Author: saimat

साईमत / छत्तीसगड छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील बुंदेली गावात एक मन हेलावून टाकणारी आणि धक्कादायक घटना घडली आहे. वैवाहिक वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सालिक राम नावाच्या व्यक्तीने बुधवारी संध्याकाळी आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केली. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. विशेषतः चारित्र्यावरून घेतल्या जाणाऱ्या संशयामुळे दोघांमध्ये सातत्याने भांडणे होत असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशी सकाळी दोघांमध्ये तीव्र वाद झाला होता. त्यानंतर संध्याकाळी दोघांनी एकत्र बसून मद्यसेवन केल्याची माहितीही मिळत आहे. यानंतर आरोपीने संतापाच्या भरात पत्नीवर हल्ला करून तिची हत्या केली. या घटनेनंतर…

Read More

साईमत / जळगाव जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा कहर आता जीवघेणा ठरत असून, रावेर शहरात उष्माघातामुळे एका कष्टकरी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. योगेश सुधाकर महाजन (रा. रावेर) असे मृत कामगाराचे नाव असून ते अत्यंत मेहनती आणि कुटुंबासाठी झटणारे व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ते बांधकाम क्षेत्रात मोलमजुरी करत होते. वाढत्या खर्चामुळे ते अतिरिक्त उत्पन्नासाठी फावल्या वेळेत दुध डेअरीतही काम करत असत. दिवसभर कडाक्याच्या उन्हात काम केल्यानंतर त्यांना तीव्र उष्णतेचा त्रास जाणवू लागला. रात्री त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. उष्णतेच्या झळांमुळे तब्येत अधिकच खालावली आणि रात्री सुमारे…

Read More

धुके, पाऊस आणि अंधारात बचावकार्याला अडथळे; अनेक तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर साईमत / सातारा  तालुक्यातील आंबेनळी घाट येथे अत्यंत दुर्दैवी अपघात घडून एका दांपत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुमारे ९०० फूट खोल दरीत मोटारसायकलसह कोसळल्याने हा अपघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाटातील कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीत रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत मोटारसायकल आढळून आल्याने स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, मुसळधार पाऊस, दाट धुके आणि अंधार यामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. बचाव पथकाने दोरांच्या सहाय्याने खोल दरीत उतरून शोधकार्य सुरू ठेवले. प्रतिकूल हवामानामुळे रात्री उशिरा काही…

Read More

साईमत / ठाणे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली. सेटीस ब्रिजवर उभी असलेली ‘शिवशाही’ बस अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. काही क्षणांतच बसमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडू लागले आणि आगीने भीषण रूप धारण केले. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस ठाणे येथून पालघरमार्गे बोईसरकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र ठाणे स्टेशनजवळ पोहोचल्यानंतर बस अचानक बंद पडली. चालकाने तपासणी करण्याचा प्रयत्न करत असतानाच बसच्या खालच्या भागातून धूर येऊ लागला आणि काही क्षणांतच आग भडकली. इंजिन व डिझेल टाकीजवळ आग लागल्याने ती झपाट्याने संपूर्ण बसमध्ये पसरली. घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे 15 प्रवासी होते. आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी…

Read More

साईमत / गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून एका 21 वर्षीय तरुणाने गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी सुमित ऊईके हे एकाच गावातील असून त्यांची मागील दोन वर्षांपासून ओळख होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी आरोपीने मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. त्यानंतरही तो सतत तिचा छळ करत होता. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीवर जबरदस्तीने बसवून तिला गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नेले. तिथे त्याने “माझ्याशी…

Read More

साईमत / कोल्हापूर अंत्यसंस्काराच्या गडबडीचा फायदा घेत चोरट्याने घरातील तब्बल 16 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी मंडई परिसरात घडली आहे. लक्ष्मीपुरी मंडईतील तीन मजली इमारतीत राहणाऱ्या हमीदा अब्दुलमजीद खाटिक (वय 70) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यानंतर बुधवारी कुटुंबीय तळमजल्यावर अंत्यसंस्काराची तयारी करत असताना वरच्या मजल्यावर घरफोडी करण्यात आली. नातेवाईक व पाहुण्यांच्या गर्दीचा फायदा घेत चोरटा वरच्या मजल्यावर गेला आणि लाकडी कपाट फोडून 16 तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे अलंकार चोरून नेले. काही वेळाने कुटुंबीय खोलीत गेले असता घरातील साहित्य विस्कळीत अवस्थेत आढळून आले आणि चोरीचा प्रकार उघड झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांना दुहेरी धक्का बसला…

Read More

अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई; ३१ इराणी जहाजांचा मार्ग रोखल्याने पश्चिम आशियात तणाव शिगेला साईमत / ववृत्तसंथा पश्चिम आशियात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, अमेरिकेने इराणविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत इराणच्या समुद्री हालचालींवर निर्बंध आणत अमेरिकेकडून नाकेबंदीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे ३१ इराणी जहाजांचा मार्ग रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. CENTCOM च्या माहितीनुसार, १३ एप्रिलपासून ही कारवाई सुरू असून सामुद्रधुनीतून संशयित जहाजांना प्रवेश रोखला जात आहे. रोखण्यात आलेल्या जहाजांमध्ये तेलवाहू टँकरचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. काही जहाजांनी अमेरिकेच्या नियमांचे पालन केल्याचीही माहिती आहे. या कारवाईसाठी अमेरिकेने मोठ्या प्रमाणात लष्करी तैनाती केली…

Read More

जळगाव सराफ बाजारात सोनं १२०० रुपयांनी तर चांदी ५००० रुपयांनी स्वस्त; तरीही दर उच्च पातळीवर कायम साईमत / जळगाव रोजच्या घडामोडीनुसार सोने-चांदीचे नवीन दर जाहीर होत असून जळगावच्या सराफ बाजारात या मौल्यवान धातूंना चांगली मागणी कायम आहे. आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात घट झाल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली येताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा दर घसरणीच्या दिशेने वळल्याने बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या काळात सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असून दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला ताण येत आहे. मे…

Read More

PUC नसलेल्या वाहनांना इंधन बंदी नवा आदेश लागू साईमत / नवी दिल्ली राजधानीतील वाढत्या वायू प्रदूषणावर आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने ‘नो PUC, नो फ्युएल’ हा नियम कठोरपणे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र (PUC) नसलेल्या वाहनांना आता कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन देण्यात येणार नाही. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत या नियमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत स्पष्ट निर्देश दिले. मागील वर्षी डिसेंबरमध्ये हा नियम लागू करण्यात आला असला, तरी त्याची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे PUC नसलेली अनेक वाहने अद्याप रस्त्यावर धावत असून प्रदूषणात वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. नव्या आदेशानुसार, सर्व पेट्रोल…

Read More

साईमत / पुणे कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या पुणेकरांना अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला असला, तरी गारपिटीच्या तडाख्याने नागरिक आणि शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शहरासह ग्रामीण भागात झालेल्या या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. आज पुण्यात अलका टॉकीज चौक ते कोथरूडपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. कोथरूड, वारजे, डेक्कन, माळवाडी, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे या भागात पावसासोबत टपोऱ्या गारांचा जोरदार वर्षाव झाला. सायंकाळी अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे परिसरातही गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. ढगांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका आणि कांदा या पिकांचे…

Read More