साईमत न्यूज नेटवर्क – अमृतसर येथे ड्युटीवर जात असलेल्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाची अज्ञात हल्लेखोरांनी भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पंजाब पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव जोगा सिंह असे असून ते पंजाब पोलिस दलात एएसआय पदावर कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, जोगा सिंह हे रविवारी सकाळी ड्युटीसाठी घरातून बाहेर पडले होते. दरम्यान, वाटेत दबा धरून बसलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून अचानक गोळीबार केला. हल्लेखोरांनी कोणतीही चर्चा किंवा वाद न घालता थेट त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गंभीर जखमी झालेल्या जोगा सिंह हे रस्त्यावर कोसळले. घटनेनंतर…
Author: saimat
वृंदावन अपार्टमेंटमध्ये खळबळ दुर्गंधीमुळे उघडकीस आला प्रकार साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव शहरातील रिंगरोड परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वृंदावन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव प्रिया दिलीप श्रीश्रीमाळ (वय ४०, रा. वृंदावन अपार्टमेंट, हरेश्वर नगर) असे असून त्या अपार्टमेंटमध्ये एकट्याच वास्तव्यास होत्या. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. शुक्रवारी सकाळी अपार्टमेंटमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला. काही रहिवाशांनी तत्काळ ही बाब जिल्हापेठ…
विवाहाची तयारी सुरू असतानाच शोककळा रोटावेटर कामादरम्यान भीषण अपघात २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू साईमत/यावल/ प्रतिनिधी : तालुक्यातील दहिगाव येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, रोटावेटरचे काम करत असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार, २३ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे मृत तरुणाचा विवाह अवघ्या दहा दिवसांवर ठरलेला होता. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मृत तरुणाचे नाव योगेश यशवंत पाटील असे असून, तो दहिगाव येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हा बबलू उर्फ शोभराज रमेश महाजन यांच्या मोहराळे शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटावेटरचे काम करत होता. काम सुरू असताना अचानक…
उन्हाळ्यात दिलासा; बंद हातपंप पुन्हा सुरू साईमत/मलकापूर/ प्रतिनिधी : तालुक्यातील धरणगाव येथील गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले हातपंप अखेर दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. वाढत्या तापमानामुळे आणि गावात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हातपंप पुन्हा कार्यान्वित झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. करुणा बुद्ध विहार परिसरातील हातपंप मागील तब्बल दोन वर्षांपासून बंद अवस्थेत होता. त्याचबरोबर नळ पाणीपुरवठा अपुरा असल्याने नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते आणि दैनंदिन गरजांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य रमेश…
‘क्रिमिनल डोजियर M.O.B’ मोहिमेला सुरुवात गुन्हेगारांची माहिती होणार ऑनलाइन साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि व्यापक मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील हिस्ट्रीशीटर्स, सराईत गुन्हेगार, टवाळखोर तसेच प्रतिबंधात्मक कारवाईतील आरोपींची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करण्यासाठी ‘क्रिमिनल डोजियर M.O.B डेटाबेस’ तयार करण्याची मोहीम शुक्रवार, २३ मे २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांची सविस्तर माहिती आता पोलिसांच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार असून, भविष्यातील गुन्ह्यांचा तपास अधिक वेगवान आणि प्रभावी होण्यास मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेंतर्गत संबंधित गुन्हेगारांना थेट…
जळगाव मनपातील शिवसेना नगरसेवकांचा उमेदवारीसाठी आग्रह साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारीबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. या जागेसाठी विविध नावांची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेकडून प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या नावाला अधिक बळ मिळताना दिसत आहे. जळगाव महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांनी घेतलेल्या भेटीनंतर त्यांच्या उमेदवारीची चर्चा आणखी रंगली आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रतापराव पाटील यांची सदिच्छा भेट घेत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी त्यांची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचविणार असल्याचे संकेत दिले. जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी सक्षम आणि प्रभावी नेतृत्वाची गरज असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना शासन स्तरावर ठोसपणे मांडण्याची क्षमता प्रतापराव पाटील…
४ लाख ७ हजार बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार येत्या २८ जून 2026 रोजी देशभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून जळगाव जिल्ह्यातही या मोहिमेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून आरोग्य विभागाकडून सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर डेरे, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे,…
१.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त; ४ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगावमध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी आणि प्रभावी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गजाआड केले असून त्यांच्या ताब्यातून एकूण चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख ८७ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दि. १७ मे २०२६ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वाघ नगर येथील रहिवासी तथा फिर्यादी संतोष रणछोड सैंदाणे यांची होंडा शाईन मोटारसायकल (MH 19 CL 7558) सिंधी कॉलनी रोडवरील समर्थ हॉस्पिटलसमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 433/2026, भारतीय…
महापौर दीपमाला काळे यांची पाहणी, दर्जेदार कामाचे स्पष्ट निर्देश साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव शहरातील रामदास कॉलनी परिसरात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित उद्यानाच्या विकासकामांना गती देण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष स्थळी भेट देत सविस्तर पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. परिसरातील नागरिकांना आधुनिक, स्वच्छ आणि सुस्थितीत विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या उद्यानाचा विकास करण्यात येत असून, कामांच्या प्रगतीबाबत महापौरांनी जागेवर जाऊन प्रत्येक घटकाची बारकाईने तपासणी केली. कामकाजात कोणतीही त्रुटी राहू नये तसेच नागरिकांच्या गरजांचा विचार करून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
साईमत न्यूज नेटवर्क – नाशिक : शहर व परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ११ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून सुमारे ७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात एक विधिसंघर्षित बालक आणि शोएब अन्सारी उर्फ पाप्या चोरवाला याला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा मालेगाव परिसरातील दुचाकी चोरीच्या प्रकरणांचा समांतर तपास करत होती. दरम्यान, मोसम पूल परिसरातील बसस्टॉपजवळ एक संशयित विनानंबर दुचाकीसह येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.…