पेपर लीक, गैरकारभारावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’चा सरकारवर तीव्र हल्ला; ९४ लाख नागरिकांच्या स्वाक्षरी मोहिमेचा दावा साईमत न्यूज नेटवर्क – सरकारच्या कथित गैरकारभारामुळे देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढत असून, तरीही जबाबदार मंत्री पदावर टिकून असल्याचा आरोप करत ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘साम टीव्ही’शी बोलताना दिपके यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत म्हटले की, “दुसऱ्यांचे प्राण वाचवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला स्वतःचा जीव द्यावा लागतो, यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही.” देशातील वाढते पेपर लीक प्रकरण आणि परीक्षांतील गोंधळ याला…
Author: saimat
स्थानिक औषध विक्रेत्यांचे एकजूट प्रदर्शन, तहसीलदारांना निवेदन सादर साईमत/मलकापूर/ प्रतिनिधी : ऑनलाइन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या व्यावसायिक धोरणांविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंद आंदोलनाला मलकापूर शहरात औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्व औषध दुकाने पूर्णपणे बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आपला तीव्र विरोध नोंदवला. या आंदोलनाचे नेतृत्व केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, मलकापूरने केले. शहरातील रिटेल तसेच होलसेल औषध विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत एकजूट दाखवली. बंदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत दिवसभर औषध विक्री व्यवहार ठप्प राहिला. औषध विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, औषध विक्री व्यवसाय हा ड्रग्स ॲण्ड कॉस्मेटिक्स ॲक्ट १९४० व १९४५ अंतर्गत नियंत्रित आहे. मात्र, या कायद्यात ऑनलाइन…
निपुण भारत अभियानाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन; गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, या शाळा म्हणजे नव्या पिढीला घडविणारे खरे मंदिर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. निपुण भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन गुरुवार, २१ मे २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीत निपुण भारत अभियानाच्या अंमलबजावणीचा…
‘फार्मफ्रेस’ कंपनी हटवा; नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे रहिवासी भागात सुरू असलेल्या रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित कंपनीचा परवाना तात्काळ रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ‘फार्मफ्रेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केला आहे. तसेच कंपनीला निवासी भागातून हटवून औद्योगिक क्षेत्रात स्थलांतरित करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील गट क्रमांक १०३६ मधील प्लॉट क्रमांक ३७ व ३८ येथे संबंधित कंपनीकडून फळांवर रासायनिक प्रक्रिया करून ज्यूस निर्मितीचा व्यवसाय सुरू आहे. या प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे परिसरात गोडसर पण…
२१ वर्षीय कर्मचारी गंभीर जखमी, परिसरात खळबळ साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : राज्यात सुरू असलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्वच पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून अनेक ठिकाणी वादविवादाचे प्रकार वाढताना दिसत आहेत. अशाच एका धक्कादायक घटनेत एरंडोल तालुक्यातील म्हसावदजवळील ममताबाद येथील पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नसल्याचे सांगितल्याच्या कारणावरून दोन अज्ञात तरुणांनी २१ वर्षीय कर्मचाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात तुषार गुरव (वय २१) हा पेट्रोल पंप कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी…
५ लाखांची मागणी, ३ लाखांवर तडजोड अखेर एसीबीची कारवाई साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : सहकार क्षेत्रात खळबळ उडवणारी मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज जळगावमध्ये केली आहे. अवैध सावकारी प्रकरणात अनुकूल अहवाल देण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागून त्यातील पहिला हप्ता स्वीकारताना उपनिबंधक व एका खाजगी इसमाला रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव येथील सहकारी संस्थांचे वर्ग-१ चे उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी आणि जळगाव जिल्हा बँक असोसिएशनचे मानद कार्यकारी अधिकारी देविदास धनसिंग पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदारावर अवैध सावकारी कायद्यांतर्गत कारवाई सुरू असून, त्याची सुनावणी उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव येथे प्रलंबित…
साईमत न्यूज नेटवर्क – मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्टेशनजवळील गरीबनगर परिसरात रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली असून, सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई सुरू आहे. कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई राबवण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने या परिसरातील अनधिकृत घरे, पत्र्याच्या झोपड्या तसेच काही व्यावसायिक गाळे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यास सुरुवात केली. या कारवाईत आरपीएफ आणि जीआरपीच्या पथकांचा संयुक्त सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या कारवाईला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध झाला. संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक आणि बाटल्या फेकल्याची घटना घडली. या तणावपूर्ण परिस्थितीनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. या कारवाईदरम्यान काही आंदोलकांना ताब्यात…
एमआयडीसीत रात्रीच्या पेट्रोलिंगचा प्रस्ताव पोलीस-उद्योजक समन्वय वाढणार साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध आणि वाहतूक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी भूषवले असून, एमआयडीसीतील उद्योजक व कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या सुरक्षा आव्हानांवर सविस्तर चर्चा करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला. जळगाव मधील औद्योगिक परिसरात अलीकडच्या काळात घडणाऱ्या चोरीच्या घटना, अपघात आणि संभाव्य गुन्हेगारी हालचाली लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या स्पष्ट सूचना या वेळी देण्यात आल्या. कारखान्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवणे, प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची…
पेट्रोल-डिझेलसाठी नागरिकांची धावपळ, प्रशासन अलर्ट मोडवर साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला असून काही ठिकाणी पूर्णपणे इंधन संपल्याने विक्री थांबवण्यात आली आहे. परिणामी वाहनधारकांना इंधनासाठी ठिकठिकाणी रांगा लावाव्या लागत असून अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरासह ग्रामीण भागातही या टंचाईचा परिणाम जाणवत असून दैनंदिन प्रवास, मालवाहतूक आणि अत्यावश्यक सेवांवरही त्याचा फटका बसत आहे. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज सायंकाळी…
साईमत न्यूज नेटवर्क – जळगाव : यंदाच्या मे महिन्यात जळगाव जिल्ह्यात कडक उन्हाचा कहर सुरूच असून तापमानाने ४३ ते ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. सलग काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मंगळवारी शहर आणि जिल्ह्यात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये पावसाची आशा निर्माण झाली होती. मात्र, तापमानात फारसा फरक न पडता पारा ४३.४ अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सध्या जिल्ह्यात मोठ्या किंवा व्यापक पावसाची शक्यता कमी आहे. किनारपट्टी भागात हवामान प्रणाली अधिक सक्रिय असल्याने उत्तर महाराष्ट्रात केवळ स्थानिक बदल जाणवू शकतात. त्यामुळे काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात…