Author: saimat

साईमत न्यूज नेटवर्क – लासलगाव – देशातील प्रमुख कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समिती येथे कांद्याच्या दरात शनिवारी मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत सरासरी दरात ७० रुपयांची घट नोंदवली गेली असून, कमाल दरातही ५० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडमार्फत प्रतिकिलो १२.३५ रुपये दराने कांदा खरेदी करण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शनिवारी सकाळपासून बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या कांदा खरेदी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील वर्षीप्रमाणे किमान २४.१० रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. वाढलेला उत्पादन खर्च, इंधनाचे…

Read More

अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : शहरातील शिवाजीनगर परिसरात रविवारी सकाळी कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या एका बोगीला अचानक आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे पुलाजवळ तसेच नवीन तिकीट घर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, शिवाजीनगर अग्निशमन दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून जळगावच्या दिशेने येत असलेल्या कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या पाचव्या बोगीतून धूर निघत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर स्टेशन प्रबंधक एस. एस. ठाकूर यांनी सकाळी सुमारे ११.४० वाजेच्या सुमारास शिवाजीनगर अग्निशमन केंद्राशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे…

Read More

 एसपी श्रीकांत धिवरे स्वतः उतरले मैदानात साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : शहरातील सार्वजनिक ठिकाणी, मुख्य रस्त्यांच्या कडेला आणि वाईन शॉपच्या परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तळीरामांविरोधात जळगाव पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे या कारवाईचे नेतृत्व स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केल्याने मद्यपींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अचानक पोलिसांचा फौजफाटा आणि त्यात स्वतः पोलीस अधीक्षक रस्त्यावर पाहून अनेक तळीरामांनी अक्षरशः पळ काढल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध वाईन शॉप्स, बिअर शॉपी आणि मुख्य रस्त्यांच्या परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या वाढली होती. त्यामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन…

Read More

 शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका  पालकमंत्री गुलाबराव पाटील साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२६ सुरळीत आणि यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे, बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करून तत्काळ गुन्हे दाखल करावेत, तसेच एकही शेतकरी बियाणे, खत किंवा पीककर्जापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती कक्षात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. “१०० मिमी पावसानंतरच पेरणी करा” यंदा एल…

Read More

दहिगावात डेंग्यूविरोधी जनजागृती मोहीम, गप्पी माशांचा वापर साईमत/यावल/ प्रतिनिधी : तालुक्यातील दहिगाव येथे आज, दि. १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस उत्साहात आणि जनजागृतीच्या प्रभावी उपक्रमांसह साजरा करण्यात आला. डेंग्यू व हिवताप या आजारांविरोधात प्रतिबंधात्मक उपायांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी तसेच तालुका हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांमध्ये डेंग्यू व हिवताप प्रतिबंधाबाबत सविस्तर जनजागृती करण्यात आली. पाणी साठवणीची भांडी नियमित तपासणे, परिसर स्वच्छ ठेवणे तसेच पाण्याची भांडी झाकून ठेवणे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन…

Read More

महापौरांच्या हस्ते पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात  मंदिर निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिका आणि समर्पण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात निर्माल्याचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “निर्माल्य संकलन व व्यवस्थापन प्रकल्पा”चा शुभारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विशेष निर्माल्य संकलन रथाचे उद्घाटन महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते करण्यात आले. जळगाव शहरातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला आधुनिक पर्यावरण संवर्धनाची जोड देत, मंदिरांमधून दररोज मोठ्या प्रमाणावर जमा होणाऱ्या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करून त्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्याचा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे नदी-नाल्यांमध्ये निर्माल्य टाकण्याची समस्या कमी होऊन पर्यावरण संरक्षणाला चालना मिळणार…

Read More

उष्णतेत नागरिकांना मोठा दिलासा साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज पांडे चौक येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. शहरात वाढलेल्या प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना थंड व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आणि संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने, तसेच ना.मा श्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सध्या शहरात वाढत्या उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या वतीने पाणपोई सुरू करून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा…

Read More

उष्णतेच्या झळांपासून कामगारांना दिलासा  साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल, मापाडी, महिला कामगार तसेच शिलाई कामगारांना रुमालांचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वाढत्या उन्हाच्या तीव्र झळांपासून कामगारांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुमारे २५० पुरुष व महिला कामगारांना रुमालांचे वाटप करण्यात आले. उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने श्रमिक वर्गाला दिलासा देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला असून, कामगार व व्यापारी वर्गाकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास शहराचे आमदार राजू मामा भोळे, महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर…

Read More

२ ते ३ टक्के भाडे आकारणीचा मुद्दा पेटला मनपावर आमदार भोळेंचा संताप साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव शहरातील गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित असलेला मुदत संपलेल्या गाळ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, यावरून राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळेधारकांना दिलासा देण्यासाठी २ ते ३ टक्के दराने भाडे आकारणीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असतानाही, जळगाव महानगरपालिकेने  सादर केलेल्या प्रस्तावात “नुकसानीचा” अनावश्यक मुद्दा समाविष्ट झाल्याने तो मूळ उद्देशापासून भरकटल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव येथील पद्मालय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीनंतर आमदार भोळे यांनी पत्रकार परिषद घेत मनपा प्रशासनावर तीव्र नाराजी…

Read More

तेलाभिषेक, हवन आणि महाआरतीने शनी मंदिर दुमदुमले साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : सूर्यपुत्र भगवान शनिदेव यांच्या जन्मोत्सवानिमित्त जळगाव शहरातील सिंधी कॉलनी रोडवरील प्रसिद्ध शनी मंदिरात शनिवारी शनि जयंतीचा उत्सव अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक विधी, अभिषेक, हवन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. शनि जयंतीच्या औचित्याने मंदिर प्रशासनाने मंदिराची आकर्षक सजावट केली होती. रंगीबेरंगी फुगे, विविधरंगी फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईमुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. पहाटेपासूनच मंदिरात पुरोहितांच्या वेदमंत्रांच्या गजरात भगवान शनिदेवांचा विधीवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विशेष महापूजा आणि विश्वशांती…

Read More