नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावर राज्य सरकारची कठोर कारवाई साईमत नाशिक प्रतिनिधी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून, दोषींवर नक्कीच कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. अशोक खरात याने दैवी शक्ती असल्याचा दावा करत अनेक महिलांची फसवणूक करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप समोर आले आहेत. या प्रकरणामुळे राज्यभर संताप व्यक्त होत असून, सरकारने तपासाला गती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मुख्य आरोपीला कोणत्याही परिस्थितीत वाचवले जाणार नाही.” ते पुढे म्हणाले की, सामाजिक दबावामुळे अनेक पीडित महिला पुढे येण्यास घाबरत…
Author: saimat
साईमत / जळगाव / प्रतिनिधी युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला असून, ग्राहकांकडून सिलिंडर वेळेत मिळत नसल्याची तक्रार होत आहे. तसेच, काही घरगुती सिलिंडर व्यावसायिक कारणासाठी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाने धाडसत्र राबविले. गेल्या आठवडाभरात २८१ ठिकाणी धाडी टाकल्यानंतर घरगुती १९ सिलिंडरचा व्यावसायिक वापर स्पष्ट झाला असून, प्रशासनाने १८ हजार १३४ रुपये किमतीचे सिलिंडर जप्त केले आहेत. महसूल विभागाचे पथक ठिकठिकाणी हॉटेल, खानावळी व लहान व्यावसायिकांकडून घरगुती गॅसचा गैरवापर शोधत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने दि. १३ मार्चपासून गॅस कंपन्यांकडून उपलब्ध साठ्याचा दैनंदिन अहवाल घेणे सुरू केले असून, तीनही गॅस…
धुळे–सुरत महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवास बनला धोक्याचा, नागरिकांनी केला आवाज साईमत नवापूर प्रतिनिधी धुळे–सुरत महामार्गावरील पानबारा परिसरात आज सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. एमएच 06 बीई 3640 क्रमांकाची बोलेरो गाडी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली, ज्यात पाच मजूर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जामोद येथील मजूरांना बडोद्याकडे कामासाठी घेऊन जात असलेल्या या बोलेरो गाडीचा अचानक एका खोल खड्ड्यात आदळून चालकाचे नियंत्रण सुटलं. अपघात इतका अचानक झाला की प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. जखमींची नावे: राजेश चिमण भोसले (वय 55),कृष्णा देवा पवार (वय 23),प्रतिमा पवार (वय 20),कल्पना भोसले (वय 40),वास्तव पवार (सर्व रा. जामोद, ता. साक्री) स्थानिक नागरिकांनी धाव…
८,९३१ दिवस सत्तेवर; पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडीत काढला; डिजिटल आणि राजकीय वर्चस्व कायम साईमत / नवी दिल्ली / प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशातील कोणत्याही निवडून आलेल्या सरकारचे ‘सर्वाधिक काळ प्रमुख’ म्हणून पद भूषवणारे ते पहिले नेते ठरले आहेत. सत्तेच्या सर्वोच्च पदावर त्यांचे ८,९३१ दिवस पूर्ण झाले आहेत. मोदींच्या या कामगिरीमुळे सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग (८,९३० दिवस) यांचा विक्रम मोडीत काढला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे पंतप्रधान असा दोन्ही कार्यकाळ मिळून मोदींनी हा टप्पा गाठला असून, त्यांनी सत्ताप्रमुख म्हणून २५व्या वर्षात पदार्पण केले आहे. मोदींच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण…
दारूच्या नशेत पतीने मारहाण, सासरच्या मंडळींनी पाठबळ; पोलीस तपास सुरू साईमत / भुसावळ / प्रतिनिधी भुसावळ भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील रिता मुकेश सुतार यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करून माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता पती मुकेश गजानन सुतार आणि सासरच्या ५ इतर सदस्यांविरुद्ध भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीनुसार, विवाह २०१२ मध्ये रितीरिवाजानुसार झाल्यानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत असले तरी नंतर पती आणि सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. पती वारंवार दारूच्या नशेत घरी येऊन शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच, “तुझ्या…
