Author: saimat

मोबाईलऐवजी मूल्यशिक्षणाकडे वळवणारा उपक्रम :महापौर दीपमाला काळे साईमत जळगाव प्रतिनिधी आजच्या डिजिटल युगात लहान मुले मोबाईलमध्ये अधिक गुंतलेली दिसतात. अशा परिस्थितीत त्यांना मानवी मूल्ये, सामाजिक जाणीव आणि कलेची ओढ निर्माण करणारे उपक्रम अत्यंत गरजेचे आहेत, असे प्रतिपादन महापौर दीपमाला काळे यांनी केले. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. पाल्यांसोबत पालकांनाही आपले बालपण पुन्हा अनुभवता यावे, या उद्देशाने शहरातील भाऊंचे उद्यान येथे दि. २४, २५ व २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता या तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंठा…

Read More

हवेतील आर्द्रता घटल्याने उकाडा वाढला; २८ एप्रिलपर्यंत तापमान ४४ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज साईमत / जळगाव जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी तापमान ४३.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. हवेतील आर्द्रता मोठ्या प्रमाणात घटल्याने आणि उत्तर भारतात सक्रिय असलेल्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. परिणामी, जळगावकर अक्षरशः होरपळून निघत आहेत. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, येत्या २८ एप्रिलपर्यंत ही उष्णतेची तीव्रता कायम राहणार असून पारा ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस जळगावकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या सुमारास उकाड्याची तीव्रता प्रचंड…

Read More

बर्डे प्लॉट परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने खळबळ; चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल साईमत / बुलडाणा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात नाचताना झालेल्या किरकोळ धक्क्याच्या रागातून एका २३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री बर्डे प्लॉट परिसरात ही घटना घडल्याने संपूर्ण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बर्डे प्लॉट परिसरातील स्मशानभूमीजवळ एका लग्न समारंभात डीजे सुरू असताना अनेक तरुण नाचत होते. यावेळी शोएब खान अमीन खान (वय २३) याचा नाचताना एका व्यक्तीला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर काही क्षणांतच भीषण हल्ल्यात झाले. चार ते पाच जणांच्या टोळक्याने…

Read More

दोन ते तीन जणांकडून चालकाला मारहाण धारदार शस्त्राने वार साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरात शनिवारी दुपारी भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेत ट्रक चालकावर धारदार शस्त्राने वार करून त्याला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात शंकर कारभारी मगर (वय ४२, रा. अहिल्यानगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शंकर मगर हे ट्रक चालक असून ते आपल्या वाहनासह एमआयडीसी परिसरात आले होते. शनिवारी दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान त्यांच्याजवळ दोन ते तीन अनोळखी इसम आले. त्यांनी प्रथम चालकाला मारहाण करून दहशत निर्माण केली आणि नंतर धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर…

Read More

विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग; संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण चर्चा साईमत चोपडा  प्रतिनिधी चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण आणि यशस्वी वातावरणात पार पडला. विविध महाविद्यालयांतील सदस्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे मेळाव्याला विशेष रंगत आली. दादासाहेब डॉ. सुरेश पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पंकज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच समाजकार्य महाविद्यालयातील सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेळाव्याची सुरुवात ‘एन-मुक्ता’ जळगाव जिल्हाध्यक्ष नितीन बारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख अतिथी म्हणून कांचन महाजन व पवन पाटील उपस्थित होते. प्रारंभी प्रा. डॉ. चंद्रकांत देवरे यांनी संघटनेचे गीत सादर करून वातावरणात ऊर्जा निर्माण केली. प्रास्ताविक प्रा.…

Read More

दहा वर्षांपासून अविरत उपक्रम; दररोज १५० ते ३०० लिटर पाण्याची सेवा साईमत जळगाव प्रतिनिधी कडक उन्हामुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी जळगाव शहरातून एक दिलासादायक उपक्रम पुढे आला आहे. जळगाव येथील नवीन बसस्थानकात गेल्या दहा वर्षांपासून ‘जलसेवा’ हा उपक्रम अत्यंत निष्ठेने आणि सातत्याने राबविला जात असून, हजारो प्रवाशांची तहान भागवण्याचे महत्त्वपूर्ण काम यामार्फत केले जात आहे. जळगाव जिल्हा माहेश्वरी समाज, प्रेम फाउंडेशन आणि कलंत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेची सुरुवात होताच, म्हणजेच २५ मार्च ते १ जून या कालावधीत बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी थंड पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात येते. रोजच्या धावपळीत आणि उन्हाच्या झळा सहन करत प्रवास…

Read More

राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आज महत्त्वाच्या दौऱ्यानिमित्त जळगावमध्ये दाखल झाले साईमत जळगाव प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आज महत्त्वाच्या दौऱ्यानिमित्त जळगावमध्ये दाखल झाले. शिरपूर येथून हेलिकॉप्टरने त्यांनी जळगाव विमानतळावर आगमन केले. त्यांच्या आगमनावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याची विशेष बाब म्हणजे, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पारंपरिक पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक भेट देत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. या उपक्रमामुळे स्वागताला एक वेगळा आणि अर्थपूर्ण आयाम प्राप्त झाला. ज्ञान आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या कृतीचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान वातावरण सौहार्दपूर्ण आणि उत्साही होते. या प्रसंगी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा…

Read More

प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष; खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांवर संकटाची शक्यता साईमत जळगाव प्रतिनिधी राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत २७ एप्रिल २०२६ पासून राज्यभरातील विक्री केंद्रे बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि किटकनाशके मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाराष्ट्र फर्टीलायझर्स, पेस्टीसाईड्स आणि सीड्स डिलर्स असोसिएशनने कृषी विभागाला दिलेल्या निवेदनात गेल्या अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याची खंत व्यक्त केली आहे. कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) यांना सादर केलेल्या निवेदनात विक्रेत्यांनी व्यवसायातील अनेक गंभीर अडचणींचा पाढा वाचला आहे.…

Read More

उष्णतेच्या झळांमध्ये दिलासा; मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज साईमत / नवी दिल्ली राज्यात सध्या हवामानाने दुहेरी स्वरूप धारण केले आहे. एकीकडे कडक उन्हाचा तडाखा जाणवत असून दुसरीकडे काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना अस्थिर हवामानाचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित झाले असून दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. पुढील महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, उष्णतेच्या झळांमध्ये…

Read More

 तरसोद फाट्याजवळ दुचाकीस्वार घसरून पडले; सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली तातडीची कारवाई साईमत नशिराबाद प्रतिनिधी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच प्रसंगी जनतेच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारीही पोलिसच पार पाडतात, याचे जिवंत उदाहरण जळगाव बायपासवरील तरसोद फाट्याजवळ मध्यरात्री घडलेल्या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले. रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमुळे संभाव्य मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र नशिराबाद पोलिसांच्या तत्परतेमुळे ही गंभीर दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे ११.४५ वाजता तरसोद फाट्याजवळ एक जेसीबी यंत्र अचानक बिघाडामुळे बंद पडले. याच दरम्यान त्यातून मोठ्या प्रमाणात ऑईल गळती होऊन ते थेट जळगाव बायपास रस्त्यावर पसरले. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून वाहनांचा वेगही…

Read More