Author: saimat

 समाजबांधवांचा मोठा सहभाग साईमत / जळगाव / प्रतिनिधी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी के.बी.एस. समाजमंदिर येथे उत्साहात पार पडली. या सभेत सर्वानुमते योगेश अनिल बागडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सभेची सुरुवात सचिव राहुल नेतलेकर यांनी प्रास्ताविक करून केली. त्यांनी मागील बैठकीच्या कार्यवाहीचे वाचन केले तसेच संस्थेचा वार्षिक अहवाल उपस्थितांसमोर सादर केला. कार्यक्रमात मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे यांसह विजय अभंगे, नरेश बागडे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, गणेश बागडे, वीर दहियेकर, गौतम बागडे, क्रांती बाटूंगे, संदीप बागडे, पंकज गागडे, कार्तिक बाटूंगे, सुमित माछरे, जयेश माछरे आदी समाजबांधव…

Read More

धूर उठताच चालकाने गाडी थांबवली; भीषण आग नियंत्रणात साईमत / वरणगाव  / प्रतिनिधी भरधाव आयशर मालवाहू गाडीत अचानक आग लागल्याने संपूर्ण वाहन जळून खाक झाले, मात्र चालकाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना जळगाव-वरणगाव फॅक्टरी फाट्याजवळ घडली, ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, दिपनगरहून मुक्ताईनगरकडे सिमेंटचे ब्लॉक नेणारी आयशर गाडी (क्र. एमएच ४८ एजी २२६८) लाल माती परिसरात पोहोचल्यावर अचानक धूर उठू लागला. चालक शाहेद खान यांनी परिस्थिती ओळखत गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली व स्वतः बाहेर पडत आपले जीव वाचवले. काही क्षणांतच भीषण आग लागून संपूर्ण वाहन जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिस स्टेशनचे…

Read More

साईमत / नवी दिल्ली / प्रतिनिधी पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महत्त्वाचे भाषण करत भारताची भूमिका स्पष्ट केली. गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि परदेशातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, होर्मुज सामुद्रधुनीत कोणताही अडथळा निर्माण होणे भारताला मान्य नाही. देशातील मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल, गॅस आणि खतांची आयात या मार्गावर अवलंबून असल्याने या मार्गातील अडथळ्यांचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे भारताने विविध देशांशी सातत्याने संपर्क ठेवत पर्यायी पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर दिला आहे. यासाठी आयात करणाऱ्या देशांची संख्या…

Read More

CEO कॅम्पबेल विल्सनच्या पत्रात सांगितले – मध्यपूर्वेतील संघर्षामुळे केवळ एअर इंडियाच नव्हे, तर संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्रावर परिणाम; इंधन दर दुपटीने वाढले साईमत / नवी दिल्ली / प्रतिनिधी इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे एअर इंडियाने गेल्या तीन आठवड्यांत सुमारे २,५०० उड्डाणे रद्द केली आहेत. सध्या या भागातील एअर इंडियाच्या नियमित वेळापत्रकाच्या तुलनेत केवळ ३० टक्के उड्डाणे सुरू असल्याची माहिती CEO कॅम्पबेल विल्सन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे. विल्सन यांनी नमूद केले की, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे केवळ एअर इंडियाच नव्हे, तर संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्रावर आर्थिक परिणाम होत आहेत. विमान इंधनाचे दर दुपटीने वाढल्यामुळे कंपनीला आपली ७० टक्के उड्डाणे स्थगित करावी लागली…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततामय आंदोलन ओबीसींच्या हक्कांसाठी आवाज साईमत  जळगांव  प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज भारत मुक्ती मोर्चा व पिछडावर्ग ओबीसी संघटनेतर्फे एक मोठा मोर्चा काढला गेला. मोर्च्यातील प्रमुख मागण्या ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या तातडीने आयोजनाची आणि २०११ पूर्वी शिक्षक भरती झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सोडण्याची होत्या. मोर्चाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम यांनी केले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना स्पष्ट केले की, ओबीसींच्या वास्तव आकडेवारीची जनगणना होत नसल्यामुळे समाजाच्या हक्कांचे न्यायसंगत वितरण होऊ शकत नाही. त्याचबरोबर, २०११ पूर्वी शिक्षक भरती झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेची अट लादली जात असल्याने ते शिक्षक असताना मिळालेल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेऊ शकत नाहीत,…

Read More

साईमत / नागपूर / प्रतिनिधी  राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी परिवहन मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून एसटी महामंडळाच्या ताफ्यात ३ हजार आत्याधुनिक स्मार्ट बसची भर घालण्यात येत आहे. या नवीन बसचे उद्घाटन २४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बस प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देणार आहेत. या बसमध्ये ३×२ आसनरचना असून एकूण ५६ आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्याच्या बसच्या तुलनेत १६ अतिरिक्त आसने उपलब्ध असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या बसमध्ये ४ सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली, पॅनिक बटण, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक यांसारख्या…

Read More

साईमत / जळगाव / प्रतिनिधी देशातील एकूण कृषी लागवडीखालील क्षेत्र सुमारे १८०२ लाख हेक्टर असून खरीप, रब्बी, उन्हाळी हंगाम तसेच बारमाही व फलोत्पादन पिकांमध्ये भारत अग्रस्थानी आहे. जगात कृषी उत्पादनात आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक म्हणून भारताची ओळख असली, तरी १४० कोटी लोकसंख्येची गरज भागविल्यानंतर निर्यातीसाठी उपलब्ध होणारा माल अत्यल्प आहे. याशिवाय, भारतीय शेतीमाल अनेकदा अमेरिका व युरोपच्या कठोर खाद्य निकषांवर उतरू शकत नसल्याने निर्यात मर्यादित राहते. दरम्यान, महाराष्ट्रात फलोत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली असून द्राक्षे, डाळिंब, केळी आणि हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. मात्र, अमेरिका–मध्यपूर्व तणाव आणि होर्मुज सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी,…

Read More

एक संशयित ताब्यात; पोलिसांचा तपास वेगात साईमत पाळधी  प्रतिनिधी  धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी पहाटे एका ३५ वर्षीय मजुराचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दारुड्यांमधील वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पिंटू आमशा बारेला (वय ३५, रा. बरेली, जि. बडवानी, मध्यप्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो रेल्वे रुळांवर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी (दि. २३ मार्च) पहाटे सुमारे दीड वाजेच्या सुमारास रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाळधी स्थानकाजवळ एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत…

Read More

रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली; संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात, नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप साईमत जळगाव   प्रतिनिधी शहरातील जैनाबाद परिसरात अत्यंत किरकोळ कारणावरून घडलेल्या खूनाच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. केवळ ५०० रुपयांच्या वादातून झालेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नितीन नाना काळे (वय ३५) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी श्याम तुकाराम सूर्यवंशी याने नितीन काळे याच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली होती. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. संतापाच्या भरात आरोपीने धारदार शस्त्राने नितीनवर अनेक वार केले. हे…

Read More

७९ हजारांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त, साकरीत सापळा साईमत भुसावळ  प्रतिनिधी तालुक्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश बाबुराव माळी (वय ३५, रा. सिध्देश्वर नगर, वरणगाव) हा अॅक्टिव्हावर  क्र. एम.एच.१९ डी.डी.६९१२ वरून भुसावळकडून साकरीकडे अवैध दारू वाहतूक करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. यावरून पोलिस पथकाने साकरी गावाजवळ सापळा रचला. सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन आल्यावर पोलिसांनी थांबवून तपासणी केली. तपासणीत अॅक्टिव्हावर ठेवलेल्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात दारू सापडली. आरोपीकडे दारू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना…

Read More