Author: saimat

साईमत / जयपूर  राजस्थानातील अलवर जिल्ह्यात मुंबई–दिल्ली एक्स्प्रेसवेवर बुधवारी रात्री भीषण अपघात घडून पाच जणांचा जळून मृत्यू झाला. धावत्या कारला अचानक आग लागल्याने काही क्षणांतच वाहन जळून खाक झाले. हा अपघात लक्ष्मणगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजपूरजवळ रात्री सुमारे ११ वाजता घडला. संबंधित कार सीएनजी आणि पेट्रोलवर चालणारी होती. प्राथमिक तपासानुसार, कारमधून अचानक सीएनजी गळती सुरू झाली आणि त्यानंतर भीषण आग लागली. काही सेकंदांतच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने आत असलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेत तीन महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्व मृतक हे श्योपूर जिल्ह्यातील चैनपुरा गावचे रहिवासी असून वैष्णोदेवी दर्शन…

Read More

साईमत / चाळीसगाव  सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले नकली पिस्तूल (एअर गन) जप्त करण्यात आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन गोल्हार या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया खात्यावर पिस्तूल हातात घेऊन फोटो व व्हिडिओ पोस्ट केले होते. या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत चाळीसगाव शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. मंगळवारी रात्री…

Read More

वराडजवळ क्रूझरचे चाक निखळून गाडी पलटी; सहा जण गंभीर जखमी, परिसरात शोककळा धरणगाव : तालुक्यातील वराड गावाजवळ बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. वापी (गुजरात) येथून अकोल्याकडे जात असलेल्या क्रूझर गाडीचे चाक चालू अवस्थेत निखळल्याने गाडी पलटी झाली. या दुर्घटनेत नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील पूजा रवी वागडकर (वय २२) हिचा विवाह नुकताच गुजरातमधील वापी येथे झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या नातेवाईकांसह माहेरी अकोल्याकडे परतत होती. कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला. बुधवारी सकाळी क्रूझर गाडी (क्रमांक MH 30 AZ…

Read More

लग्नसोहळ्यासाठी निघालेल्या नंदणे कुटुंबावर काळाचा घाला; एकजण गंभीर जखमी साईमत / कामठी कामठी तालुक्यातील खैरी गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नसमारंभासाठी आनंदाने निघालेल्या एका कुटुंबाचा प्रवास काही क्षणांतच शोकांतिकेत बदलला. वरुडजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खैरी येथील विनायक कॉलनीतील नंदणे कुटुंब अकोला येथे नातेवाईकाच्या विवाहसोहळ्यासाठी कारने जात होते. कुटुंबातील सदस्य आनंदात आणि उत्साहात प्रवास करत होते. मात्र वरुडजवळ पोहोचताच अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. वळण घेताना कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा…

Read More

जागतिक तणाव आणि अरामकोच्या निर्णयामुळे पुरवठा साखळीवर परिणाम; दरवाढीची भीती कायम साईमत / नवी दिल्ली जागतिक स्तरावर वाढत असलेल्या तणावाचा थेट परिणाम आता सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागला आहे. अमेरिका–इराण संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती गंभीर बनली असून त्याचा मोठा फटका तेल आणि गॅस पुरवठा साखळीला बसत आहे. जगातील सर्वात मोठी तेल कंपनी सौदी अरामकोने मे महिन्यापर्यंत एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) शिपमेंट्स पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आधीच तणावाखाली असलेल्या जागतिक पुरवठा साखळीवर आणखी दबाव निर्माण झाला आहे. दरम्यान, होर्मुज सामुद्रधुनीतील तणावामुळे या अत्यंत महत्त्वाच्या समुद्री मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल आणि गॅस पुरवठा…

Read More

जुन्या वादातून घारीवलीत हिंसाचार; अल्पवयीनासह चौघे ताब्यात, परिसरात तणाव साईमत / डोंबिवली  शहरालगतच्या घारीवली परिसरात जुन्या वादातून उफाळलेल्या हिंसाचारात एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. दहा ते पंधरा जणांच्या जमावाने तरुणाला घराबाहेर बोलावून बेदम मारहाण केली. या घटनेत वडिलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल जाधव, त्यांचे वडील बामा जाधव आणि भाऊ दिनेश जाधव हे घारीवली येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री कुटुंब जेवण करत असताना काही जणांनी दिनेश याला बाहेर बोलावले. तो बाहेर येताच आधीपासून दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या जमावाने त्याच्यावर अचानक हल्ला चढवत मारहाण सुरू केली. दिनेशला वाचवण्यासाठी…

Read More

रेल्वे बोर्डाचे निर्देश; २५ शताब्दी गाड्यांमध्ये मोठ्या सुधारणांची अंमलबजावणी साईमत / नवी दिल्ली भारतीय रेल्वेने प्रीमियम शताब्दी एक्सप्रेस आणि जन शताब्दी एक्सप्रेस गाड्यांच्या दर्जात मोठी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना अधिक आरामदायी, स्वच्छ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या गाड्यांचा व्यापक कायापालट केला जाणार आहे. दीर्घकाळापासून प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन प्रवासाचा दर्जा उंचावणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेला स्पष्ट सूचना देत प्रत्येक रेकची सखोल तपासणी करून ठराविक कालमर्यादेत सुधारणा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेअंतर्गत गाड्यांमधील आसनव्यवस्थेचे आधुनिकीकरण केले जाणार असून नवीन अपहोल्स्ट्री, स्नॅक…

Read More

साईमत / जळगाव  शहरातील तांबापुरा भागातील मच्छी बाजार परिसरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक युसूफ मुसा खाटीक (वय ६५) हे २६ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११ वाजता पत्नी सलमा बी यांच्यासोबत घराबाहेर पाणी भरत होते. याच वेळी आरोपी मोहम्मद शेख मेहमूद तेथे आला आणि त्याने दारूसाठी ५०० रुपयांची मागणी केली. सलमा बी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी संतप्त झाला आणि जवळच पडलेला दगड त्यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात त्या…

Read More

एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेटकडून गंभीर इशारा; सरकारकडे करकपात व मदतीची मागणी साईमत \ नवी दिल्ली  देशातील विमान वाहतूक क्षेत्र सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असल्याचे चित्र समोर आले आहे. इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइसजेट यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी विमान इंधन (ATF) दरातील वाढ आणि जास्त करभारामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाल्याचे स्पष्ट केले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्स या संघटनेने केंद्र सरकारला निवेदन देत परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले आहे. इंधन दरात कपात किंवा आर्थिक मदत न मिळाल्यास काही कंपन्यांना आपले कामकाज बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चापैकी जवळपास ४० ते ४५ टक्के खर्च…

Read More

ओडिशात धक्कादायक प्रकार; बँकेच्या नियमांमुळे हतबल झालेल्या भावाची संतापजनक कृती साईमत / ओडिशा बँकेच्या कठोर नियमांमुळे आणि कागदपत्रांच्या अडचणीमुळे माणुसकीला काळी छाया पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत बहिणीच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी एका भावाला तिचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत जाण्याची वेळ आली. ही घटना ओडिशातील केओंझार जिल्ह्यातील ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालिपोसी शाखेत घडली. दियानाली गावातील जितू मुंडा (५०) हा व्यक्ती आपल्या मृत बहिणी कालरा मुंडा (५६) हिच्या खात्यातील २० हजार रुपये काढण्यासाठी बँकेत गेला होता. कालरा मुंडा यांचे २६ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले होते. जितू मुंडा यांनी बँकेत अनेकदा चकरा मारल्या, मात्र प्रत्येक वेळी खातेदाराला स्वतः हजर राहण्याची…

Read More