गुळी नदी पुलावरून ढकलले आणि डोक्यात दगड टाकून हत्या साईमत चोपडा प्रतिनिधी: चोपडा तालुक्यातील नारोद येथील एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरवून ठेवले आहे. घरगुती वादाला कंटाळलेला मोठा भाऊ, किरण पानचंद पाटील (वय ३०), यांनी आपल्या लहान भावाचा, रोहन पानचंद पाटील (वय २७), खून करण्याची कबुली दिली आहे. २१ मार्च रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास गुळी नदीच्या पात्रात रोहनचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. मृतदेहाच्या डोक्याला, गळ्याला आणि पायाला गंभीर जखमा होत्या, ज्यावरून घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ताबडतोब दाखल झाले. पोलीस तपासात समोर आले की, रात्री २० मार्च रोजी किरणने रोहनला दारू पिण्यासाठी पाच हजार रुपये दिले. त्यानंतर…
साईमत / पुणे / प्रतिनिधी पुण्यातील उच्चभ्रू बाणेर परिसरात पोलिसांनी एक मोठे ड्रग रॅकेट उध्वस्त केले आहे. हळदीच्या पाकिटांमध्ये गांजा विकल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला. बाणेर पोलीसांनी आरोपी अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे यांना अटक केली असून, दोघांकडून एकूण 16 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावर सुरुवातीला तीन किलो गांजा ताब्यात घेतला गेला. चौकशीदरम्यान आरोपींनी पिंपरी-चिंचवड येथील आपल्या घरात अमली पदार्थ साठवले असल्याचे मान्य केले. यानंतर पोलिसांनी तातडीने छापेमारी करून 13 किलो गांजा जप्त केला. अटक केलेले दोन्ही आरोपी एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. तपासात असे…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)–नागपूर तसेच पुणे–नागपूर या मार्गांवर या विशेष सेवा चालवण्यात येणार असून जळगाव आणि भुसावळ स्थानकांवरही थांबे देण्यात आले आहेत. एलटीटी–नागपूर विशेष गाडी (क्र. ०१०२१) ही ३ एप्रिल रोजी पहाटे १२.५५ वाजता एलटीटी येथून सुटून त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. परतीची नागपूर–एलटीटी गाडी (क्र. ०१०२२) ही ३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता एलटीटी येथे येईल. या गाड्यांना ठाणे,…
२० मिनिटांत लेवा बोर्डिंगवरील कचरा हटवला, नागरिकांचे आभार साईमत जळगाव प्रतिनिधी शहराच्या मध्यवर्ती भागातील लेवा बोर्डिंग सभागृहाबाहेर कचऱ्याचा ढीग पाहून महापौर दीपमाला काळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शनिवारी सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सभागृहाजवळील साफसफाई केली, मात्र गोळा केलेला कचरा सभागृहाच्या मुख्य दरवाजाजवळच ढिगाऱ्याच्या स्वरूपात ठेवून कर्मचारी निघून गेले. स्थानिक नागरिकांनी दुपारी १ वाजेपर्यंत कचरा उचलण्याची विनंती केली, तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उद्घाटनासाठी सभागृहात पोहोचताच महापौरांनी कचऱ्याचे साम्राज्य पाहून नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी परिस्थितीची माहिती दिली आणि महापौरांनी क्षणाचाही विलंब न लावता आरोग्य विभागाला कचरा उचलण्याचे आदेश दिले. महापौरांच्या तत्परतेनंतर आरोग्य विभागाने तातडीने कारवाई केली. अवघ्या अर्ध्या तासात महापालिकेचे कर्मचारी…
नग्न करून खांब्याला बांधून मारहाण, पत्नीचे अपहरण ५ आरोपी अटकेत गंभीर जखमी तरुण रुग्णालयात जिल्हाभरात संतापाची लाट साईमत भुसावळ प्रतिनिधी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणावर अमानुष अत्याचार करून त्याला नग्न अवस्थेत खांब्याला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. याच वेळी संबंधित तरुणाच्या पत्नीचे जबरदस्तीने अपहरण केल्याची संतापजनक बाब समोर आली असून या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. चेतन दिलीप जंगले (वय २५, रा. खडका) याने शिरपूर कन्हाळा येथील एका तरुणीसोबत १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथील पंचवटी परिसरात प्रेमविवाह केला…