मुली व महिलांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन साईमत जळगाव प्रतिनिधी मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी या उद्देशाने नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने, महिला व बाल विकास विभाग जळगाव यांच्या सहकार्याने विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थिनींना व महिलांना विविध महत्त्वाच्या हेल्पलाईन क्रमांकांची सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमात महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा, याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महिला हेल्पलाईन १०९१, चाइल्डलाइन १०९८ आणि पोलीस आपत्कालीन सेवा १०० या महत्त्वाच्या क्रमांकांची सविस्तर माहिती देत त्यांच्या वापराबाबत प्रात्यक्षिक स्वरूपात समजावून सांगण्यात आले. कोणत्याही अडचणीच्या किंवा धोकादायक परिस्थितीत न घाबरता त्वरित…
Author: saimat
गरिबीवर मात करत शाईस्ताची महाराष्ट्र पोलीस दलात निवड साईमत पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी : अठरा विश्व दारिद्र्य, उपासमारीची तीव्र झळ, वीटभट्टीवर राबणारे आई-वडील आणि घरातील सततचा संघर्ष… अशा कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शाईस्ता दादाराव तडवी हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवत यशाचा नवा इतिहास रचला आहे. तिच्या या यशामुळे हिवरखेडा गावात अभिमानाचा क्षण अनुभवायला मिळाला आहे. सात बहिणींनंतर जन्मलेला भाऊ आणि आर्थिक चणचण या सर्व संकटांनी तिच्या स्वप्नांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आई-वडिलांनी मुलींच्या शिक्षणावर कधीही तडजोड केली नाही. “माझी मुलगी पोलीसच होणार” हा दृढ विश्वास त्यांनी मनात जपला…
जळगावहून इंदूरमार्गे दिल्लीसाठी त्रि-साप्ताहिक विमानसेवा २ मेपासून सुरू साईमत जळगाव प्रतिनिधी जळगावकरांसाठी हवाई प्रवासाच्या क्षेत्रात मोठी आनंदवार्ता समोर आली असून, शहराच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. जळगाव विमानतळावरून आता दिल्ली आणि इंदूरसाठी थेट विमानसेवा सुरू होत असून, ही सेवा २ मे २०२६ पासून प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित केली जाणार आहे. Alliance Air या कंपनीमार्फत सुरू होणारी ही सेवा दिल्ली–इंदूर–जळगाव तसेच जळगाव–इंदूर–दिल्ली या मार्गावर आठवड्यातून तीन दिवस—मंगळवार, गुरुवार आणि शनिवार—अशी त्रि-साप्ताहिक स्वरूपात चालवली जाणार आहे. या नव्या हवाई जोडणीमुळे जळगावचे उत्तर भारताशी असलेले संपर्क अधिक मजबूत होणार आहेत. या सेवेमुळे जळगावकर प्रवाशांना थेट राजधानी दिल्लीपर्यंत जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा…
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत पाळधी येथे महिलांना स्वच्छतेचे प्रशिक्षण साईमत पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी: ‘माझं गाव-स्वच्छ गाव’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून, या चळवळीला महिला बचत गटांनी पुढाकार देणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महिला बचत गट म्हणजे परिवर्तनाची शक्ती असून, गावांच्या सर्वांगीण विकासात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ‘स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२’ अंतर्गत ‘कचऱ्याचे विलगीकरण, सार्वजनिक स्वच्छता व वर्तन बदल’ या विषयावरील महिला बचत गट प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव…
महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकारातून प्रमुख चौकांमध्ये पाण्याची फवारणी; उष्णतेत तात्पुरता थंडावा साईमत जळगाव प्रतिनिधी शहरात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असताना जळगाव महानगरपालिकेने उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी ‘वॉटर शॉवर’चा अनोखा उपक्रम राबविला. तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेल्याने शनिवारी दुपारी शहरातील प्रमुख चौक आणि मुख्य रस्त्यांवर टँकरच्या सहाय्याने पाण्याची फवारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे कडक उन्हात होरपळणाऱ्या जळगावकरांना काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळाला. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. उन्हाच्या तीव्र लाटेमुळे दुपारच्या वेळेत रस्ते अक्षरशः तापून निघत असून नागरिकांसह वाहनधारकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेने दोन…
