साईमत / मुंबई / प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून खालापूर ते पनवेल दरम्यान झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, पोलो कार अतिवेगात ओव्हरटेक करत असताना चालकाचा ताबा सुटला आणि कार पलटली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला असून वाहनातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारीही याच एक्सप्रेसवेवर चार ते पाच वाहनांच्या साखळी धडकेत तीन जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी…
Author: saimat
मोबाईल लिंक हॅकिंग: शेतकऱ्याच्या खात्यातून लाखो रुपयांची चोरी साईमत /चाळीसगाव/ प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील रहिवासी महेश ईश्वर जामदार (वय ३१) यांचे बँक खाते अज्ञात सायबर चोरट्याने हॅक करून तब्बल ५ लाख ४९ हजार ४०१ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर जामदार यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून गुन्हा मंगळवारी १७ मार्च रोजी दुपारी ५ वाजता नोंदवण्यात आला. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या स्टेशन रोड शाखेत असलेल्या जामदार यांच्या बचत खात्याशी त्यांचा मोबाईल क्रमांक लिंक होता. २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या काळात अज्ञात चोरट्याने हा मोबाईल क्रमांक हॅक केला आणि त्याद्वारे बँक खात्याचा…
साईमत / पुणे / प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरात बुधवारी पहाटे एका भयानक अपघातामुळे एक तरुण ठार झाला. या अपघातानंतर पिकअप वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला, ज्यामुळे परिसरात चक्रीवादळासारखी खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर पिंपरी पेंढार गावाच्या हद्दीत सुमारे पाच वाजता हा अपघात घडला. ओतूरकडून आळेफाटाकडे जाणारी पिकअप (MH 14 HG 5686) आणि आळेफाट्याहून ओतूरकडे येणारी स्विफ्ट कार (MH 14 GY 2135) समोरासमोर जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की स्विफ्ट कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. या अपघातात स्विफ्ट कारचालक अनिकेत (मयूर) नामदेव पानसरे (रा. ओतूर) यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी सांगितले की धडक इतकी जबरदस्त होती की त्यांना…
नागरिक त्रस्त, आरोग्यावरही धोकादायक परिणाम साईमत /भुसावळ/ प्रतिनिधी: शहरातील खडका चौक परिसरातील कॉलन्यांमध्ये नागरिकांचे जीवन अक्षरशः कठीण बनले आहे. गॅलेक्सी हॉटेलच्या मागील भागातील आयान कॉलनी, जिया कॉलनी, अली रजा कॉलनी, फातिमा कॉलनी आणि हलीमा मस्जिद कॉलनीमध्ये कचरा, नाली आणि रस्त्यांच्या समस्येमुळे परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, अनेक वेळा भुसावळ नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन दिले असतानाही अद्याप मूलभूत समस्या कायम आहेत. घरगुती कचरा, प्लास्टिक, अन्नाचे उरलेले पदार्थ यांसारखा कचरा मोठ्या प्रमाणावर साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेची फिरती कचरा गाडी नियमित येत नसल्यामुळे नागरिकांना खुल्या जागेत कचरा टाकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. साचलेल्या कचऱ्यामुळे माशा, डास आणि इतर कीटकांचे प्रमाण वाढले…
साईमत / मुंबई / प्रतिनिधी राज्यातील एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या असून, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना १०० टक्के गॅस पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली. राज्यातील रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असून एलपीजी आणि पीएनजीचे उत्पादन सुरू आहे. एलपीजी उत्पादन ९,००० मेट्रिक टनांवरून ११,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आले आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरू नये यासाठी रेडिओ, एफएम, दूरदर्शन आणि मुद्रित माध्यमांद्वारे नियमित माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, सोशल मीडियावरील अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. काळाबाजार रोखण्यासाठी ८ मार्चपासूनच…
शिंदे गट बळकट होणार? खासदार संपर्कात असल्याची चर्चा साईमत / मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळू लागले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील काही खासदारांना आपल्या गटात आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील निम्म्याहून अधिक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पक्षप्रवेशाच्या हालचालींना वेग आला असून, राज्यातील सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर…
साईमत / जालना / प्रतिनिधी जालना जिल्ह्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून, गुरुवार (१९ मार्च) रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटादरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, तसेच झाडे, विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि उंच इमारतींपासून दूर राहावे, असे प्रशासनाने सांगितले आहे. मेघगर्जना होत असताना मोकळ्या जागेत किंवा झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. तसेच, विजांचा कडकडाट सुरू असताना घरातील विद्युत उपकरणांचा वापर टाळण्याचा सल्लाही…
साईमत / मुंबई / प्रतिनिधी मुंबईत सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानकांना शहरातील विविध वाहतूक पर्यायांशी प्रभावीपणे जोडण्यावर भर देण्यात येत आहे. स्थानकांच्या परिसरात ‘स्टेशन प्लाझा’ विकसित करून प्रवाशांना बस, टॅक्सी, रिक्षा आणि इतर साधनांपर्यंत सहज पोहोचता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. हाय-स्पीड रेल्वेला शहराच्या वाहतूक व्यवस्थेशी जोडण्यासाठी मल्टी-मोडल इंटिग्रेशन (MMI) प्रणाली राबवली जाणार असून, यामुळे प्रवाशांना स्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना कोणतीही अडचण येणार नाही. बुलेट ट्रेनमधून उतरल्यावर थेट स्टेशन प्लाझामधून पुढील प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होणार असल्याने ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ अधिक सोपी होईल. स्टेशन प्लाझा हे सार्वजनिक जागेप्रमाणे विकसित करण्यात येणार असून, येथे पार्किंग, पिक-अप व…
लाचेच्या जाळ्यात स्टॅम्प वेंडर; भाऊसह रंगेहात अटक साईमत/पाचोरा / प्रतिनिधी पाचोरा शहरात स्टॅम्प पेपर विक्रीतील अनियमिततेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत अधिकृत स्टॅम्प वेंडर आणि त्याच्या भावाला रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम आकारत लाच मागणाऱ्या या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे. तक्रारदारास वैयक्तिक कामासाठी ५०० रुपये किंमतीचे १० स्टॅम्प पेपर आवश्यक होते. यासाठी ते दि. १५ मार्च २०२६ रोजी पाचोरा येथील जामनेर रोडवरील ‘प्रशांत झेरॉक्स’ येथे गेले. येथे अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश ईश्वरलाल संघवी याने प्रति स्टॅम्प ५५० रुपये दर सांगत एकूण ५,५०० रुपयांची मागणी केली. शासनाने ठरविलेली किंमत ५००…
शहरातील सुमारे २० ते २२ ठिकाणी धाडी टाकून तपासणी केली. साईमत/मलकापूर/ प्रतिनिधी : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे अत्यावश्यक वस्तूंच्या संभाव्य तुटवड्याची शक्यता लक्षात घेता मलकापूर शहरात पुरवठा विभागाने कडक भूमिका घेतली आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पुरवठा अधिकारी धनश्रीताई हरणे यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ (कलम ३) तसेच ‘मेंटेनन्स ऑफ प्रॉडक्शन, स्टोरेज अँड सप्लाय’ आदेशानुसार ९ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गॅस एजन्सी धारक, पेट्रोल पंप चालक, हॉटेल, उपहारगृह, ढाबे तसेच मंगल कार्यालय चालकांना घरगुती गॅसचा…