पतीच्या दुसऱ्या लग्नाचे कळताच पोहोचली लग्नमंडपात; नववूधला मारत नेल पोलीस ठाण्यात

0
24

अहमदनगर :

अहमदनगरमध्ये पत्नी हयात असताना तिला घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने चांगलाच धडा शिकवला आहे. लग्नाची घटका जवळ येत असतानाच पहिल्या पत्नीने लग्नामध्येच गोंधळ घालून पतीसह वराडींना थेट पोलीस ठाण्यामध्ये खेचले आहे. या सगळ्या प्रकारानंतर एकच गोंधळ उडाल्याने लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी आणि वऱ्हाडी मंडळींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

जालना येथील विशाल पवार याचे लग्न बारा वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील मुलीसोबत झाले होते. आधी लग्न झालेले असतानाही विशाल पवार हा अहमदनगर येथे दुसरा विवाह करत असल्याची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली होती. त्यानंतर तिने आपल्या मुलासह आई-वडिल आणि नातेवाईकांना सोबत घेऊन नगर गाठले आणि ज्या मंगल कार्यालयात विशालचा दुसरा विवाह होणार होता त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घातला.

पोलीस ठाण्यात आल्यानंतर विशाल पवार याच्यावर त्याच्या पहिल्या पत्नीने गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान तोफखाना पोलिसांनी विशाल पवार यांच्याविरुद्ध भादंवि 494 नुसार पुन्हा दाखल केला आहे.
12

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here