साईमत न्यूज नेटवर्क – नवी दिल्ली : देशभरात एकीकडे प्रचंड उष्णतेची लाट नागरिकांना हैराण करत असताना दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबत दिलेल्या ताज्या अंदाजामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील २ ते ३ दिवसांत नैऋत्य मोसमी मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता असून त्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन परिसर, अंदमान समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढील प्रगतीस पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सूनचे आगमन लवकरच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर मान्सून…
Author: saimat
साईमत न्यूज नेटवर्क – अंबाला (हरियाणा) : किरकोळ आर्थिक वादातून एका तरुणाने स्वतःच्या कुटुंबीयांवर गोळीबार करत तिहेरी हत्याकांड घडवल्याची धक्कादायक घटना हरियाणातील अंबाला येथे उघडकीस आली आहे. या घटनेत आरोपीने स्वतःची आजी, काका आणि मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आरोपी घटनेनंतर फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक पोटा असे आरोपीचे नाव आहे. घराशेजारी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो निळी टोपी आणि पांढरा शर्ट परिधान करून हातात रिव्हॉल्वर घेऊन घराकडे जाताना दिसतो. सुरुवातीला घरात कोणी नसल्याचे पाहून तो बाहेर येतो. त्याच वेळी त्याची वृद्ध आजी समोर येताच अभिषेकने…
घरगुती पाणी मोटार सुरू करताना शॉक लागून महिलेचा मृत्यू साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी : तालुक्यातील फेकरी येथे रविवार सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत पाणी भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत मोटारीत अचानक प्रवाह उतरल्याने ५५ वर्षीय महिलेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत महिलेचे नाव अलका पंडित जामोदकर (वय ५५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे ८.३० वाजता घरगुती वापरासाठी पाणी भरण्याकरिता विद्युत मोटार सुरू करत होत्या. त्याच वेळी मोटारीत अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना जोरदार शॉक बसला आणि त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी…
मलकापूरजवळ मध्यरात्री झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच गंभीर जखमी उपचारादरम्यान मृत घोषित साईमत/मलकापूर/ प्रतिनिधी : मलकापूर परिसरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरालगतच्या जग्गू मामा ढाब्याजवळ भरधाव वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यवतमाळ जिल्ह्यातील ३० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव ध्रुव साहेबराव लांजेवार (वय ३०, रा. दारबा नगर, वाडेगाव, जि. यवतमाळ) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव लांजेवार हे दुचाकीने प्रवास करत असताना अचानक समोरून आलेल्या अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की ते रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. घटनेनंतर…
साईमत न्यूज नेटवर्क – रत्नागिरी : मैत्री, प्रेमसंबंध आणि सूडाच्या भावनेतून घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने Ratnagiri जिल्हा हादरला आहे. “तू सोहमचा नाद सोडून दे” असा सल्ला दिल्याच्या रागातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात सोहम म्हात्रे या मुख्य संशयितासह दोन साथीदारांवर सूरज झोरे याच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेच्या काही वेळ आधी सूरज झोरे याने संबंधित तरुणीला “तू सोहमचा नाद सोडून दे” असा सल्ला दिला होता. याच गोष्टीचा राग मनात…
साईमत न्यूज नेटवर्क – नवी दिल्ली : Red Fort परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात अत्यंत गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) तपासानुसार, या प्रकरणातील आरोपींनी दहशतवादी कारवाया आणि बॉम्ब तयार करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्लॅटफॉर्मचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात जागतिक दहशतवादी संघटना Al-Qaeda शी संबंधित कनेक्शन असल्याचेही तपासात समोर आले आहे. NIA ने या प्रकरणात तब्बल ७,५०० पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले असून, त्यात अनेक गंभीर खुलासे करण्यात आले आहेत. तपासानुसार आरोपींनी अत्यंत सूक्ष्म आणि प्रयोगशाळा स्तरावरील पद्धती वापरून इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइसेस (IEDs) तयार केली. एवढेच नव्हे तर रॉकेट-आधारित IEDs…
सप्तश्रृंगीदेवी दर्शना हून परतीचा प्रवास ठरला काळरात्र भरधाव कार झाडावर धडकली साईमत/एरंडोल/ प्रतिनिधी : सप्तशृंगी गड येथील देवीचे दर्शन आटोपून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील एका कुटुंबावर काळाने घाला घातला. नाशिकजवळील म्हसरूळl परिसरात कारचा भीषण अपघात होऊन ७२ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण एरंडोल परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी आणि विश्वे कुटुंबातील एकूण ११ सदस्य (कार क्र. MH 46 AL 5126) सप्तश्रृंगी गडावर देवीदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर शनिवारी सकाळी सुमारे १० वाजता ते त्र्यंबकेश्वरच्या दिशेने प्रवास करत असताना अचानक कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात…
नाल्यातून तीन ट्रॅक्टर गाळ उपसून स्वच्छता मोहीम यशस्वी साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : पावसाळा जवळ येत असताना जळगाव महापालिकेने शहरातील नालेसफाईला वेग दिला असून, प्रभाग क्रमांक १५ मधील ‘बाबा खोली’ परिसरात रविवारी राबविण्यात आलेली विशेष स्वच्छता मोहीम लक्षवेधी ठरली. या कारवाईत नाल्यात साचलेला मोठ्या प्रमाणातील कचरा आणि गाळ काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. नागरिकांच्या तक्रारीनंतर तातडीने हालचाल ‘बाबा खोली’ परिसर हा दाट लोकवस्तीचा आणि अरुंद रस्त्यांचा भाग असल्याने येथे पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या गंभीर होते. नाल्याची नियमित सफाई न झाल्याने दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि पाणी घरात शिरण्याचा धोका वाढला होता.याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तसेच महापौरांकडे तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत विशेष…
“पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका” – जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेल संपल्याच्या अफवा वेगाने पसरल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. “पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका,” असे ठाम आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले असून जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत इंधन पुरवठा व्यवस्था, साठा स्थिती आणि सोशल मीडियावरील अफवांचा प्रभाव याचा सविस्तर…
साईमत न्यूज नेटवर्क – कल्याण परिसरातील कांबा येथे आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात सोशल मीडियावरील वाढत्या फॉलोअर्सच्या चर्चेवरून जोरदार राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. या कार्यक्रमात बोलताना खासदार Naresh Mhaske यांनी नाव न घेता विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला. अलीकडे सोशल मीडियावर एका पक्षाच्या वाढत्या फॉलोअर्सबाबत सुरू असलेल्या चर्चेचा संदर्भ देत त्यांनी “चार दिवसांत एखाद्याचे मिलियन फॉलोअर्स झाले याची चर्चा होते, पण ते फॉलोअर्स वाढले कारण लोकांनी अकाउंट फॉलो केले, पोस्टला लाईक केले,” असे मत व्यक्त केले. याचवेळी त्यांनी आपल्या पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटकडे कार्यकर्त्यांचे कमी लक्ष असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. “आपल्या नेत्यांचे आणि पक्षाचे अधिकृत…