सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या संकटामुळे आणि निर्यात-आयात ठप्प झाल्यामुळे सोनं-चांदीचे मार्केट अस्थिर झाले आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण युद्ध सुरू झाल्यापासून सराफ बाजारात सोन्याच्या दरात गेल्या 16 दिवसांत तब्बल 10 हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर, चांदीच्या दरात 34 हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज जळगावच्या बाजारात 10 ग्रॅम सोन्यासाठी 1 लाख 61 हजार 195 रुपये (जीएसटीसह) मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी 2…
यश सुनील झाडे यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; पोलीस तपास सुरू साईमत/ नागपूर / प्रतिनिधी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ताजी घटना समोर येत असतानाच, नागपूरमध्येही एका १२ वीच्या विद्यार्थ्याने धक्कादायक पद्धतीने आत्महत्या केली आहे. मृतकाचे नाव यश सुनील झाडे असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. माहितीनुसार, यश झाडे मानेवाडा येथील जवाहर नगर परिसरात राहात होता. नुकत्याच संपलेल्या १२ वीच्या परीक्षांनंतरही तो दररोज घरच्यांना “पेपर आहे” असे सांगून बाहेर जात असे. कालदेखील त्याने घरातून पेपर असल्याचे सांगून निघाला, मात्र रात्री उशिरापर्यंत परत आला नाही आणि त्याचा फोनही बंद होता. कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीची तक्रार दाखल केली.…
लोखंडी रॉड-विळ्याने हल्ला, ८ जणांवर गुन्हा साईमत/ जळगाव / प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील आसोदा गावात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. खुन्नस देणे व शिवीगाळ केल्याच्या कारणावरून रविवारी (१५ मार्च) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत लोखंडी रॉड आणि विळ्याचा वापर करून एका व्यक्तीला गंभीर दुखापत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसोदा गावातील गॅरेज चालक शेख सलीम शेख लतीफ (वय ५४, रा. भादली रोड) यांना संशयितांनी शिवीगाळ केली. त्यानंतर जाहीद शेख रऊफ याच्यासह इतर सात जणांनी लोखंडी…
पार्किंग बंदी असूनही प्रवासी वाहने उभी राहतात साईमत/भुसावळ / प्रतिनिधी, भुसावळच्या बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीचा मोठा सुळसुळाट सुरु आहे, आणि संबंधित यंत्रणांच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून खासगी वाहनांद्वारे बिनधास्त प्रवासी वाहतूक केली जात असून, एसटी महामंडळ, रेल्वे प्रशासन आणि वाहतूक शाखा यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही, त्यामुळे नियम तोडणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे. बसस्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरु असून, क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरून मुक्ताईनगर, बोदवड, यावल, फैजपूर, सावदा, जामनेर आणि जळगाव या मार्गांवर प्रवासी वाहून नेले जात आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या…
साईमत/ धरणगाव / प्रतिनिधी पैशांच्या व्यवहाराच्या वादातून ५५ वर्षीय महिलेसह त्यांच्या पतीला अमानुष मारहाण केल्याची घटना धरणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. मुलाने घेतलेल्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून संतप्त झालेल्या एका व्यक्तीने कुऱ्हाडीच्या उलट्या दांड्याने महिलेच्या डोक्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वत्सलाबाई रघुनाथ ठाकरे (वय ५५, रा. धार, ता. धरणगाव) या १४ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोरील सार्वजनिक जागेत उभ्या होत्या. यावेळी आरोपी कैलास सुपडू ठाकरे याने त्यांच्या मुलाने घेतलेल्या पैशांची मागणी केली. मात्र “त्या पैशांच्या व्यवहाराची मला माहिती नाही,” असे वत्सलाबाई यांनी सांगताच…
साईबाबा मंदिर परिसरातील बांधकामादरम्यान दुर्घटना निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणी साईमत/पाळधी/ प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे सुरू असलेल्या पर्यटन विकास प्रकल्पात सोमवारी भीषण दुर्घटना घडली. साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान अचानक निर्माणाधीन स्लॅब कोसळल्याने सात कामगार जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटन विभागाकडून पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत गेल्या काही महिन्यांपासून विविध बांधकामांची कामे सुरू आहेत. सोमवारी कामगार नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना अचानक बांधकामाचा साचा आणि स्लॅब कोसळला. क्षणातच मोठा आवाज झाला आणि परिसरात…
७ कामगार जखमी, दोघांची प्रकृती गंभीर साईमत/ जळगाव / प्रतिनिधी जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या पर्यटन विकास कामादरम्यान आज मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना अचानक तयार होत असलेला स्लॅब कोसळल्याने सात कामगार जखमी झाले असून त्यापैकी दोन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर परिसराचा विकास पर्यटन प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून येथे विविध बांधकामांची कामे सुरू आहेत. मात्र आज बांधकाम सुरू असतानाच अचानक स्लॅब कोसळल्याने कामगारांमध्ये घबराट पसरली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सात कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोन जणांची प्रकृती…