६२५ जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचा भाग; जळगावात ‘चूल पेटवा’ निषेध साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : देशात वाढती महागाई, बेरोजगारी आणि वीज ग्राहकांवर लादल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटर प्रणालीविरोधात ‘बहुजन मुक्ती पार्टी’ यांच्या वतीने देशभरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात आज तीव्र निषेध नोंदवण्यात आला. जळगाव जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील काशिनाथ देवरे यांच्या नेतृत्वाखाली जी.एस. मैदान येथे ‘चूल पेटवा आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन विविध मागण्या सादर करण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, स्मार्ट मीटरच्या नावाखाली खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे.…
Author: saimat
साईमत न्यूज नेटवर्क – छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या दिव्यांग मुलाची निर्घृण हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या अमानुष कृत्यामागे स्वतः जन्मदाताच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, आई-वडील दोघेही सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब काही दिवसांपूर्वी रोजगाराच्या शोधात शहरात स्थलांतरित झाले होते. आर्थिक अडचणी आणि मुलाच्या दिव्यांगत्वामुळे निर्माण झालेल्या तणावातून ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस तपासातून व्यक्त केला जात आहे. मुलाचा मृतदेह हरसुल-सावंगी बायपास परिसरातील शेतात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन पंचनामा केला असून प्राथमिक…
जळगावात अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच जळगाव शहरातून पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात नोकरी करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी रोशन मुकेश निकम (वय ३३, रा. निमखेडी, जळगाव) याच्याविरुद्ध बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुणे येथे खासगी नोकरी करते. मार्च २०२४ पासून ते ११ मे २०२६ या कालावधीत आरोपी रोशन निकम याने तरुणीशी जवळीक वाढवत तिला लग्नाचे आश्वासन दिले. प्रेमसंबंधांच्या आडून…
साईमत न्यूज नेटवर्क – छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुणाने सुरू केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या अनोख्या उपक्रमाची सध्या देशभरात सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या ७२ तासांत या तथाकथित डिजिटल राजकीय चळवळीशी एक लाखांहून अधिक युवक जोडले गेल्याचा दावा करण्यात येत असून, इन्स्टाग्रामवर तब्बल २० लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स मिळाल्याने या मोहिमेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या उपक्रमामागे ३० वर्षीय अभिजीत दीपके हा युवक असून, बेरोजगार आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तरुणांचा आवाज बनण्याचा प्रयत्न या मोहिमेतून केला जात आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दीपके हा व्यावसायिक पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट आहे. पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने अमेरिकेतील बॉस्टन…
२० हातगाड्या व टपऱ्या जप्त, मद्यपींना बसला आळा साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाढत्या अराजकतेवर अखेर प्रशासनाने कठोर पावले उचलत अतिक्रमण विभागामार्फत मोठी कारवाई केली. परिसरात उघड्यावर दारू पिणाऱ्यांचा वाढता वावर, महिलांना होणारा त्रास आणि टपऱ्या-हातगाड्यांच्या आड सुरू असलेल्या अवैध प्रकारांच्या तक्रारींनंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने धडक मोहीम राबवत तब्बल २० हातगाड्या व टपऱ्या जप्त केल्या. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. गेल्या काही दिवसांपासून गिरणा टाकी परिसरात सायंकाळनंतर मद्यपींचा मुक्त वावर वाढला होता. उघड्यावर दारू पिणे, गोंधळ घालणे आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे पोहोचल्या होत्या. विशेषतः…
ओळख लपवून शेंद्रा एमआयडीसीत राहत होते आरोपी; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई साईमत न्यूज नेटवर्क – बिहारमधील एका कुटुंबातील चार जणांच्या निर्घृण हत्याकांडातील दोन मुख्य आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने शेंद्रा एमआयडीसी परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून दोन्ही आरोपींना बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गौतम उर्फ राहुल गुप्ता (वय २२, रा. डहरक, बिहार) आणि दीपक देवसिंग राजपूत (वय २७, रा. नाचनवेल, कन्नड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विकास गुप्ता याला बिहार पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचा…
साईमत न्यूज नेटवर्क – मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील गरीब नगर परिसरात मंगळवार सकाळपासून पश्चिम रेल्वेकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत ५०० हून अधिक बेकायदेशीर घरे पाडण्यात आली असून संपूर्ण परिसरात सकाळपासूनच तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या कारवाईदरम्यान पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाचे जवान मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले होते. कारवाई सुरू होण्यापूर्वीच बहुतांश रहिवाशांनी आपली घरे रिकामी केली होती. अनेक कुटुंबांनी घरातील साहित्य रस्त्यावर आणून ठेवत आपली घरे सोडली. कारवाईसाठी दोन बुलडोझरचा वापर करण्यात आला असून बेकायदेशीर बांधकामे पाडण्यास सुरुवात करण्यात आली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर आणि न्यायालयाच्या आदेशानंतर…
साईमत न्यूज नेटवर्क – मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडून मोठी दुर्घटना झाली आहे. पालघर जिल्ह्यातील धाणीवरी परिसरात वऱ्हाडी ट्रकला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. मुंबई–अहमदाबाद महामार्गवरील हा अपघात धाणीवरी परिसरात घडला. वऱ्हाडी ट्रकमध्ये १०० हून अधिक जण प्रवास करत होते. लग्नासाठी निघालेल्या या वऱ्हाडाच्या वाहनाला समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. काही प्रवासी वाहनाखाली अडकले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गोंधळाची…
साईमत न्यूज नेटवर्क – एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने एलपीजी अनुदान (सबसिडी) संदर्भातील नियम अधिक कडक केले असून उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांना आता अनुदान मिळणार नाही, तसेच बनावट व निष्क्रिय कनेक्शनवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नव्या नियमानुसार, ज्या ग्राहकांचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांना “उच्च उत्पन्न गट” म्हणून वर्गीकृत करण्यात येईल. अशा ग्राहकांना यापुढे एलपीजी सिलिंडरवरील सबसिडीचा लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात सबसिडी वितरणात पारदर्शकता आणण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अनेक राज्यांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत हजारो ग्राहक हे उच्च उत्पन्न गटात मोडत असूनही सबसिडी…
साईमत न्यूज नेटवर्क – लखीमपूर खेरी येथे सोमवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या मॅजिक वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी सुमारे ७.३० वाजता पीलीभीत-बस्ती महामार्गवरील अदलीसपूर गावाजवळ घडला. मॅजिक वाहनात २ महिलांसह एकूण १० जण प्रवास करत होते. ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने मॅजिक वाहन तब्बल १० फूट अंतरापर्यंत फरफटत गेले आणि क्षणार्धात मोठा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अनेक जण सीटमध्ये अडकले, तर काही प्रवासी धडकेमुळे रस्त्यावर फेकले गेले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडल्याचे…