आमदार किशोर पाटील यांची घोषणा ग्रामीण वाहतुकीला मोठा दिलासा साईमत/पाचोरा / प्रतिनिधी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील रस्ते सुधारणा व पुलांच्या बांधकामासाठी एकूण २५ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या विकासकामांना सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाचोरा यांच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. या वेळी पत्रकार परिषदेत बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपजिल्हाप्रमुख व उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, तसेच लखीचंद पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, अर्थसंकल्पीय तरतुदीतून मंजूर झालेल्या या कामांमुळे…
Author: saimat
खान्देश कन्या महिला विकास मंडळाने आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जरंडी गावातील ८० वर्षीय वृद्ध महिलेवर कथित लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना घडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसंबंधी गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या या घटनेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जळगाव येथील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. माहितीनुसार, घरात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेवर आरोपी रमजान शेख याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सन्मानासोबतच सुरक्षिततेवर चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अशा अमानवी आणि संतापजनक घटनेने सामाजिक…
श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्यात सेवेकरींचा उत्स्फूर्त सहभाग साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी प.पु. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि युवा संत आदरणीय चंद्रकांत दाद यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री स्वामी समर्थ केंद्र जानकी नगर तर्फे आयोजित जळगाव ते त्र्यंबकेश्वर पायी पालखी सोहळा यंदा दहाव्या वर्षी उत्साहात प्रस्थान झाला. सोमवारी सकाळी ८ वाजता ‘श्री स्वामी समर्थ’ नामाच्या जयघोषात भक्तांचा उत्साह झळकला, तर सामाजिक बांधिलकीची जाणीवही जाणवली. भक्तीसोबत पर्यावरणीय जबाबदारी या दहाव्या वर्षाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ आध्यात्मिक आनंद नव्हे, तर सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारी देखील यामध्ये समाविष्ट आहे. प्रवासादरम्यान डॉ. लीना पाटील यांच्या नेतृत्वाखाली, भक्तांना मातीची भांडी (परळ) वाटप करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. याशिवाय, मार्गातील नद्यांची…
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने घेतला गळफास साईमत/चाळीसगाव / प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली असून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निलेश पाटील असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथील रहिवासी होते. रविवारी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, निलेश पाटील हे जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दरम्यान, कोदगाव येथील…
टाकरखेडा–दहिवद रस्त्यावर अपघात पायी चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू साईमत/अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील दहिवद गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत एका ४८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील विटनेर गावातील रहिवासी पंढरीनाथ विठ्ठल पाटील (वय ४८) हे अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथून दहिवद गावाकडे पायी जात होते. दहिवद गावाजवळील रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकी (क्र. एमएच १९ डीझेड १६४०) ने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पंढरीनाथ पाटील यांच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने…
मुलांना वाचवण्यासाठी प्राणदान करणाऱ्या धाडसी तरुणांचा आदर साईमत/ भडगाव / प्रतिनिधी भडगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात रविवारी घडलेली दुर्दैवी घटना शहरासह परिसरात शोककळा पसरवणारी ठरली. मुलांना वाचवण्यासाठी धाडसाने नदीत उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नदीम खान नसीम खान (वय २७) व काफिया शरीफ पिंजारी (वय १६) हे दोघे गिरणा नदीत अडकलेल्या लहान मुलांना तातडीने वाचवण्यासाठी नदीत उतरे. मात्र नदीत खोल खड्ड्यांमुळे त्यांचा तोल गमावला आणि दोघेही पाण्यात बुडले. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, पण तेव्हा पर्यंत दोघांचा मृत्यू झालेला होता. परिसरातील नागरिकांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत, दोघांच्या धाडसाचे कौतुक केले. नागरिकांच्या मते, नदीपात्रात रात्रीच्या…
महिला सशक्तीकरणाचं जळगावात उत्सव महापौर काळे यांचे मार्गदर्शन साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे महिला सशक्तीकरण आणि समाजकल्याणाला प्रोत्साहन देणारा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उत्कृष्ट महिला कर्मचारी, बचत गट आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तर महिलांच्या आरोग्य आणि नेतृत्वशक्तीवर विशेष मार्गदर्शन देण्यात आले. महापौर दीपमाला काळे यांनी महिलांसमोर मार्गदर्शन करत सांगितले की, “महिला सक्षम झाल्या तर संपूर्ण समाज प्रगत होतो. महिलांनी स्वतःचे आरोग्य जपावे, मानसिक आणि शारीरिक सक्षम राहावे. घरापुरते मर्यादित न राहता प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा.” त्यांनी दररोज योगा, व्यायाम आणि पायी चालणे यासारख्या आरोग्यवर्धक सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.…
भरदिवस चोरीची धक्कादायक घटना; लेलेनगर मजुराचे घर फोडले साईमत/पहूर (ता. जामनेर) / प्रतिनिधी लेलेनगर भागात भरदिवस घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका मजुराच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १,४६,००० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेनंतर पाहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताराचंद बाबुलाल भोई (वय ५२, रा. लेलेनगर, पहूर) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ६ मार्च रोजी दुपारी सुमारे ४ वाजता ते घराबाहेर गेले असताना, पुढच्या दिवशी, म्हणजेच ७ मार्च रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप…
जळगावात महिला क्रीडाविषयी जागरूकता वाढीसाठी कार्यक्रम साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांमध्ये क्रीडाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच शहरी व ग्रामीण भागातील महिला खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, असे उद्देश ठेवून आयोजित केलेल्या अस्मिता लीग’ चे उद्घाटन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. यावेळी त्यांनी महिलांना क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले. विभागीय क्रीडा संकुल मैदानावर आयोजित या कार्यक्रमात महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी मंत्री खडसे यांनी सायकल स्पर्धा व वॉकेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवून शुभारंभ केला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ.…
आ. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश तीन तालुक्यांतील रस्ते सुधारणा आणि पुलाचे काम होणार साईमत/ मुक्ताईनगर / प्रतिनिधी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. राज्याच्या ६ मार्च रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ विविध रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मतदारसंघातील रस्ते विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मतदारसंघातील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच सार्वजनिक…