गुणवत्तेला तडजोड नाही; प्रत्येक मतदारसंघात समित्या स्थापन करून कामे गतीने पूर्ण करण्याचा आदेश साईमत जळगाव प्रतिनिधी राज्य शासनाची मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना ही शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणारी असून या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्हास्तरीय समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, ही योजना केवळ कागदावर मर्यादित नसून बळीराजाच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारी आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. रस्त्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समित्या स्थापन करून स्थानिक आमदारांना विश्वासात…
वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महापालिकेची मोठी कारवाई; जेसीबीच्या ताफ्यासह धडक मोहीम साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने अतिक्रमणांविरोधात सुरू केलेली मोहीम शुक्रवारी (२४ एप्रिल) मानराज पार्क ते खोटे नगर परिसरात अधिक तीव्र झाली. सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेल्या या कारवाईत रस्त्यालगतची अनधिकृत दुकाने, टपऱ्या, हातगाड्या तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोठ्या फौजफाट्यासह या भागात प्रवेश करताच परिसरात एकच खळबळ उडाली. अनेक अतिक्रमणधारकांनी तातडीने आपली दुकाने हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही ठिकाणी पथकाने थेट कारवाई करत साहित्य जप्त केले. कारवाईदरम्यान एका महिलेने पथकाशी वाद घालत विरोध…
भावनिक निरोप आणि नव्या पर्वाची सुरुवात; जळगाव जिल्हा परिषद रंगली साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा परिषदेत आज प्रशासनिक बदलाचा ऐतिहासिक आणि भावनिक संगम पाहायला मिळाला. नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, तर मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. छत्रपती शाहू महाराज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साह आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाची सुरुवात औपचारिक स्वागत समारंभाने झाली. करिष्मा नायर यांचे पुष्पगुच्छ आणि टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा उल्लेख करत उपस्थित अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली नवे उपक्रम राबवले जातील, असा ठाम विश्वास व्यक्त केला.…
साईमत / नवी दिल्ली मध्य-पूर्वेत आधीच तणावग्रस्त असलेल्या परिस्थितीत आता जागतिक सागरी व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मलक्का सामुद्रधुनीबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या Hormuz Strait परिसरात इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे व्यापार मार्ग विस्कळित झाला आहे. त्यातच आता आणखी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे Malacca Strait चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशिया सरकार या अत्यंत वर्दळीच्या सागरी मार्गावर टोल (शुल्क) लावण्याचा विचार करत आहे. इंडोनेशियाचे अर्थमंत्री पुर्बाया युधि सदेवा यांनी याबाबत संकेत देत सांगितले की, जागतिक व्यापारात देशाची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी अशा प्रस्तावांवर चर्चा सुरू आहे. हा मार्ग इंडोनेशिया,…
कर्णकर्कश आवाजावर कारवाई; जळगावात सायलेन्सरचा चक्काचूर साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील वाढत्या बेशिस्त वाहनचालकांवर आणि वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांवर जळगाव शहर वाहतूक शाखेने सन २०२६ मध्ये मोठी आणि ठोस कारवाई करत रस्ता सुरक्षा अभियान अधिक तीव्र केले आहे. या विशेष मोहिमेत तब्बल १०० कर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त करून ते रोडरोलरच्या सहाय्याने निकामी करण्यात आले, तर २५० फॅन्सी नंबर प्लेट्सही जप्त करून नष्ट करण्यात आल्या. वाहतूक शाखेच्या पथकांनी शहरात तपासणीदरम्यान असे निदर्शनास आणले की, अनेक दुचाकींवर कंपनीकडून बसविण्यात आलेल्या सायलेन्सरऐवजी बाहेरून बदल करून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवण्यात आले आहेत. या सायलेन्सरमुळे स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या…