माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी चंद्रयान-3 यशानिमित्त ऐतिहासिक आठवणींना दिला उजाळा

0
2
अमळनेर :
आज चंद्रयान -3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर माजी केंद्रीय दळणवळण मंत्री विजय नवल पाटील यांनी सन 1980 मधील इतिहासाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते म्हणाले की, ‘एक गोष्ट खान्देशासाठी व महाराष्ट्रासाठी लक्षात आणून देणे, त्याची माहिती नवीन तरुणांना करून देणे हे महत्त्वाचं आहे..’
चांगल्या इतिहासाच्या संशोधनाचे एक प्रतीक म्हणून माजी खासदार विजय नवल पाटील 1980 मध्ये एरंडोल मतदार संघातून निवडून गेल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या मंत्रिमडळात त्यांची केंद्रीय दळणवळण मंत्री म्हणून नियुक्ती केली होती.त्यांच्या माध्यमातून बंगरूलू येथील इस्रोच्या प्रकल्पातील अधिकाऱ्यांना विजय नाना यांनी संबोधित केले व इस्रोच्या प्रकल्पासंदर्भात पाहणी केली. आणि विशेष म्हणजे त्यावेळेला अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती हे इस्त्रोचे प्रमुख होते. त्यांनी विजय नानांना सुचवलं की, स्पेस रिसर्च वार्षिक बजेट मध्ये भरघोस तरतूद व्हावी. अशी आमची विनंती आपल्या मार्फत तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींना कळवावी. आणि नानांनी ते काम चांगल्या पद्धतीने केलं. आणि बजेट दुप्पट झाला. एवढंच नाही तर 50 किलो वजन वाहून नेणारे सॅटेलाईट अवकाशात सोडला गेला. त्याचा त्यावेळी लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये प्रकटन व मांडणी देखील करण्याचा मान जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी श्री विजय नाना यांना मिळाला. या इतिहासाच्या आठवणींना उजाळा व्हावा आणि त्याची नवीन तरुणांना माहिती व्हावी,त्यांना प्रेरणा मिळावी.अशी नानांची इच्छा आहे.
त्यावेळी एका बाजूला अमेरिका आणि रशिया या दोन बलाढ्य देशांचं या जगावर प्रभुत्व होत. काही दिवसापूर्वी रशियाचे लुना यान चंद्रावर उतरताना कोसळले. आणि आपला विकसनशील देश नरेंद्र मोदींजीच्या नेतृत्वाखाली चंद्रयान -3 चंद्रावर यशस्वी रित्या उतरवतो..याचा अभिमान वाटून विजय नवल पाटील यांनी आदरणीय पंतप्रधान मोदीजींचे,मिशनमधील इस्रोच्या शास्रज्ञांचे व देशाच्या जनतेचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here