Author: saimat

साईमत / पुणे / प्रतिनिधी खेड तालुक्यातील जैदवाडी गावच्या हद्दीत ३३ वर्षीय तरुणाचा निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील धनंजय मारुती घेवडे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो १६ मार्चपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असतानाच जैदवाडी परिसरात त्याचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून डोक्यावर आणि तोंडावर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी सुकलेल्या रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. तसेच मृतदेहाजवळ त्याची दुचाकीही आढळली आहे. या घटनेवरून खून अत्यंत नियोजनपूर्वक आणि क्रूरपणे करण्यात आल्याचा…

Read More

साईमत / मुंबई  / प्रतिनिधी गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळगावसह राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून राज्यात अद्यापही अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाडा भागात हवेचा कमी…

Read More

ऑईलभरलेला ट्रक पलटला, दुचाकी बचावाने अपघात टळला साईमत /पाचोरा/ प्रतिनिधी पाचोरा शहरातील बायपास रोडवर आज दुपारी एका भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली. भडगावकडून पहूरकडे जात असलेला ट्रक (MH 19 CX 4699) समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना पलटी झाली, मात्र मोठी जीवितहानी टळली. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक भरधाव वेगाने बायपासवरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक दुभाजकावरील इलेक्ट्रिक पोलला धडकला आणि विरुद्ध दिशेला पलटी झाली. ट्रकमध्ये ऑईल भरलेले असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती होती.घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परतेने हस्तक्षेप करून चालकाला सुरक्षित बाहेर काढले. त्याला किरकोळ दुखापत झाली असून सध्या त्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पाचोरा बायपास हा रस्त्यावर…

Read More

चैत्र शुद्ध प्रतिपदा : हजारो साधक-भक्तांसह भव्य स्वागत यात्रा साईमत /जळगाव/ प्रतिनिधी – चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू नववर्षाच्या शुभ अवसरानिमित्त जळगाव शहरात जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आयोजित स्वागत यात्रा भव्यतेने पार पडली. शहरातील प्रमुख मार्ग भगव्या रंगाने न्हालेल्या आणि हजारो साधक-भक्तांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले. यात्रेचे आयोजन जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधाम यांच्या वतीने करण्यात आले होते. चिमुकले राममंदिर येथून सुरू झालेल्या यात्रेने शिवाजी पुतळा चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चौबे शाळा, सुभाष चौक मार्गे ग्रामदैवत श्रीराम मंदिर रथ चौक येथे आपली सांगता केली. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यात्रेचे मनापासून स्वागत केले. यात्रेच्या प्रारंभी रथामध्ये गुरुपूजन…

Read More

माजी ‘रॉ’ प्रमुख ए. एस. दुलत म्हणतात, “इराण युद्ध हरणार नाही, भारताने योग्य भूमिका घेतली पाहिजे”; २० दिवसांतील संघर्षात २,०००+ जणांचा बळी साईमत / नवी दिल्ली / प्रतिनिधी माजी भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ (R&AW) प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य करत, भारताने इराणच्या बाजूने उभे राहणे योग्य असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, “इराणने नेहमीच भारताच्या पाठीशी साथ दिली आहे, त्यामुळे आपणही इराणच्याच सोबत राहिले पाहिजे. हे युद्ध इराण हरणार नाही.” १. सध्याचे युद्ध आणि बळी: २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह आखाती देशांमधील अमेरिकी लष्करी तळ आणि इतर…

Read More

महापौरांच्या हस्ते विधीवत पूजन आणि महापुरुषांना अभिवादन साईमत /जळगाव / प्रतिनिधी मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून जळगाव शहर महानगरपालिकेच्या इतिहासात गुरुवारी, १९ मार्च रोजी प्रथमच भव्य गुढी उत्सव पार पडला. महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या सोहळ्यात भक्तीमय आणि सांस्कृतिक वातावरणाने मनपा परिसर सावरणारा ठरला. विधीवत पूजन आणि गुढी स्थापना सकाळी १० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रांगणात महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते विधीवत गुढी पूजन करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, सभागृह नेते नितीन लढ्ढा, भाजप गटनेते…

Read More

बैलगाडी चक्काचूर; वाकोद शेतकऱ्याचा पुनर्जन्म साईमत /जामनेर/ प्रतिनिधी जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाकोद येथे बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. पुण्याकडे जात असलेल्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बैलगाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत बैलगाडी चक्काचूर झाली, मात्र बैलगाडीवरील शेतकरी आश्चर्यकारकरीत्या बचावला. घटनेचे थरारक व्हिडीओ जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, जे पाहून अंगावर काटा येतो. मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी सकाळी सुमारे ८ वाजता जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी बस अतिवेगाने जात होती. वाकोद गावाजवळ, रस्त्याच्या कडेला एक शेतकरी आपली बैलगाडी घेऊन उभा होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने थेट बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.…

Read More

साईमत / अलिबाग / प्रतिनिधी अलिबाग तालुक्यात २००४ साली घडलेल्या खूनप्रकरणातील तब्बल २१ वर्षे फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोयनाड पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पनवेल येथून मनोज अशोक पांडव याला अटक केली. घटनेनुसार, घेरासागरगड वडवली येथे आरोपी मनोज पांडव याची बकरी गणेश ठाकूर यांच्या आवारात मृतावस्थेत आढळली होती. ही बकरी प्रसाद ठाकूर यांनी मारल्याचा संशय मनोज पांडव याला होता. या कारणावरून त्याने न्यायालयातही तक्रार दाखल केली होती. या वादातून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. याच रागातून २ एप्रिल २००४ रोजी रात्रीच्या सुमारास मनोज पांडव याने प्रसाद ठाकूर यांना एकटे गाठून धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा खून केला. या…

Read More

साईमत / जळगाव / प्रतिनिधी राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर त्याचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला असून जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आजही परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने १९ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज व्यक्त केला आहे. दुपारी ३ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नये, अशा सूचनाही…

Read More

साईमत / भोपाळ / प्रतिनिधी भोपाळजवळील नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर मंगळवारी संध्याकाळी हृदयद्रावक घटना घडली. एका महिलेने आपल्या आठ वर्षांच्या मुलीला चालत्या रेल्वेसमोर ढकलल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गंभीर जखमी झालेली मुलगी सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिला सरकारी कर्मचारी असून ती माळखेडा परिसरात राहते. पतीच्या निधनानंतर तिला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. घटना घडण्यापूर्वी मायलेकी सुमारे तीन तास स्थानकावर थांबल्या होत्या. सायंकाळी सुमारे ७:४० वाजता तामिळनाडू एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येत असताना महिलेने अचानक मुलीला रुळावर ढकलले. मुलगी इंजिनला धडकून प्लॅटफॉर्म आणि रुळांच्या मधील जागेत अडकली. रेल्वे पुढे गेल्यानंतर उपस्थित प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ…

Read More