मुंबई : मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीची जय्यत तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत इंडिया बैठकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. पुढील काळात राजकीय घडामोडीचे केंद्र मुंबई असेल असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरातील विरोधी पक्षांची ‘इंडिया’ या नावाने आघाडी तयार करण्यात आली आहे. आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे, तर दुसरम्ी बंगळूरुत झाली, तिसरी बैठक मुंबईत होत आहे. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. देशातील सुमारे २६ हून अधिक पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना…
Author: saimat
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं २४ ऑगस्ट रोजी पहाटे निधन झालं. वांद्य्रातील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव आणि सीमा देव हे सिनेसृष्टीतील गाजलेलं नाव होतं. या दोघांनी एकत्र सिनेमे करत इंडस्ट्री गाजवली, तसंच त्यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांना शेवटपर्यंत साथ दिली. २०१३ मध्ये सीमा आणि रमेश देव यांनी त्यांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस साजरा केला होता. सीमा देव यांनी लग्नाच्या ५०व्या वाढदिवशी दोघांच्या आयुष्याबाबत काही गोष्टी शेअर केल्या होत्या. सीमा त्यांनी त्यांच्या ५० वर्षांच्या सहजीवनाचं रहस्य सांगितलं होतं. सीमा यांनी लग्नाच्या ५० वर्षाच्या प्रवासाबाबत बोलताना सांगितलं, की लग्न झाल्यानंतर ५० वर्ष कशी गेली…
अमळनेर : आज चंद्रयान -3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर माजी केंद्रीय दळणवळण मंत्री विजय नवल पाटील यांनी सन 1980 मधील इतिहासाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते म्हणाले की, ‘एक गोष्ट खान्देशासाठी व महाराष्ट्रासाठी लक्षात आणून देणे, त्याची माहिती नवीन तरुणांना करून देणे हे महत्त्वाचं आहे..’ चांगल्या इतिहासाच्या संशोधनाचे एक प्रतीक म्हणून माजी खासदार विजय नवल पाटील 1980 मध्ये एरंडोल मतदार संघातून निवडून गेल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या मंत्रिमडळात त्यांची केंद्रीय दळणवळण मंत्री म्हणून नियुक्ती केली होती.त्यांच्या माध्यमातून बंगरूलू येथील इस्रोच्या प्रकल्पातील अधिकाऱ्यांना विजय नाना यांनी संबोधित केले व इस्रोच्या प्रकल्पासंदर्भात पाहणी केली. आणि विशेष म्हणजे त्यावेळेला अब्दुल कलाम…
अहमदनगर : अहमदनगरमध्ये पत्नी हयात असताना तिला घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने चांगलाच धडा शिकवला आहे. लग्नाची घटका जवळ येत असतानाच पहिल्या पत्नीने लग्नामध्येच गोंधळ घालून पतीसह वराडींना थेट पोलीस ठाण्यामध्ये खेचले आहे. या सगळ्या प्रकारानंतर एकच गोंधळ उडाल्याने लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी आणि वऱ्हाडी मंडळींनी आश्चर्य व्यक्त केले आहे. जालना येथील विशाल पवार याचे लग्न बारा वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील मुलीसोबत झाले होते. आधी लग्न झालेले असतानाही विशाल पवार हा अहमदनगर येथे दुसरा विवाह करत असल्याची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली होती. त्यानंतर तिने आपल्या मुलासह आई-वडिल आणि नातेवाईकांना सोबत घेऊन नगर गाठले आणि ज्या मंगल…
नवी दिल्ली : मणिपूर येथील जातीय संघर्षांत अनेक रहिवाशांनी ओळखीची कागदपत्रे गमावली आहेत हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने सर्वोच्च न्यायालयाला राज्य सरकार आणि ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’सह (यूआयडीएआय) संबंधितांना आदेश देण्याची विनंती केली आहे. विस्थापितांना आधार कार्ड उपलब्ध करून दिल्यानंतर पीडितांना भरपाई योजना व्यापकरित्या राबवता येईल,असे समितीने नमूद केले आहे. न्यायमूर्ती गीता मित्तल यांच्या अध्यक्षतेखालील सर्व महिला सदस्य असलेल्या या समितीत निवृत्त न्यायमूर्ती शालिनी पी. जोशी आणि आशा मेनन यांचाही समावेश आहे. विस्थापित व्यक्तींची व्यक्तिगत कागदपत्रे, मणिपूर बळी नुकसान भरपाई योजना, 2019 आणि कारवाई सुलभ करण्यासाठी ‘डोमेन’तज्ञांची नियुक्ती यासंदर्भात तीन अहवाल सर्वोच्च न्यायालयास सादर केले. मणिपूरमधील…
मुंबई ः प्रतिनिधी पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घ्यायला सुरुवात केली आहे. आधी येवला, मग बीड आणि आता कोल्हापुरात शरद पवारांची सभा होणार आहे. येत्या 25 तारखेला कोल्हापुरातील दसरा चौकात शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या सभेतून शरद पवार काय भूमिका मांडणार? कुणावर टीका करणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. शरद पवारांच्या कोल्हापुरातील सभेबाबत प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला जे योग्य वाटते, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रशासनावर…
नवीदिल्ली ः काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करण्यात आली होती. यानंतर स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणात आरोपी असलेल्या माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एएस बोपन्ना आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांनी यापूर्वी जानेवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. पण मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. यानंतर प्रदीप शर्मा यांनी…
संभाजीनगर ः केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.यासाठी भाजपा अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.छत्रपती संभाजीनगरमधून डॉ. भागवत कराड यांना निवडून आणायचे असेल तर ‘एमआयएम’च्या इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवणे आवश्यक आहे, तशी आमची दोस्ती आहे,असे वक्तव्य दानवे यांनी केले आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार इ्म्तियाज जलील हे दानवे यांच्या शेजारीच बसले होते. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ शिवसेना-भाजपाची युती असताना असताना शिवसेनेच्या ताब्यात होता. शिवसेनेमध्ये आता दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांचा गट भारतीय…
बीड : बीडच्या राजकारणात होत असलेली खळबळ आणि काका पुतण्यांचे वाद जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. मात्र, आता जयदत्त क्षीरसागर यांना दुसरा मोठा धक्का बसत आहे तो म्हणजे त्यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. त्यानिमित्त आज बीडमध्ये योगेश क्षीरसागर यांच्याकडून मोठ्याप्रमाणावर जाहिरातबाजी केली जात आहे. जाहिरातीच्या बॅनर्सवर जयदत्त क्षीरसागर यांचे फोटो लागल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमवीर जयदत्त क्षीरसागर यांनी प्रसारमाध्यांसमोर महत्त्वाचा खुलासा केला आहे. आज मुंबईमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाशी माझा कसलाही संबंध नाही. सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही राजकीय निर्णय घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मी यापूर्वीही जाहीर केली होती. तरीही माझा…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील तीन तरुण सोमवारी रामेश्वर तीर्थक्षेत्राजवळील नदीत बुडाले होते. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पट्टीच्या पोहणाऱ्या तरूणांकडून बुडालेल्या तरुणांचा शोध घेतला जात असताना दोन तरुणांचे मृतदेहच हाती आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तिसऱ्या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. सागर अनिल शिंपी, अक्षय शिंपी आणि पियुष रवि शिंपी (तिन्ही रा. एरंडोल) अशी बुडालेल्या तीनही तरुणांची नावे आहेत. हे तीनही तरुण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, एरंडोल शहरातील भगवा चौकातील काही तरूण…