बोदवड पोलीस ठाण्यातील हलगर्जीपणा उघड; तिघांवर निलंबनाची कारवाई साईमत/बोदवड/ प्रतिनिधी : बोदवड तालुक्यात घडलेल्या हत्या प्रकरणानंतर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि निष्क्रियता आढळल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक (API)सह तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर, एएसआय रवींद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे. विभागीय चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तणाव वाढत गेला, पण प्रतिबंधात्मक कारवाई नाही चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, बोदवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका वादातून…
Author: saimat
साईमत न्यूज नेटवर्क – लखनऊ : लखनऊच्या तेजस रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला असून, उपचारासाठी आलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीवर रुग्णालयातील डॉक्टरनेच अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बक्षी तलाव परिसरातील तेजस रुग्णालयात १९ वर्षीय बारावीच्या विद्यार्थिनीला फिट्सच्या त्रासामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी तिला रुग्णालयात आणण्यात आले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टर विजय कुमार गिरी यांनी ट्यूब टाकण्याचा सल्ला देत तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. यावेळी विद्यार्थिनीच्या बहिणीला बाहेर पाठवण्यात आले. पीडितेच्या आरोपानुसार, ऑपरेशन थिएटरमध्ये तिला इंजेक्शन देऊन अर्धवट बेशुद्ध करण्यात आले आणि त्यानंतर डॉक्टरने तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर…
साईमत न्यूज नेटवर्क – पिंपरी-चिंचवड : शहरात खळबळ उडवणाऱ्या ‘ए. जे. फर्निचर मॉल’ गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी मोठा उलगडा केला असून, बिश्नोई गँगशी संबंधित तीन शूटरना उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे देशभरातील गुन्हेगारी कनेक्शनचे धागेदोरे समोर आले आहेत. १५ मे २०२६ रोजी रात्री रावेत-ताथवडे बीआरटी मार्गावरील ‘ए. जे. फर्निचर मॉल’ बाहेर मॉलचे मालक जगदीश बिश्नोई बसलेले असताना दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी त्यांच्यावर ५ ते ६ गोळ्या झाडल्या. सुदैवाने ते या हल्ल्यात बचावले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तपासात समोर आले की, ७ मे रोजी अशोक कुमार बिश्नोई यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉलद्वारे २ कोटी रुपयांची…
साईमत न्यूज नेटवर्क – कल्याण : कल्याणमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ३४ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे हेरॉईन जप्त केले असून या प्रकरणात एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी कल्याण पश्चिमेतील सांगळेवाडी स्मशानभूमीजवळ दोन संशयित व्यक्तींच्या हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या. संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान कासिम अब्दुल सत्तार वसईकर…
साईमत न्यूज नेटवर्क – मध्य रेल्वेने दौंड–अजमेर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीची सेवा आता नियमित करण्यात आली असून २२ मे २०२६ पासून ही गाडी नव्या क्रमांकासह साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. या निर्णयामुळे पुणे–राजस्थान दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक 20992 दौंड–अजमेर साप्ताहिक एक्सप्रेस दर शुक्रवारी रात्री ११.१० वाजता दौंड स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता अजमेर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 20991 अजमेर–दौंड एक्सप्रेस दर गुरुवारी दुपारी ४.४५ वाजता अजमेरहून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.१० वाजता दौंड येथे दाखल होईल. या गाडीला पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, बोईसर, वापी, वलसाड, सुरत,…
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर; ५० हून अधिक गावांच्या महसुली कामांना मिळणार गती, नगरपरिषदेकडून विनामूल्य जागा देण्याची तयारी साईमत/नशिराबाद/ प्रतिनिधी : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नशिराबाद शहराला पुन्हा एकदा प्रशासकीय महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी जळगाव तालुक्याचे प्रस्तावित ‘अप्पर तहसील कार्यालय’ नशिराबाद येथे सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी नशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सभापती पंकज शामकांत महाजन यांनी केली आहे. यासंदर्भातील सविस्तर निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सादर केले. निवेदनात महाजन यांनी नशिराबादच्या ऐतिहासिक महत्त्वाचा विशेष उल्लेख केला आहे. ब्रिटिश काळात नशिराबाद हे ‘परगणा’ म्हणून ओळखले जात होते. त्या काळात येथे तहसील कार्यालय, न्यायालय…
साईमत न्यूज नेटवर्क – सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू असून जळगावच्या सुवर्ण बाजारावरही याचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. आज पुन्हा दोन्ही धातूंच्या दरांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. जळगावच्या सराफा बाजारात आज १ तोळा सोन्याच्या दरात तब्बल १२०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर १ किलो चांदीच्या दरातही २००० रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, बुधवारी देखील सोन्याच्या दरात १२०० रुपयांची वाढ झाली होती. मात्र त्याच दिवशी चांदीच्या दरात तब्बल ४००० रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली…
साईमत न्यूज नेटवर्क – पेट्रोल–डिझेल टंचाईचा सामना करत असलेल्या राज्यासमोर आता आणखी एका संभाव्य कृषी संकटाचे आव्हान उभे राहिले आहे. हवामानातील बदल आणि अल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर खरीप हंगामपूर्व तयारीसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संभाव्य कृषी संकटाबाबत सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक अडचण भासू नये यासाठी बँकांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही…
धरणगावात ३४५ जलसिंचन प्रकल्पांचा आढावा; १५ जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य साईमत/धरणगाव/ प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील विविध सिंचन व जलसंधारण प्रकल्पांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. आगामी पावसाळा आणि सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता सर्व प्रकल्पांची कामे वेळेत आणि उच्च गुणवत्तेने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागामार्फत जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर सिंचन व जलसंधारणाची कामे सुरू असून, एकूण ३४५ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी २८९ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत १०५ प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने…
रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावरील घटना; अपघातात प्रवासी जखमी, स्थानिकांकडून तत्काळ मदतकार्य साईमत न्यूज नेटवर्क – रत्नागिरी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या भीषण अपघातांच्या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात एसटी बस आणि एर्टिका कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत पाच जण जखमी झाले आहेत, तर दापोली तालुक्यातील देवाचा खळगा परिसरात झालेल्या दुसऱ्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दक्खन बस थांब्याजवळ हा अपघात घडला. भडकंबा येथील प्रल्हाद भिकाजी शिंदे हे एसटी बस खडीकोळवण ते साखरपा या मार्गावर घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या कारची बसला जोरदार धडक बसली. या अपघातात बसचालक प्रल्हाद…