Author: saimat

नागपूरहून लग्नासाठी निघालेले नांदे कुटुंब दुर्घटनेत उद्ध्वस्त; एक जखमी साईमत / अमरावती वरूड–मोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील खडका फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. समाधान नांदे, किरण नांदे आणि तीन वर्षीय दिया नांदे यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून, गोपाळ नांदे हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नांदे कुटुंबातील चौघेही नागपूर येथून लग्न समारंभासाठी निघाले होते. वरूड तालुक्यातील खडका फाट्याजवळ त्यांच्या वाहनाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल…

Read More

नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार; आरोपीविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल साईमत / नाशिक सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत एका तरुणीला गुंगीकारक पेय देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात सिद्धार्थ पवार (वय ३३, रा. इंदिरानगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित तरुणी ही मुंबईतील बोरिवली येथे एका फार्मा कंपनीत नोकरी करते. एप्रिल २०२६ दरम्यान ‘युनिगॅदर’ या इन्स्टाग्राम पेजवरील कार्यक्रमासाठी ती नाशिक येथे आली होती. ५ एप्रिल रोजी गंगापूर रोड परिसरातील एका कॅफेमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान तिची आरोपीशी ओळख झाली. आरोपीने स्वतःला अविवाहित असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. यानंतर दोघांमध्ये…

Read More

साईमत / नागपुर नागपुरातील अंबाझरी परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणात कौटुंबिक वाद आणि कथित मानसिक त्रासाचा मुद्दा पुढे आला आहे. पोलिसांनी मृत कर्मचाऱ्याच्या पत्नी आणि तिच्या परिचित व्यक्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव शीलरत्न भीमराव बेलेकर असून ते प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पत्नी रुचिका बेलेकर (वय ३२) आणि महेश मेश्राम यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महेश मेश्राम हा शिक्षक असून, गेल्या काही काळापासून त्यांचे रुचिकासोबत संबंध असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात कौटुंबिक मतभेद वाढले होते. घटस्फोट आणि संपत्तीच्या…

Read More

उष्णतेची लाट तीव्र; दिवस-रात्र उकाड्याने नागरिक हैराण, पुढील काही दिवसही दिलासा नाही साईमत / जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या सूर्य अक्षरशः आग ओकत असून उष्णतेच्या तीव्रतेने यंदाच्या हंगामातील सर्व विक्रम मोडले आहेत. रविवारी (दि. २६ एप्रिल) जळगावचे कमाल तापमान तब्बल ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे या हंगामातील सर्वोच्च नोंद ठरले आहे. गेल्या पंधरवड्यापासून ४१ ते ४२ अंशांदरम्यान असलेला पारा आता झपाट्याने वाढत ४४ अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे जळगावकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेचा परिणाम केवळ दिवसा नव्हे, तर रात्रीही जाणवत आहे. रात्रीचे तापमानही २८ अंशांपर्यंत पोहोचल्याने घरामध्ये कूलर, पंखे असूनही फारसा दिलासा मिळत…

Read More

अज्ञात वाहनाच्या कटमुळे अपघात; पोलिस हवालदाराच्या कुटुंबाचा थरारक जीवित बचाव साईमत / चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात रविवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाने अचानक कट मारल्यामुळे कार थेट सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने ही कार एका मोठ्या झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला आणि कारमधील चारही जणांचा जीव वाचला. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथून छत्रपती संभाजीनगर कडे जात असताना मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्याचे हवालदार दिनेश बारड (वय ५१) हे आपल्या कुटुंबासह प्रवास करत होते. त्यांच्या सोबत पत्नी तेजश्री बारड (४८), मुलगी नंदिनी बारड (२२) आणि मुलगा वेदांत बारड (१८) असे चौघे जण कारमध्ये होते. रविवारी सायंकाळी सुमारे…

Read More

जमशेदपूर स्थानक परिसरातील घटना; व्यावसायिक वादातून हत्येची शक्यता साईमत / जमशेदपूर शहरातील टाटानगर रेल्वे स्थानक परिसरात रविवारी रात्री उशिरा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी रेल्वेच्या लोको पायलटवर जवळून गोळी झाडून त्यांची निर्घृण हत्या केली. जी. के. मीना असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मीना हे रात्री उशिरा लोको पायलट लॉबीकडे जात असताना दोन हल्लेखोरांनी त्यांना लक्ष्य केले. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी जवळून गोळी झाडली, जी थेट त्यांच्या कपाळात लागली. गंभीर जखमी अवस्थेत ते जागीच कोसळले. हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी मीना यांना…

Read More

दरखेडा येथे समोरासमोर धडक; स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल साईमत / धुळे शिंदखेडा तालुक्यातील दरखेडा परिसरात भीषण अपघात घडून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चिमठाणे गावाजवळील दरखेडा येथे हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. मृत्यूमुखी पडलेले दोघेही तरुण दुचाकीवर प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी झालेल्या चार जणांना स्थानिकांच्या मदतीने त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक…

Read More

साईमत / उत्तर प्रदेश मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे एक महत्त्वाची घटना घडली आहे. मुंबईहून उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या AI63 (काही वृत्तांनुसार AI633) या विमानात उड्डाणानंतर लवकरच तांत्रिक बिघाडाचे संकेत मिळाल्याने पायलटने तत्काळ आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला. हे विमान सुरक्षितपणे भोपाळ विमानतळावर उतरवण्यात आले. विमानात एकूण १७५ जण प्रवास करत होते, ज्यामध्ये १६६ प्रवासी आणि ९ क्रू मेंबर्सचा समावेश होता. सुदैवाने, सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून लँडिंगनंतर त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. एअर इंडियाच्या माहितीनुसार, तांत्रिक अडचणीची जाणीव होताच पायलटने नियमानुसार (SOP) त्वरीत कारवाई केली. एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत समन्वय साधत आपत्कालीन प्रक्रिया राबवण्यात आली, ज्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला.…

Read More

माहेरी राहणाऱ्या पत्नीवर रात्री छतावरून घरात शिरून चाकूहल्ला; सासरे व ३ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी, आरोपी फरार साईमत / उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील नगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बछईपुर गावात एक अत्यंत धक्कादायक दुहेरी हत्याकांड घडले आहे. कौटुंबिक वादातून पतीनेच आपल्या पत्नी आणि सासूची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंतू गुप्ता (वय ५५) यांनी आपली मुलगी प्रीती (वय २२) हिचा विवाह काही वर्षांपूर्वी गढवार भागातील अमित गुप्ता याच्याशी केला होता. मात्र, वैवाहिक जीवनात सतत वाद होत असल्याने प्रीती गेल्या काही महिन्यांपासून आपल्या तीन वर्षांच्या मुलासह माहेरी राहत होती. घटनेच्या रात्री…

Read More

व्हाइट हाऊसजवळील हिल्टन हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेनंतर ट्रम्प, मेलानिया आणि जेडी वेन्स सुरक्षित स्थळी हलवले; हल्लेखोर ताब्यात साईमत / वृत्तसंस्था अमेरिका आणि इराण यांच्यातील दुसरी बैठक अयशस्वी ठरल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. वॉशिंग्टन डीसीतील व्हाइट हाऊसजवळील हिल्टन हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. या वेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स हे पत्रकारांसोबत डिनर पार्टीत सहभागी होते. अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू येताच सुरक्षा यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली. सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी क्षणाचाही विलंब न करता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष वेन्स यांना सुरक्षितपणे हॉटेलमधून बाहेर काढत व्हाइट हाऊसमध्ये हलवले. याचवेळी…

Read More