साईमत न्यूज नेटवर्क – महाराष्ट्र राज्यात सध्या तीव्र उष्णतेसोबतच पूर्वमोसमी वादळी पावसाची दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असून काही भागांत वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या भागांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील…
Author: saimat
साईमत न्यूज नेटवर्क – नाशिक शहरातील मुंबई नाका परिसर येथे अमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई करत एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थाच्या विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ लाख ३६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात एमडी ड्रग्ज, महागडे मोबाइल, रोकड आणि चारचाकी वाहनाचा समावेश आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाणे येथे एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये झाकिर रफिक शेख (३८, जुने नाशिक), शाहरूख युसूफ शेख (३०) आणि सिराज सोहराय शेख (३१) यांचा समावेश आहे. शनिवारी पहाटे साडेदोन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना…
साईमत न्यूज नेटवर्क – उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्हा येथे विवाहित महिलेची अत्यंत निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. हात-पाय बांधून आणि तोंडात कापडाचा बोळा कोंबून महिलेची हत्या करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोरारा गाव येथील रहिवासी जावत्री हिचा मृतदेह तिच्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घरातील खाटेजवळ ती रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. तिचे हात-पाय बांधलेले होते तसेच तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला होता. शरीरावर मारहाणीच्या जखमांचेही अनेक निशाण आढळून आले. ही घटना सोमवारी सकाळी सुमारे सात…
दिवसाढवळ्या सराफा बाजार हादरला; शॉक मशीनने कारागिराला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : शहरातील गजबजलेल्या सराफा बाजार परिसरात एका चांदीच्या कारागिराला इलेक्ट्रिक शॉक देऊन बेशुद्ध करण्याचा आणि त्यानंतर जबरी चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, व्यापारी व कारागिरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना १६ मे रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, भरत वसंत भामरे (वय ४१, रा. आर.एल. कॉलनी, साईबाबा मंदिराजवळ, गांधी नगर, जळगाव) हे चांदीचे कारागीर असून बालाजी पेठ, रथ चौक परिसरातील ‘आर.एल. ज्वेलर्स’…
२०० नागरिकांना आरोग्य शिबिराचा लाभ साईमत/चोपडा/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा लोकाभिमुख सामाजिक उपक्रम सौ. संध्या महाजन (नगरसेविका, प्रभाग क्र. १३, चोपडा नगरपरिषद तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष) व श्री. नरेश महाजन यांच्या संयुक्त पुढाकारातून यशस्वीपणे संपन्न झाला. दि. १६ एप्रिल रोजी मल्हारपुरा कन्या शाळा क्रमांक २ येथे आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिसरातील सुमारे २०० ते २२५ महिला व पुरुष नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेत विविध आरोग्य तपासण्यांचा…
साईमत न्यूज नेटवर्क – मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात रविवारी सकाळी थिरुवनंतपुरम–हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 12431) च्या एसी बी-1 डब्यात अचानक भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. ही घटना पश्चिम मध्य रेल्वे (WCR) झोनमधील लुनी रिच्छा आणि विक्रमगढ अलोट स्थानकांदरम्यान घडली. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सुमारे 5.15 वाजता डब्यात धूर दिसल्यानंतर आग लागल्याचे लक्षात आले. रेल्वे प्रशासनाने तत्काळ ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा बंद करत डबा मुख्य ट्रेनपासून वेगळा केला आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांना वेळेत सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले असून कोणालाही दुखापत झाली नाही किंवा जीवितहानी झालेली नाही. बाधित प्रवाशांना घटनास्थळी अल्पोपहार देण्यात आला. घटनेनंतर…
साईमत न्यूज नेटवर्क – हमीरपूर – उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ३४ वर शनिवारी भीषण अपघात घडला असून यात पती-पत्नीसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मौदाहा कोतवाली परिसरातील चिरका आणि मावैया गावांदरम्यान हा अपघात घडला. मारुती वॅगनआर कारमधून एकाच कुटुंबातील दोन जोडपी आणि एकूण पाच जण प्रवास करत होते. हे सर्वजण बागेश्वर धाम येथील तीर्थयात्रा आटोपून कानपूरकडे परतत होते. राष्ट्रीय महामार्ग ३४ वर झालेल्या या भीषण अपघातानंतर कारमधील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, चालकाला झोप लागल्यामुळे किंवा…
साईमत न्यूज नेटवर्क – नागपूर – नागपूर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई करत नागरिकांची फसवणूक करून लंपास करण्यात आलेली तब्बल ४ कोटी ४९ लाख २४ हजार २६६ रुपयांची रक्कम तसेच २३२ मोबाईल हँडसेट मूळ मालकांना परत केले आहेत. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ही रक्कम आणि मोबाईल संबंधित नागरिकांना सुपूर्त करण्यात आले. या निमित्ताने सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कायदा तंत्रज्ञान व धोरण केंद्र, एमएनएलयु नागपूरच्या प्रा. डॉ. दिशा खैरे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक प्रबंधक पीयुष तेलरांधे तसेच सायबर व डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञ हिमांशू जोशी यांनी सायबर फसवणुकीचे प्रकार आणि…
साईमत न्यूज नेटवर्क – हैदराबाद – महबूबनगर जिल्ह्यातील जडचेरला शहरात शनिवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. प्रेमप्रस्ताव नाकारल्याच्या रागातून २१ वर्षीय तरुणीचा भररस्त्यात गळा चिरून खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वाय. वैष्णवी असे मृत तरुणीचे नाव असून ती जडचेरला येथील एका खासगी शाळेत रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत होती. संशयित आरोपी गेल्या काही दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता आणि प्रेमाच्या नावाखाली तिला सातत्याने त्रास देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शनिवारी वैष्णवी नेहमीप्रमाणे बसमधून उतरून पायी घरी जात असताना आरोपीने तिच्यावर अचानक हल्ला केला. भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ तिला रुग्णालयात…
गुन्हेगारी रोखण्यासाठी जळगाव पोलिसांची ‘कॉन्व्हिक्शन मिशन’ मोहीम जळगाव : जिल्ह्यातील गुन्हेगारांना न्यायालयातून सहज सुटका मिळू नये, तपास अधिक सक्षम आणि शास्त्रोक्त व्हावा तसेच गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा होण्याचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने जळगाव पोलीस दलाच्या वतीने एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जळगाव पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून आयोजित ही अभ्यासपूर्ण कार्यशाळा जळगाव विद्यापीठाच्या सभागृहात पार पडली. सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत झालेल्या पाच तासांच्या या सत्रात तपास प्रक्रियेतील बारकावे, कायद्यातील बदल आणि भक्कम पुरावे संकलन यावर सखोल चर्चा करण्यात आली. गुन्ह्यांचा तपास करताना राहून गेलेल्या तांत्रिक त्रुटी, अपुरे वैज्ञानिक पुरावे किंवा परिस्थितीजन्य पुराव्यांचा अभाव यामुळे अनेकदा आरोपींना न्यायालयातून दिलासा…